श्रीरामपूर (वार्ताहर) तेथील महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात रविवारदिनांक 24 10 2021 रोजी दुपारी दोन वाजता कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्र दान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते अध्यक्षपदाची सुचना पत्रकार कासम शेख यांनी मांडलि त्याला अनुमोदन असलम बिनसाद यांनी दिले कार्यक्रमास पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर प्रदेश युवा कार्याध्यक्ष संदीप पवार अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार सलाउद्दीन शेख पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष हनिफ भाई तांबोळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड शहराध्यक्ष रियाज पठाण बेलापूर शाखाप्रमुख एजाज
सय्यद श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम शेख श्रीरामपूर तालुका संघटक राज महंमद शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शेख बरकत आली ,हनिफ भाई तांबोळी , सलाउद्दीन शेख असलम बिनसाद, कासम भाई शेख ,हाजी इस्माईल भाई शेख, एजाज सय्यद, आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या व मदतीचा हात उंचावणाऱ्या बेलापूर गावातील समाजसेवक व डॉक्टरांना यावेळी कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संघामध्ये नव्याने दाखल झालेले अनिता तिडके ,समीना शेख ,अश्विनी अहिरे ,व अमन शेख यांना शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यात अनिता तिडके यांना अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष तर समीना शेख यांना अहमदनगर महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर अश्विनी आहिरे यांना श्रीरामपूर तालुका महिला संघटक पदी तर अमन शेख यांना राहुरी तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले कोरोना योद्धा सन्मानित हाजी इस्माईल शेख यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की कोरोना काळात मी व माझ्यासारख्या अनेक लोकांनी मोठे मन करून रुग्णांना सहकार्य केले तसेच गोरगरीब व गरजू लोकांना किराणा सामानाचे व इतर साहित्याचे किट वाटप केले या काळात अनेकांनी को बीड सेंटरला भरीव मदत केली अशा लोकांच्या कार्याचा आढावा घेतापत्रकार संघाने कोरोना योद्धा या सन्मान पत्राने सन्मानित करून सर्वांचे मनोधैर्य वाढविले आहे
पत्रकार संघाच्या या स्त्रूत्य कार्याचे आपण कौतुक करीत असून या सन्मानाबद्दल मी पत्रकार संघाचा आभारी आहे असे ते म्हणाले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत अली म्हणाले की पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रात मोठ्या गतीने होत असून ठीक ठिकाणी
आपण दिलेले जिल्हाध्यक्ष व झोनल अध्यक्ष व त्यांच्या अंतर्गत काम करणारे शहर व तालुका अध्यक्ष प्रामाणिकपणे काम करीत असून पत्रकार संघाचा विस्तार करणे हे त्यांचे लक्ष्य आहे पत्रकारांनी सत्यता पडताळून बातम्या प्रसिद्ध केल्यास पत्रकार अडचणीत येणार नाही परंतु अशा प्रामाणिक पत्रकारांनी बातमी
छापल्याचा रोष धरून कोणी पत्रकारांना मारहाण करीत असेल किंवा त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारितेवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असेल अशा वेळेस पत्रकार संघ त्या पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्याचे सामर्थ्य वाढविण्याचे व त्याला न्याय मिळवून देण्याचे काम करतो पत्रकार संघ हा पत्रकारांचा सुरक्षा कवच असल्याने संघातील कोणत्याही पत्रकाराने घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही पत्रकारांनी निर्भयपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे आमची साथ अशा पत्रकारांना शेवटपर्यंत मिळेल याची गवाही आपण या ठिकाणी देत आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी बेलापूर शाखेचे उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद पत्रकार रमेश शिरसाट पत्रकार नदीम शेख राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी पत्रकार अहमद शेख पत्रकार जावेद के शेख यांच्यासमवेत तालुक्यातील छोट्या वृत्तपत्रांचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचे आभार पुणे शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी यांनी मानले.
Post a Comment