बेलापुर (प्रतिनिधी )- ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ न दिल्याच्या निषेधार्थ बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दलीत बांधवांनी उपोषण सुरु केले असुन निधी वाटप न करण्याची कारणमीमांसा दर्शविणारा फलक ग्रामपंचायतीच्या वतीने शेजारीच लावण्यात आला आहे कोरोनाच्या परिस्थितीत हाताला काम नाही त्यात दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबाला ग्रामपंचायत मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ देणे अपेक्षित होते बेलापुर ग्रामपंचायतीने दलीत बांधवांना १४ लाख रुपये देणे आवश्यक असताना शिल्लक नसल्याच्या नावाखाली दलीत बांधवांना या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप विजय शेलार यांनी केला असुन निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने का होईना सण लक्षात घेता वाटप करावे असेही शेलार म्हणाले या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड भरत साळूंके चंद्रकांत नाईक सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक अय्याज सय्यद उपस्थित होते दलीत समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंडप टाकुन उपोषण सुरु करण्यात आले आहे तर त्या मंडपा शेजारीच
बेलापुर ग्रामपंचायतीने हिशोबाचा लेखा जोखाच फलकाच्या माध्यमातून नागरीकासमोर मांडला आहे त्यात म्हटले आहे की सन २०१९-२०२० या काळात मागील सत्ताधाऱ्यांनी १५ लाख ७५ हजार रुपये वाटप करणे गरजेचे होते ते केले गेले नाही १० वर्षापासुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी कुठलेही प्रयत्न केले गेले नाही दर चार वर्षांनी फेर आकारणी होणे गरजेचे असताना ते केले नाही मागील काळात व्यापारी व ईतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी देणे बाकी रकमा दिलेल्या आहेत सन २०-२१ काळातील महीला व बालकल्याण १० % निधी व अपंग कल्याण ५ % निधीचे वाटप करण्यात आलेले आहे बेलापुर ग्रामपंचायतीला कर्मचारी पगार गणवेश बोनस मागासवर्गीय निधी अपंग कल्याण निधी महीला बाल कल्याण निधी वाटपासाठी २५ लाख रुपयांची गरज असुन ग्रामपंचायतीकडे केवळ ७० हजार रुपयेच शिल्लक असल्याचे फलकात नमुद करण्यात आलेले आहे.
Post a Comment