Latest Post

श्रीरामपूर (वार्ताहर) शिर्डी येथील दैनिक साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी यांचे विरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा चौकशी करून मागे घेण्यात यावा या मागणीकरिता महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने दि 23 10 2021 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय विभाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष आसलम बिनसाद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर बेलापूर येथील शाखाप्रमुख एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका संघटक राज मोहम्मद शेख श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख बेलापूर शहर संघटक मोहम्मद अली शेख पत्रकार रिजवान शेख कुमारी अश्विनी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते सदरील निवेदनात नमूद करण्यात आले की साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी हे गेल्या अनेक वर्षापासून साई भक्तांच्या व जनतेच्या अडचणींबाबत निर्भीडपणे वृत्तपत्रातून लिखाण करीत आहेत त्यांच्या लिखाणामुळे दुखावलेल्या लोकांनी लोक चंदानी यांच्या लिखाणावर व पत्रकारितेवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पोलीस स्टेशनला चंदानी यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे अशाप्रकारे षड् यंत्र रचणाऱ्या अधिकारी व पुढाऱ्यांचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ निषेध नोंदवित असून या प्रकरणी त्वरित चौकशी होऊन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा पस्वरूपाचेत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


बेलापूरः(प्रतिनिधी  )- बेलापूर ग्रामपंचायत महिला व बालकल्याण तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी वचनबध्द असून त्यासाठी ग्रामपंचायतने कृतीशील आराखडा बनविला असल्याची माहिती सरपंच महिन्द्र साळवी यांनी दिली. बेलापूर ग्रामपंचायतीने महिला,वंचित घटक तसेच बाल सभेचे सावता मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,ग्रामसेवक राजेन्द्र तगरे,सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाराटे,ज्येष्ठ पञकार देवीदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलिप दायमा ,पोलिस पाटील अशोक प्रधान आदि प्रमुख उपस्थित होते.     यावेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सदर ग्रामसभेविषयी सविस्तर विवेचन केले.ते म्हणाले की,गावाची बहुसंख्या महिलां व वंचित घटकांची आहे.त्यामुळे या घटकाच्या विकासासाठी विविध शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.महिला,  वंचित घटक व बालकांच्या विकास योजनांचा सर्वकष आराखडा मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल.बालविकासासाठीही विविध शासकीय योजनांसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील असे श्री.खंडागळे यांनी स्पष्ट केले. पञकार देवीदास देसाई यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन मौलिक सुचना व मार्गदर्शन केले.सभेत आमचा गाव आमचा विकास आराखडा,कुपोषित बालक आढावा,जलजीवन मिशन,घरकुल योजना,महिला वाचनालय,बचत गट नविन स्थापना आदिवर चर्चा झाली. सभेस महिला नागरिक,महिला बाचत गटाच्या प्रतिनिधी,अंगणवाडी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बेलापुर ( देविदास देसाई ) - श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील महावितरणच्या विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून मयत झालेल्या नाऊर येथील अतिशय गरीब कुटुंबातील कै.विलास अशोक देसाई( वय 40 ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, शिवाय घरात एकुलता एक कमविता असल्याने त्याच्या कुटुंबापुढे मोठे संकट उभे ठाकले होते.मात्र नाशिक येथील गणगोत ग्रृप व श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारती सोशल मीडियाच्या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घराच्या कामासाठी दिलेल्या ३० हजाराच्या मदतीमुळे तब्बल 3,19000 रू. इतकी रक्कम जमा झाली असून यातील 2, 50,000 रक्कम फिक्स डिपॉझिट तर इतर दशक्रियाविधी च्या खर्चासह सुपूर्द करण्यात आली आहे.

  सविस्तर असे कि, तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुटुंबातील तरुण कै.विलास देसाई हा दोन महिन्यापूर्वी महावितरण विद्युत प्रवाह असलेल्या तारेला चिटकून दुर्दैवी निधन झाले होते त्याच्या वडिलांचे अकरा महिन्यापूर्वीच निधन झाले होते, त्यात घरामधील एकटा कमवता असलेला तरुण मुलगा गेल्याने  मयत विलासची आई, पत्नी, २ मुली व १ मुलगा यांच्यापुढे आभाळ च फाटले होते.मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने पत्रकार देविदास देसाई व कृष्णा देसाई यांनी सुचविल्या प्रमाणे नाशिक येथील गणगोत ग्रुपचे ॲडमिन राहुल क्षीरसागर व नाऊर येथील पत्रकार संदिप जगताप ग्रुप ॲडमिन असलेले स्वामी सहजानंद भारती या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या सह पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देविदास देसाई यांच्या सर्वांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख 89 हजार इतकी रोख रक्कम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून थोर देणगीदारांच्या सहकार्याने जमा करण्यात आली. तसेच ठाणे येथील उद्योजक मंगेश जी नवले यांनी मयत विलासच्या घराला छत नसल्याने तत्परतेने ३० हजाराची मदत करून घरावरील अँगल , पत्रे व इतर वस्तु घेऊन दिल्याने मोठा आधार निर्माण झाला.

    या कुंटूबाच्या मदतीसाठी ग्रामविकास अधिकारी टी.के. जाधव, राहुल क्षीरसागर पत्रकार संदिप जगताप कृष्णा देसाई  यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन अनेकांना अवाहन करून १०० रुपयापासुन २ ते ५ हजारापर्यंत मदत जमा करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जाधव यांचेकडे ७१६०४ रु तर  मयत विलास च्या १० वी च्या गृपच्या माध्यमातुन १०९११ रु तर पत्रकार संदिप जगताप ५३०१२ तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांची घरासाठी ३० हजाराची मदत तर पत्रकार देविदास देसाई यांच्या माध्यमातुन तब्बल १, ५०००० अशी एकूण ३ लाख १९ हजाराची मदत उपलब्ध झाल्याने "सोशल मिडियातुन - सोशल वर्क" राज्यात आदर्श ठरणार असुन एखाद्या गरीब कुंटूबासाठी चांगले काम केल्याने सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-ग्रामपंचायतीचा जसजसा वसुल होईल त्या प्रमाणे मागासवर्गीय निधी व इतर निधीचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येईल आसे अश्वासन गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी दिल्यामुळे आपल्या उचित मागण्यासाठी दलीत बांधवांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले             ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ न दिल्याच्या निषेधार्थ विजय शेलार संजय शेलार भाऊसाहेब तेलोरे यांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर   उपोषण सुरु केले होते  ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक जावेद शेख अय्याज सय्यद अकील बागवान अनिल पवार हारुन शेख भुषण चंगेडीया यांनी उपोषणास पाठींबा दर्शविला होता प्रज्ञा तेलोरे सिमा हिरण जाईबाई तेलोरे मिना पारखे हिराबाई मोरे  सिमा तेलोरे दामीनी गायकवाड  चंदाबाई खरात सुभीद्रा खरात लता तेलोरे बेबी अमोलीक मंगल साठे रोहण शेलार रमेश शेलार विजु तेलोरे नितीन तेलोरे राहुल तेलोरे हे ही उपोषण कर्त्याबरोबर उपोषणास बसले होते  दलीत समाजाने आपल्या योग्य मागण्यासाठी सुरु केलेल्या उपोषणाची आमदार लहु कानडे यांनी तातडीने दखल घेवुन या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सुचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस टि पी ओ आर डी अभंग हे बेलापुर येथे आले त्यांनी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्याशी चर्चा केली त्या वेळी निधी अभावी मागासवर्गीयांच्या निधीचे वाटप करता आले नसल्याचे तगरे यांनी गटविकास अधिकारी धस यांच्या निदर्शनास आणून दिले त्या वेळी जसा निधी उपलब्ध होईल तसे १५ % मागासवर्गीय निधीचे वाटप करण्यात येईल असे अश्वासन गटविकास अधिकारी धस यांनी उपोषणकर्त्यांना दिले या अश्वासनावर उपोषणकर्त्याचे समाधान झाल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगीत करण्याचा निर्णय घेतला.

श्रीरामपूर प्रतिनिधी- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.) 1 अशोक काशिनाथ शिंदे 

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2.  मंगल कचरू गायकवाड

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3.   बाप्पू नागू गायकवाड

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू  किमतीची 35  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4.    अर्जुन दौलत फुलारे

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी  दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,88,000/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पो. स्टे.  येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे  श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे गोंधवणी येथील महिलां कडून Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके , ASIराजेंद्र आरोळे,. पो. कॉ. नितीन शिरसाठ,  व आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ न दिल्याच्या निषेधार्थ बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दलीत बांधवांनी  उपोषण सुरु केले असुन निधी वाटप न करण्याची कारणमीमांसा दर्शविणारा फलक ग्रामपंचायतीच्या वतीने शेजारीच लावण्यात आला आहे                                         कोरोनाच्या परिस्थितीत हाताला काम नाही त्यात दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबाला ग्रामपंचायत मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ देणे अपेक्षित होते बेलापुर ग्रामपंचायतीने दलीत बांधवांना १४ लाख रुपये देणे आवश्यक असताना शिल्लक नसल्याच्या नावाखाली दलीत बांधवांना या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप विजय शेलार  यांनी केला असुन निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने का होईना सण लक्षात घेता वाटप करावे असेही शेलार म्हणाले या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड भरत साळूंके चंद्रकांत नाईक सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक अय्याज सय्यद उपस्थित होते दलीत समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंडप टाकुन उपोषण सुरु करण्यात आले आहे तर त्या मंडपा शेजारीच

बेलापुर ग्रामपंचायतीने हिशोबाचा लेखा जोखाच फलकाच्या माध्यमातून नागरीकासमोर मांडला आहे त्यात  म्हटले आहे की सन २०१९-२०२० या काळात मागील सत्ताधाऱ्यांनी १५ लाख ७५ हजार रुपये वाटप करणे गरजेचे होते ते केले गेले नाही १० वर्षापासुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी कुठलेही प्रयत्न केले गेले नाही दर चार वर्षांनी फेर आकारणी होणे गरजेचे असताना ते केले नाही मागील काळात व्यापारी व ईतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी देणे बाकी रकमा दिलेल्या आहेत सन २०-२१ काळातील महीला व बालकल्याण १० % निधी व अपंग कल्याण ५ % निधीचे वाटप करण्यात आलेले आहे बेलापुर ग्रामपंचायतीला कर्मचारी पगार गणवेश बोनस मागासवर्गीय निधी अपंग कल्याण निधी महीला बाल कल्याण निधी वाटपासाठी २५ लाख रुपयांची गरज असुन ग्रामपंचायतीकडे केवळ ७० हजार रुपयेच शिल्लक असल्याचे फलकात नमुद करण्यात आलेले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- महाराष्ट्र पोलीस हे २४ तास नागरीकांना सेवा देत असुन आपल्या कुटुंबापासून दुर राहुन आपला जिव धोक्यात घालून समाजसेवा करणाऱ्या पोलीस खात्याला मी वंदन करतो अशा शब्दात जि प सदस्य शरद नवले यांनी पोलीसाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या                                        पोलीस स्मृती दिनानिमित्त बेलापुर ग्रामपंचायत ,बेलापुर पत्रकार ,व ग्रामस्थांच्या वतीने कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याकरीता तसेच कार्यरत पोलीस बांधवांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते .या वेळी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक म्हणाले की गुन्हेगारीची लवकर उकल करणारे महाराष्ट्र पोलीस हे राज्यात अघाडीवर आहे .दुसऱ्याचे कुटुंब वाचविण्यासाठी आपला जिव धोक्यात घालुन नागरीकांना सेवा देणारे हे पोलीस दादा आहेत .ते आपली काळजी घेतात आपलीही जबाबदारी आहे त्यांची काळजी घेण्याची. कोरोना काळात सर्व जण घरात असताना पोलीस दादा आपले कर्तव्य बजावत रस्त्यावर उभा होता बेलापुर पोलीसांचे काम देखील अतिशय चांगले असुन रात्रीच्या गस्तीसाठी त्यांना चार चाकी वाहन गरजेचे आहे तसेच बेलापुर पोलीस चौकीची इमारत देखील सुस्थितीत असणे आवश्यक आहे तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या मार्फत येथील पोलीस ईमारतीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस दादांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो असेही नाईक म्हणाले. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई  तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे महावितरणचे चेतन जाधव अकबर टिनमेकरवाले यांनीही शहीद पोलीस बांधवांना श्रध्दांजली अर्पण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या या वेळी ग्रामपंचायत  सदस्य मुस्ताक शेख अजिज शेख पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम शफीक आतार बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरिष पानसंबळ पोपट भोईटे  निखील तमनर महेश ओहोळ महेश कुऱ्हे केशव कुऱ्हे  सचिन वाघ शोएब शेख सुनिल साळूंके रफीक शेख  आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget