सचोटीने कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती - उपनगराध्यक्ष करण ससाणे.

बेलापूर(वार्ताहर)सहकारी संस्था सामाजिक  संस्था असल्याने कारभार पाहणाऱ्या प्रतिनिधींनी सभासदांभिमुख सचोटीने कार्यक्षम कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेलापूर सेवा सहकारी सोसायटी होय,असे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक व श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी काढले.

बेलापूर बुद्रुक सेवा सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ९३३ सभासदांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी पंधरा किलो साखर, पंधरा टक्के लाभांश आणि मिठाई तसेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनसचे वितरण शुभारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर होते.

यावेळी बोलताना गुजर म्हणाले की,बऱ्याचदा चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याने गैरकारभारामुळे सहकार क्षेत्र बदनाम होताना दिसते.मात्र बेलापूर सोसायटीने सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहुन कारभार केल्यामुळे आज संस्था विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.या क्षेत्रात विश्वास जागवून तो वृद्धिंगत करण्याची गरज आहे.

बाजार समितीचे संचालक व संस्थेचे मार्गदर्शक सुधीर नवले यांनी  संस्थेचे कामकाज आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अरूण पा. नाईक यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी  संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर पा. खंडागळे, विलास मेहेत्रे, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,आदींनी आपल्या मनोगतातून सुचना केल्या.

यावेळी सर्वश्री त्र्यंबकराव कु-हे,शेषराव पवार, प्रकाश नाईक, द्वारकानाथ बडधे, अजय डाकले, दत्ता कु-हे,गोरक्षनाथ कु-हे,विश्वनाथ गवते,प्रकाश कु-हे,जालिंदर गाढे, ज्ञानदेव वाबळे, पंडितराव बोंबले,प्रकाश मेहेत्रे,सोपान कु-हे,एस. के. कु-हे ,दीपक निंबाळकर, चंद्रकांत नाईक, पत्रकार अशोक गाडेकर,मारुतराव राशीनकर,प्रा. ज्ञानेश गवले,देविदास देसाई,सुहास शेलार, दीपक क्षत्रिय, दिलीप दायमा बाळासाहेब भांड, भाऊसाहेब तेलोरे, विजय शेलार, बंटी शेलार, बाळासाहेब लगे, अय्याज शेख, वैभव कु-हे,संजय गोसावी,सचिव विजय खंडागळे आदींसह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.साखर, लाभांश, बोनस व मिठाई मिळुन संस्थेच्या वतीने सुमारे अकरा लाख रुपयांचे सभासदांना वाटप करण्यात आले.संस्थेचे चेअरमन अनिल नाईक यांनी प्रास्ताविक केले तर व्हा चेअरमन कलेश सातभाई यांनी आभार मानले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget