सोशल मिडीयातुन सोशल वर्क मयताच्या कुटुंबीयांना मिळाला तीन लाख रुपये मदतीचा हात.

बेलापुर ( देविदास देसाई ) - श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील महावितरणच्या विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून मयत झालेल्या नाऊर येथील अतिशय गरीब कुटुंबातील कै.विलास अशोक देसाई( वय 40 ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, शिवाय घरात एकुलता एक कमविता असल्याने त्याच्या कुटुंबापुढे मोठे संकट उभे ठाकले होते.मात्र नाशिक येथील गणगोत ग्रृप व श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारती सोशल मीडियाच्या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घराच्या कामासाठी दिलेल्या ३० हजाराच्या मदतीमुळे तब्बल 3,19000 रू. इतकी रक्कम जमा झाली असून यातील 2, 50,000 रक्कम फिक्स डिपॉझिट तर इतर दशक्रियाविधी च्या खर्चासह सुपूर्द करण्यात आली आहे.

  सविस्तर असे कि, तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुटुंबातील तरुण कै.विलास देसाई हा दोन महिन्यापूर्वी महावितरण विद्युत प्रवाह असलेल्या तारेला चिटकून दुर्दैवी निधन झाले होते त्याच्या वडिलांचे अकरा महिन्यापूर्वीच निधन झाले होते, त्यात घरामधील एकटा कमवता असलेला तरुण मुलगा गेल्याने  मयत विलासची आई, पत्नी, २ मुली व १ मुलगा यांच्यापुढे आभाळ च फाटले होते.मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने पत्रकार देविदास देसाई व कृष्णा देसाई यांनी सुचविल्या प्रमाणे नाशिक येथील गणगोत ग्रुपचे ॲडमिन राहुल क्षीरसागर व नाऊर येथील पत्रकार संदिप जगताप ग्रुप ॲडमिन असलेले स्वामी सहजानंद भारती या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या सह पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देविदास देसाई यांच्या सर्वांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख 89 हजार इतकी रोख रक्कम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून थोर देणगीदारांच्या सहकार्याने जमा करण्यात आली. तसेच ठाणे येथील उद्योजक मंगेश जी नवले यांनी मयत विलासच्या घराला छत नसल्याने तत्परतेने ३० हजाराची मदत करून घरावरील अँगल , पत्रे व इतर वस्तु घेऊन दिल्याने मोठा आधार निर्माण झाला.

    या कुंटूबाच्या मदतीसाठी ग्रामविकास अधिकारी टी.के. जाधव, राहुल क्षीरसागर पत्रकार संदिप जगताप कृष्णा देसाई  यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन अनेकांना अवाहन करून १०० रुपयापासुन २ ते ५ हजारापर्यंत मदत जमा करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जाधव यांचेकडे ७१६०४ रु तर  मयत विलास च्या १० वी च्या गृपच्या माध्यमातुन १०९११ रु तर पत्रकार संदिप जगताप ५३०१२ तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांची घरासाठी ३० हजाराची मदत तर पत्रकार देविदास देसाई यांच्या माध्यमातुन तब्बल १, ५०००० अशी एकूण ३ लाख १९ हजाराची मदत उपलब्ध झाल्याने "सोशल मिडियातुन - सोशल वर्क" राज्यात आदर्श ठरणार असुन एखाद्या गरीब कुंटूबासाठी चांगले काम केल्याने सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget