श्रीरामपूर (वार्ताहर) शिर्डी येथील दैनिक साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी यांचे विरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा चौकशी करून मागे घेण्यात यावा या मागणीकरिता महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने दि 23 10 2021 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय विभाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष आसलम बिनसाद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर बेलापूर येथील शाखाप्रमुख एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका संघटक राज मोहम्मद शेख श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख बेलापूर शहर संघटक मोहम्मद अली शेख पत्रकार रिजवान शेख कुमारी अश्विनी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते सदरील निवेदनात नमूद करण्यात आले की साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी हे गेल्या अनेक वर्षापासून साई भक्तांच्या व जनतेच्या अडचणींबाबत निर्भीडपणे वृत्तपत्रातून लिखाण करीत आहेत त्यांच्या लिखाणामुळे दुखावलेल्या लोकांनी लोक चंदानी यांच्या लिखाणावर व पत्रकारितेवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पोलीस स्टेशनला चंदानी यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे अशाप्रकारे षड् यंत्र रचणाऱ्या अधिकारी व पुढाऱ्यांचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ निषेध नोंदवित असून या प्रकरणी त्वरित चौकशी होऊन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा पस्वरूपाचेत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Post a Comment