महीला बालकल्याण व वंचित घटकांच्या विकासासाठी वचनबध्द- सरपच महेंद्र साळवी.

बेलापूरः(प्रतिनिधी  )- बेलापूर ग्रामपंचायत महिला व बालकल्याण तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी वचनबध्द असून त्यासाठी ग्रामपंचायतने कृतीशील आराखडा बनविला असल्याची माहिती सरपंच महिन्द्र साळवी यांनी दिली. बेलापूर ग्रामपंचायतीने महिला,वंचित घटक तसेच बाल सभेचे सावता मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,ग्रामसेवक राजेन्द्र तगरे,सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाराटे,ज्येष्ठ पञकार देवीदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलिप दायमा ,पोलिस पाटील अशोक प्रधान आदि प्रमुख उपस्थित होते.     यावेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सदर ग्रामसभेविषयी सविस्तर विवेचन केले.ते म्हणाले की,गावाची बहुसंख्या महिलां व वंचित घटकांची आहे.त्यामुळे या घटकाच्या विकासासाठी विविध शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.महिला,  वंचित घटक व बालकांच्या विकास योजनांचा सर्वकष आराखडा मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल.बालविकासासाठीही विविध शासकीय योजनांसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील असे श्री.खंडागळे यांनी स्पष्ट केले. पञकार देवीदास देसाई यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन मौलिक सुचना व मार्गदर्शन केले.सभेत आमचा गाव आमचा विकास आराखडा,कुपोषित बालक आढावा,जलजीवन मिशन,घरकुल योजना,महिला वाचनालय,बचत गट नविन स्थापना आदिवर चर्चा झाली. सभेस महिला नागरिक,महिला बाचत गटाच्या प्रतिनिधी,अंगणवाडी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget