बेलापुर (प्रतिनिधी )- पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पी एस यु वन प्रशिक्षण शिबीरात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांचा सन्मान करण्यात आला पोलीस दलाच्या वतीने हवालदार पदावर बढती मिळविणार्या पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणार्या पोलीसाचे प्रोफेशनल स्किल अपडेग्रीशन कार्यक्रम धुळे येथे संपन्न झाला या शिबीरात धुळे जळगाव नांदुरबार वाशिम नाशिक ठाणे अहमदनगर आदि सात जिल्ह्यातील तीनशे पोलीस सहभागी झाले होते या शिबीरात ईन डोअर व आऊट डोअर अशा परीक्षा घेण्यात आल्या होत्या या वर्षी प्रथमच राज्याचे पोलीस महासंचालक संजयजी पांडे यांच्या संकल्पनेतुन पहीले तीन स्पर्धाकांना बक्षीस देण्यात आले या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तीनही क्रमांक पटकावीले उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन पोलीसांचा सन्मान पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला प्रथम क्रमांक बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी मिळवीला द्वितीय क्रमांक नेवासा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे बबन तमनर यांनी मिळवीला तर तृतीय क्रमांक नगर कार्यालयातील नानासाहेब गीरे यांनी मिळवीला पोलीस प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य किशोर काळे उपप्राचार्य पवार यांच्या हस्ते पोलीस दलातील तीनही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला
.
Post a Comment