बेलापुर (प्रतिनिधी )-अनेकाच्या जिवन प्रवासात साथ देणारी लालपरी अर्थात एसटी बसचे अस्तित्व धोक्यात आले असुन एसटी महामंडळ डबघाईस येण्यास कोण जबाबदार ?असा सवाल प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केला आहे या बाबत बोलताना श्रीगोड म्हणाले की अनेकाचे प्रपच भवितव्य हे एसटी बसवर अवलंबुन आहे
एस टी महामंडळ राज्याची जीवन वाहिनी आहे त्यावर सर्वजण अवलंबून असतो असा कोणी नाही की त्याने एस टी मधून प्रवास केला नाही एस टी मुळे ग्रामीण भागातील मुले व मुली सवलतीमुळे शिकले आज ते शासनात मोठे अधिकारी व पुढारी बनले 1948 नंतर प्रथमच एसटी महामंडळाची इतकी वाईट अवस्था झाली आहे एस टीच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा व्हावी असे कुणालाच वाटत नाही युती काळातील विरोधीपक्ष नेत्यांनी विधान सभेतील 7 वा आयोग देण्याची भाषणे ठोकली होती त्यावेळी सत्तारूढ पक्षातील लोकप्रतिनिधी गप्प होतें त्यावेळी एस टी विषयी पुळका दाखविणारे आज मंत्री आहेत कर्मचारी आत्महत्या करीत असताना ते गप्प आहेत म्हणजे महाविकास आघाडी चे लोकप्रतिनिधी डोळ्यास पट्टी बांधून बसले आहे शेतकरी आत्महत्या आपण पहात आलो आता एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत या घटनेस जबाबदार कोण आहे याचे मंथन करण्याची वेळ आलेली आहे एसटी महामंडळावर त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ का यावी हे एक कोडेच आहे यात एकच दिसून येते की एस टी जिवंत राहावी असे कोणालाच वाटत नाही एस टी बंद पडली तर गरीब प्रवासी विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होणार आहे मी या निमित्ताने विंनती करतो की अजूनही वेळ आहे प्रवासी व अधिकारी सेवक यांनी संघटित होऊन जनशक्तीचा दबाव गट तयार करण्याची गरज आहे अनावश्यक होणारी उधळपट्टी ला प्रशासनाने विरोध करण्याचे धाडस दाखविले पाहिजे अपघात सहायत्ता विश्वस्त योजना कारभार पारदर्शक करावा 500 कोटी रुपये गुंतवणूक करून दरवर्षी व्याज जमा करावे पण अधीकारी दिशाभूल करतात याचे वाईट वाटते एस टी मजबूत करण्यासाठी प्रवासी व कर्मचारी हितासाठीच संघटित होवुन एसटी वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखवावी असे अवाहनही श्रीगोड यांनी केले आहे.
Post a Comment