बेलापुर (प्रतिनिधी )- महाराष्ट्र पोलीस हे २४ तास नागरीकांना सेवा देत असुन आपल्या कुटुंबापासून दुर राहुन आपला जिव धोक्यात घालून समाजसेवा करणाऱ्या पोलीस खात्याला मी वंदन करतो अशा शब्दात जि प सदस्य शरद नवले यांनी पोलीसाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस स्मृती दिनानिमित्त बेलापुर ग्रामपंचायत ,बेलापुर पत्रकार ,व ग्रामस्थांच्या वतीने कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याकरीता तसेच कार्यरत पोलीस बांधवांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते .या वेळी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक म्हणाले की गुन्हेगारीची लवकर उकल करणारे महाराष्ट्र पोलीस हे राज्यात अघाडीवर आहे .दुसऱ्याचे कुटुंब वाचविण्यासाठी आपला जिव धोक्यात घालुन नागरीकांना सेवा देणारे हे पोलीस दादा आहेत .ते आपली काळजी घेतात आपलीही जबाबदारी आहे त्यांची काळजी घेण्याची. कोरोना काळात सर्व जण घरात असताना पोलीस दादा आपले कर्तव्य बजावत रस्त्यावर उभा होता बेलापुर पोलीसांचे काम देखील अतिशय चांगले असुन रात्रीच्या गस्तीसाठी त्यांना चार चाकी वाहन गरजेचे आहे तसेच बेलापुर पोलीस चौकीची इमारत देखील सुस्थितीत असणे आवश्यक आहे तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या मार्फत येथील पोलीस ईमारतीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस दादांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो असेही नाईक म्हणाले. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे महावितरणचे चेतन जाधव अकबर टिनमेकरवाले यांनीही शहीद पोलीस बांधवांना श्रध्दांजली अर्पण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या या वेळी ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख अजिज शेख पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम शफीक आतार बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरिष पानसंबळ पोपट भोईटे निखील तमनर महेश ओहोळ महेश कुऱ्हे केशव कुऱ्हे सचिन वाघ शोएब शेख सुनिल साळूंके रफीक शेख आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment