Latest Post

अहमदनगर- एमआयडीसी मधील झेन कंपनीतील कॉपर पट्टया चोरुन नेणारे सराईत चोरट्यांना पकडून ७ लाख २९ रु हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भानुदास कु-हाडे (वय ३३ मुळ रा. चितळी रेल्वे स्टेशन, चितळी, ता. राहाता हल्ली रा. वडगाव गुप्ता अ.नगर), राहुल सुरेश जाधव (वय २९ रा. पाण्याचे टाकी जवळ, प्रवारा संगम ता. नेवासा),  पंकज बापू गायकवाड (वय २७ रा. गोधवणी ता. श्रीरामपूर), आकाश रामचंद्र भोकरे (वय २३ रा. कायगावटोक, ता. गंगापुर जि. औरंगाबाद) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यता घेतले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजय वेठेकर, पोहेकॉ संदिप पवार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, पोना सुरेश माळी, पोना शंकर चौधरी, पोना विशाल दळवी, पोना दिपक शिंदे, पो.कॉ. योगेश सातपुते, पोकाॅ मेघराज कोल्हे, पो.कॉ. मच्छिद्र बड़े, पोकॉ कमलेश पाथरुड, पो.कॉ. आकाश काळे व चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यविरुध्द यापूर्वी दरोडा, चोरी, बेकायदा गावठी कट्टे जवळ बाळगणे, विनयभंग, दारु व जुगार अशी गुन्हे दाखल आहेत.आरोपी कुन्हाडे याचेविरुध्द नाशिक, कोपरगाव यासह अन्य ठिकाणी एकूण  १७ गुन्हे आहेत.  झेन इलेक्ट्रॉनीक कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी भागाजी कुदनर ( रा. आदर्शनगर, नागापूर, अहमदनगर हे एमआयडीसी अहमदनगर) हे येथे दि.२२ ऑक्टोबर  २०२१ रोजी पहाटे ४.४० वा. सुमारास कंपनीमध्ये वॉचमन  सोन्याबापू विजय पळसकर व विलास परासराम नेवसे हे कंपनीमध्ये डयूटीवर असतांना अनोळखी ६ ते ७ चोरटयांनी कंपनीमध्ये जाऊन वॉचमन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी दिली.  कंपनीमधील १७ सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कंपनीचे शटर लोखंडी कटावणीने तोडून कंपनीमधील १७ लाख ५० हजार रु. किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पटयांचे १० बॉक्स दरोडा टाकून चोरुन नेले, या झेन इलेक्ट्रॉनीक कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी भागाजी कुदनर ( रा. आदर्शनगर, नागापूर, अहमदनगर हे एमआयडीसी अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं. ६९९/२०२१ भादवि कलम ३९५, ४५२,३२४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


अहमदनगर प्रतिनिधी:- Dy.s.p. संदीप मिटके यांना अहमदनगर शहरातील वाणी नगर तसेच केडगाव  मध्ये अंबिका नगर येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणी नगर, तसेच कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील अंबिका नगर केडगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन  03 पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका करण्यात आली आहे. Psi समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) दीपक एकनाथ लांडगे वय 30, 2)  सागर जाधव या आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन  येथे Cr no. 947/2021  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ रा. माळीवाडा अहमदनगर याच्या विरुद्ध  कोतवाली पोलिस स्टेशन येथे cr. No. 799/2021 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट  घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI संपत शिंदे, PI. गडकरी P.s.i. समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी पो.कॉ. तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, LPC जयश्री सुद्रिक, LPC प्रियंका भिंगरदिवे आदींनी केली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-घनकचरा प्रकल्प सुरू करणे,गावाचा सन २०२२-२३चा  विकास आराखडा तयार करणे,पाणीयोजना,रस्ते गटारी व नवीन कामाचे वाटप शासकीय नियमानुसार करणे,राष्ट्रीय तंबाखू  नियंञण कार्यक्रमाची अंमलबाजावणी आदी विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन बेलापूरची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

           मंगळवार दि २६ रोजी बेलापूरची ग्रामसभा सरपंच महेंद्र साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली.यावेळी निरीक्षक म्हणून पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, उपसरपंच अभिषेक खंडागळे,भरत साळुंके,रविंद्र खटोड,सुधीर नवले,सुधाकर खंडागळे,रणजित श्रीगोड,चंद्रकांत नाईक,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा केली.बेलापूरची लोकसंख्या जास्त असल्याने कचरा मोठ्याप्रमाणात जमा होतो. तो नदीकाठी टाकला जातो त्यामुळे प्रवरा नदीचे पावित्र्य धोक्यात आलेले आहे.म्हणून घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्प तात्काळ उभा करणे,जुनाट झालेल्या पाणी योजनांची दुरुस्ती करणे अथवा नवीन करणे, आवश्यक त्या ठिकाणी रस्ते,गटारी तयार करणे आदी विषयावर साधक बाधक चर्चा झाली.गावात घनकचरा व्यवस्थापन कामाची चर्चा अनेक वर्षांपासून सूरु आहे मात्र कार्यवाही होत नसल्याची खंत जेष्ठ नेते सुधाकर खंडागळे यांनी व्यक्त केली.यावर यादृष्टीने प्रयत्नशिल असल्याचा खुलासा ग्रामपंंचायतीकडून करण्यात आला.

कामांचे टेंडर देतांना ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता,३३ टक्के मजूर सोसायटी व ३४ टक्के खुले असे देणे बंधनकारक असतांना तसे होत नाही.असा आरोप विरोधी गटाचे भरत साळुंके व सुधीर नवले यांनी केला.त्यावर सर्व टेंडर नियमात दिले असल्याचा खुलासा सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी केला.शेवटी तंबाखू व धूम्रपान करणार नाही अशी शपथ ग्रामस्थांना देण्यात आली.विषयपञिकेवरील आमचा गाव आमचा विकास,कोविड नियमांचे पालन करुन शाळा सुरु करणे,जलजीवन मिशन, नविन घरकुल बांधकामे,यासह विविध विकास कामांचा आढावा आदी विषयांवर चर्चा होवून विषयांना मंजुरी देण्यात आली.

श्रीरामपूर (वार्ताहर) तेथील महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात रविवारदिनांक 24 10 2021 रोजी दुपारी दोन वाजता कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्र दान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते अध्यक्षपदाची सुचना पत्रकार कासम शेख यांनी मांडलि त्याला अनुमोदन असलम बिनसाद यांनी दिले कार्यक्रमास पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर प्रदेश युवा कार्याध्यक्ष संदीप पवार अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार सलाउद्दीन शेख पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष हनिफ भाई तांबोळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड शहराध्यक्ष रियाज पठाण बेलापूर शाखाप्रमुख एजाज

सय्यद श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम शेख श्रीरामपूर तालुका संघटक राज महंमद शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शेख बरकत आली ,हनिफ भाई तांबोळी , सलाउद्दीन शेख असलम बिनसाद, कासम भाई शेख ,हाजी इस्माईल भाई शेख, एजाज सय्यद, आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या व मदतीचा हात उंचावणाऱ्या बेलापूर गावातील समाजसेवक व डॉक्टरांना यावेळी कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संघामध्ये नव्याने दाखल झालेले अनिता तिडके ,समीना शेख ,अश्विनी अहिरे ,व अमन शेख यांना  शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यात अनिता तिडके यांना अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष तर समीना शेख यांना अहमदनगर महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर अश्विनी आहिरे यांना श्रीरामपूर तालुका महिला संघटक पदी तर अमन शेख यांना राहुरी तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले कोरोना योद्धा सन्मानित हाजी इस्माईल शेख यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की कोरोना काळात मी व माझ्यासारख्या अनेक लोकांनी मोठे मन करून रुग्णांना सहकार्य केले तसेच गोरगरीब व गरजू लोकांना किराणा सामानाचे व इतर साहित्याचे किट वाटप केले या काळात अनेकांनी को बीड सेंटरला भरीव मदत केली अशा लोकांच्या कार्याचा आढावा घेतापत्रकार संघाने कोरोना योद्धा या सन्मान पत्राने सन्मानित करून सर्वांचे मनोधैर्य वाढविले आहे
पत्रकार संघाच्या या स्त्रूत्य कार्याचे आपण कौतुक करीत असून या सन्मानाबद्दल मी पत्रकार संघाचा आभारी आहे असे ते म्हणाले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत अली म्हणाले की पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रात मोठ्या गतीने होत असून ठीक ठिकाणी
आपण दिलेले जिल्हाध्यक्ष व झोनल अध्यक्ष व त्यांच्या अंतर्गत काम करणारे शहर व तालुका अध्यक्ष प्रामाणिकपणे काम करीत असून पत्रकार संघाचा विस्तार करणे हे त्यांचे लक्ष्य आहे पत्रकारांनी सत्यता पडताळून बातम्या प्रसिद्ध केल्यास पत्रकार अडचणीत येणार नाही परंतु अशा प्रामाणिक पत्रकारांनी बातमी

