मंगळवार दि २६ रोजी बेलापूरची ग्रामसभा सरपंच महेंद्र साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली.यावेळी निरीक्षक म्हणून पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, उपसरपंच अभिषेक खंडागळे,भरत साळुंके,रविंद्र खटोड,सुधीर नवले,सुधाकर खंडागळे,रणजित श्रीगोड,चंद्रकांत नाईक,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा केली.बेलापूरची लोकसंख्या जास्त असल्याने कचरा मोठ्याप्रमाणात जमा होतो. तो नदीकाठी टाकला जातो त्यामुळे प्रवरा नदीचे पावित्र्य धोक्यात आलेले आहे.म्हणून घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्प तात्काळ उभा करणे,जुनाट झालेल्या पाणी योजनांची दुरुस्ती करणे अथवा नवीन करणे, आवश्यक त्या ठिकाणी रस्ते,गटारी तयार करणे आदी विषयावर साधक बाधक चर्चा झाली.गावात घनकचरा व्यवस्थापन कामाची चर्चा अनेक वर्षांपासून सूरु आहे मात्र कार्यवाही होत नसल्याची खंत जेष्ठ नेते सुधाकर खंडागळे यांनी व्यक्त केली.यावर यादृष्टीने प्रयत्नशिल असल्याचा खुलासा ग्रामपंंचायतीकडून करण्यात आला.
कामांचे टेंडर देतांना ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता,३३ टक्के मजूर सोसायटी व ३४ टक्के खुले असे देणे बंधनकारक असतांना तसे होत नाही.असा आरोप विरोधी गटाचे भरत साळुंके व सुधीर नवले यांनी केला.त्यावर सर्व टेंडर नियमात दिले असल्याचा खुलासा सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला.शेवटी तंबाखू व धूम्रपान करणार नाही अशी शपथ ग्रामस्थांना देण्यात आली.विषयपञिकेवरील आमचा गाव आमचा विकास,कोविड नियमांचे पालन करुन शाळा सुरु करणे,जलजीवन मिशन, नविन घरकुल बांधकामे,यासह विविध विकास कामांचा आढावा आदी विषयांवर चर्चा होवून विषयांना मंजुरी देण्यात आली.
Post a Comment