  छापल्याचा रोष धरून कोणी पत्रकारांना मारहाण करीत असेल किंवा त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारितेवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असेल अशा वेळेस पत्रकार संघ त्या पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्याचे सामर्थ्य वाढविण्याचे व त्याला न्याय मिळवून देण्याचे काम करतो पत्रकार संघ हा पत्रकारांचा सुरक्षा कवच असल्याने संघातील कोणत्याही पत्रकाराने घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही पत्रकारांनी निर्भयपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे आमची साथ अशा पत्रकारांना शेवटपर्यंत मिळेल याची गवाही आपण या ठिकाणी देत आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी बेलापूर शाखेचे उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद पत्रकार रमेश शिरसाट पत्रकार नदीम शेख राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी पत्रकार अहमद शेख पत्रकार जावेद के शेख यांच्यासमवेत तालुक्यातील छोट्या वृत्तपत्रांचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचे आभार पुणे शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी यांनी मानले.


श्रीरामपूर (वार्ताहर) शिर्डी येथील दैनिक साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी यांचे विरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा चौकशी करून मागे घेण्यात यावा या मागणीकरिता महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने दि 23 10 2021 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय विभाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष आसलम बिनसाद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर बेलापूर येथील शाखाप्रमुख एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका संघटक राज मोहम्मद शेख श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख बेलापूर शहर संघटक मोहम्मद अली शेख पत्रकार रिजवान शेख कुमारी अश्विनी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते सदरील निवेदनात नमूद करण्यात आले की साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी हे गेल्या अनेक वर्षापासून साई भक्तांच्या व जनतेच्या अडचणींबाबत निर्भीडपणे वृत्तपत्रातून लिखाण करीत आहेत त्यांच्या लिखाणामुळे दुखावलेल्या लोकांनी लोक चंदानी यांच्या लिखाणावर व पत्रकारितेवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पोलीस स्टेशनला चंदानी यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे अशाप्रकारे षड् यंत्र रचणाऱ्या अधिकारी व पुढाऱ्यांचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ निषेध नोंदवित असून या प्रकरणी त्वरित चौकशी होऊन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा पस्वरूपाचेत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


बेलापूरः(प्रतिनिधी  )- बेलापूर ग्रामपंचायत महिला व बालकल्याण तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी वचनबध्द असून त्यासाठी ग्रामपंचायतने कृतीशील आराखडा बनविला असल्याची माहिती सरपंच महिन्द्र साळवी यांनी दिली. बेलापूर ग्रामपंचायतीने महिला,वंचित घटक तसेच बाल सभेचे सावता मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,ग्रामसेवक राजेन्द्र तगरे,सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाराटे,ज्येष्ठ पञकार देवीदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलिप दायमा ,पोलिस पाटील अशोक प्रधान आदि प्रमुख उपस्थित होते.     यावेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सदर ग्रामसभेविषयी सविस्तर विवेचन केले.ते म्हणाले की,गावाची बहुसंख्या महिलां व वंचित घटकांची आहे.त्यामुळे या घटकाच्या विकासासाठी विविध शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.महिला,  वंचित घटक व बालकांच्या विकास योजनांचा सर्वकष आराखडा मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल.बालविकासासाठीही विविध शासकीय योजनांसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील असे श्री.खंडागळे यांनी स्पष्ट केले. पञकार देवीदास देसाई यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन मौलिक सुचना व मार्गदर्शन केले.सभेत आमचा गाव आमचा विकास आराखडा,कुपोषित बालक आढावा,जलजीवन मिशन,घरकुल योजना,महिला वाचनालय,बचत गट नविन स्थापना आदिवर चर्चा झाली. सभेस महिला नागरिक,महिला बाचत गटाच्या प्रतिनिधी,अंगणवाडी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बेलापुर ( देविदास देसाई ) - श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील महावितरणच्या विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून मयत झालेल्या नाऊर येथील अतिशय गरीब कुटुंबातील कै.विलास अशोक देसाई( वय 40 ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, शिवाय घरात एकुलता एक कमविता असल्याने त्याच्या कुटुंबापुढे मोठे संकट उभे ठाकले होते.मात्र नाशिक येथील गणगोत ग्रृप व श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारती सोशल मीडियाच्या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घराच्या कामासाठी दिलेल्या ३० हजाराच्या मदतीमुळे तब्बल 3,19000 रू. इतकी रक्कम जमा झाली असून यातील 2, 50,000 रक्कम फिक्स डिपॉझिट तर इतर दशक्रियाविधी च्या खर्चासह सुपूर्द करण्यात आली आहे.

  सविस्तर असे कि, तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुटुंबातील तरुण कै.विलास देसाई हा दोन महिन्यापूर्वी महावितरण विद्युत प्रवाह असलेल्या तारेला चिटकून दुर्दैवी निधन झाले होते त्याच्या वडिलांचे अकरा महिन्यापूर्वीच निधन झाले होते, त्यात घरामधील एकटा कमवता असलेला तरुण मुलगा गेल्याने  मयत विलासची आई, पत्नी, २ मुली व १ मुलगा यांच्यापुढे आभाळ च फाटले होते.मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने पत्रकार देविदास देसाई व कृष्णा देसाई यांनी सुचविल्या प्रमाणे नाशिक येथील गणगोत ग्रुपचे ॲडमिन राहुल क्षीरसागर व नाऊर येथील पत्रकार संदिप जगताप ग्रुप ॲडमिन असलेले स्वामी सहजानंद भारती या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या सह पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देविदास देसाई यांच्या सर्वांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख 89 हजार इतकी रोख रक्कम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून थोर देणगीदारांच्या सहकार्याने जमा करण्यात आली. तसेच ठाणे येथील उद्योजक मंगेश जी नवले यांनी मयत विलासच्या घराला छत नसल्याने तत्परतेने ३० हजाराची मदत करून घरावरील अँगल , पत्रे व इतर वस्तु घेऊन दिल्याने मोठा आधार निर्माण झाला.

    या कुंटूबाच्या मदतीसाठी ग्रामविकास अधिकारी टी.के. जाधव, राहुल क्षीरसागर पत्रकार संदिप जगताप कृष्णा देसाई  यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन अनेकांना अवाहन करून १०० रुपयापासुन २ ते ५ हजारापर्यंत मदत जमा करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जाधव यांचेकडे ७१६०४ रु तर  मयत विलास च्या १० वी च्या गृपच्या माध्यमातुन १०९११ रु तर पत्रकार संदिप जगताप ५३०१२ तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांची घरासाठी ३० हजाराची मदत तर पत्रकार देविदास देसाई यांच्या माध्यमातुन तब्बल १, ५०००० अशी एकूण ३ लाख १९ हजाराची मदत उपलब्ध झाल्याने "सोशल मिडियातुन - सोशल वर्क" राज्यात आदर्श ठरणार असुन एखाद्या गरीब कुंटूबासाठी चांगले काम केल्याने सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget