Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- माननीय नगराध्यक्ष अनुराधाताई यादी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीचे युवा शहर उपाध्यक्ष फजल शेख यांनी संजय नगर परिसरातील मुळे प्राथमिक शाळा श्रीरामपूर ईदगाह रोड या ठिकाणी व्हॅक्सिनेशन शिबिर घेतले. या ठिकाणी नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या सहकारी टीमच्या सहाय्याने संजय नगर इदगाह परिसर या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी घरोघरी जाऊन विनंती व जनजागृती करून त्यांची नोंदणी करून त्यांना कोरोना चे सर्व नियमांसह लाइन लावून व्हॅक्सिनेशन

करून घेताना नगरसेवक राजेंद्र पवार सह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी सहा वाजेपर्यंत  700 च्या पुढे नागरिकांना व्हॅक्सिनेशन करून घेतले या कामाबद्दल त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुकच केले यावेळी सुरज सोनवणे,जावेद ईनामदार,अबूबकर बिनसाद ,शशिकांत खरात, सलीम पठाण ,अक्षय साळवे ,शुभम पवार, समी ईनामदार,सचिन गवळी व नगरपालिका चे आरोग्य विभाग कर्मचारी यांनी नागरिकांना उपस्थित राहून चांगली सुविधा दिली.



मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक,अहमदनगर व मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके व त्यांचेपथकातील पोहेकॉ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. दत्तात्रय हिंगडे, पोना संदीप दरंदले, पोकॉ. राहुल सोळंके, पोकां.रोहिदास नवगिरे, पोकॉ. शिवाजी ढाकणे, पोकॉ. आकाश काळे असे अवैध धंदयावर कारवाई करणेकामी स्वतंत्रपPथक तयार करुन कारवाईचा आदेश दिल्याने पारनेर पो स्टे हददीत विशेष मोहीम राबवून सोमवार दि.०५/१०/२०२१ रोजी ०५ ठिकाणी छापे टाकून एकूण २३,०००/-रु. किं. चा मुद्देमाल त्यामध्ये गावठीहातभटटीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ५ आरोपी विरुध्द पारनेर पोलीस टाण्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

१) पारनेर पो.स्टे. गुरनं. १७०८/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३,०००/-रु. किं, ची गावटी हातभटटीची तयार दारु,आरोपीचे नांव- बजाबा अमृता दिघे रा. वडझिरे, ता.पारनेर

२) पारनेर पो.स्टे. गुरनं. । ७०९/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३५००/-/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु,आरोपीचे नांव. संतोष शंकर मोरे रा. वडझिरे, ता.पारनेर

३) पारनेर पो.स्टे. गुरनं. १७१०/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३०००/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु आरोपीचे नांव. १. जनाबाई शंकर लंके रा. वडझिरे, ता.पारनेर

४) पारनेर पो.स्टे. गुरनं. ७११ /२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- २५००/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु आरोपीचे नांव- १. शाम दामू मलके रा. वडझिरे, ता.पारनेर (फरार)

५) पारनेर पो.स्टे. गुरनं. १७१२ /२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ११०००/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु आरोपीचे नांव- १. जयवंत आणा गायकवाड रा. देविभोयरे, ता.पारनेर

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेव, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री.सौरभकमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व श्री. अजित पाटील साहेब,उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.








बेलापुर  (प्रतिनिधी  )-माणसातील माणूसकी संपत असली तरी एखाद्या मुक्या प्राण्याला जिव लावला तर तो ही प्राणी आपल्यावर तितकेच प्रेम करतो अशीच एक घटना संक्रापुर तालुका राहुरी येथे घडली असुन मालक मयत झाल्यानंतर त्यांची पाळीव कुत्री दररोज त्यांच्या फोटोजवळ जावुन बसत आहे.तीन वर्षापूर्वी कुणीतरी शिर्डी येथुन कुत्रे पकडून ते संक्रापुर येथे आणून सोडले त्यात हे कुत्रीचे पिलू होते. ते संक्रापुर येथील धर्माजी धोंडीबा चव्हाण यांच्या घराजवळ राहु लागले. काही दिवसातच धर्माजी चव्हाण यांना त्या कुत्रीचा लळा लागला .ती घरात, परिसरात घाण करु लागल्यामुळे धर्माजी चव्हाण यांची मुले नानासाहेब व दादासाहेब हे त्या कुत्रीचा रागराग करु लागले .परंतु धर्माजी चव्हाण यांनी मुलांची सुनांची समजुत काढली अन त्या कुत्रीचे पालन

पोषण केले तीचे नाव सोनी ठेवले आज ती सोनी तीन वर्षाची झाली आहे तिचे पालन पोषण करणारे तिचे मालक धर्माजी चव्हाण यांचे अचानक निधन झाले त्यांच्या निधनाच्या तीन दिवस सोनीने काहीच खाल्ले नाही परंतु ही बाब घरच्यांच्या लक्षात आली नाही. वडील आजारी पडल्यामुळे नानासाहेब व दादासाहेब तसेच घरातील सर्व मंडळी त्याच्या देखभाली करीता तैनात असल्यामुळे सोनीकडे कुणी पाहीलेच नाही. परंतु ती मुकाट्याने अश्रू ढाळत होती अखेर धर्माजी चव्हाण यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधीही उरकण्यात आला त्या नंतर  धर्माजीचा फोटो घरात ठेवण्यात आला त्यापुढे दिवा लावण्यात आला अन ती सोनी सरळ त्या फोटोपुढे नतमस्तक होवुन अश्रू ढाळत बसली. सुरुवातीला घरातील कुणालाही काही वाटले नाही परंतु ती सोनी सारखी धर्माजी चव्हाण यांच्या फोटो समोर येवुन बसु लागली अन मग घरातील लोकांना या मुक्या प्राण्याच्या भावनेचा, दुःखाचा अंदाज आला .आपल्या भावना आपण व्यक्त करु शकतो परंतु मुक्या प्राण्याला देखील  आपल्या सारख्याच भावना असतात .


श्रीरामपूर प्रतिनिधी महाराष्ट्र लघु वृत्त  पत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघात तीन लोकांना समाविष्ट करण्यात आले. या वेळी रामगड येथील राज मोहम्मद रसूल शेख ,यांची श्रीरामपूर तालुका संघटक पदीनिवड करण्यात आली.तसेच  गोंधवणी रोड झी रंगे मळा येथीलपूजा प्रकाश अहिरे यांची श्रीरामपूर शहर महिला उपाध्यक्ष पदी व अश्विनीआहिरे यांची श्रीरामपूर तालुका महिला संघटक पदी निवड करण्यात आली असून यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी या तिघांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीरामपूरतालुका कार्याध्यक्ष ,कासम शेख,बेलापूर शहर प्रमुख ,एजाज सय्यद,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,आमीर भाई जहागीरदार व संस्थेचे अध्यक्ष यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्षबरकत आली शेख,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमीर जहागीरदार शहर प्रमुख रियाज खान पठाण,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष,सुभाष गायकवाड महाराष्ट्र महा सचिव ,फकीर मोहम्मद शेख,श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष ,कासम शेख,समाज सेवक, कार्यकर्ते,अमीर बेग मिर्झा ,बेलापूरशहर प्रमुख,एजाज सय्यद,बेलापूर शहर ,उप प्रमुख मोहम्मद अली सय्यद ,बेलापूर शहर खजिनदार सलीम शेख बेलापूर शहर सचिव शफिक शेख, बेलापूर शहर संघटक ,मुसा सय्यद सदस्य ,रसूल सय्यद भामाठाण ,व मोहम्मद गौरी आदी उपस्थित होते.



बेलापूर =(प्रतिनिधी) पत्रकार हा समाजाचा आरसा असतो जनतेच्या चांगल्या किंवा वाईट बातम्यांना प्रसिद्धी देणे हे पत्रकारांचे कर्तव्य असते सत्तेवर राहून कामे करीत असताना आमच्या हातूनही चुका घडू शकतात अशा वेळेस आमच्या चुकांवर पांघरुन टाकण्याऐवजी पत्रकारांनी त्या जनतेसमोर मांडाव्यात त्याचबरोबर आमच्या हातून घडलेल्या चांगल्या कामाचा विसर पडू न देता त्यास प्रसिद्धी देण्याचे काम देखील पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन बेलापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले दि 04/0 9/2021 रोजी दुपारी एक वाजता गावातील नगर रोडवर महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शहर महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघा च्या बेलापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व फलकाचे अनावरण महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  बरकत अली शेख यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बेलापूर चे उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामुक्ती अध्यक्ष ,पुरुषोत्तम भराटे ग्रामसेवक राजेश तगरे पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज भाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक  कासम शेख यांनी केले. त्यावेळेस सर्वांचा सत्कार करण्यात आला . यावेळी आपल्या प्रमुख भाषणात अभिषेक खंडागळे पुढे म्हणाले की कोरोना ची पहिली लाट व दुसऱ्या लाटे च्या वेळी रुग्णांना या महामारी पासून वाचविणे करिता ग्रामपंचायत च्या वतीने आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या त्यावेळी पत्रकारांनी मदतीचा हात म्हणून आमच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा केली आहे विशेष म्हणजे या काळात रुग्णसेवेचे कार्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची पावती म्हणून पत्रकार संघाच्या वतीने दोन महिन्यापूर्वी कोरोना योद्धा हे मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अर्थातच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने विधायक कार्य केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे अशा सर्व पत्रकारांना आम्ही हवी असलेली मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत असे त्यांनी सांगितले बेलापूर येथील महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या शाखेचे बेलापूर शहर प्रमुख, एजाज सय्यद, उपप्रमुख मोहम्मद अली सय्यद, बेलापूर शहर सचिव, शफिक शेख, बेलापूर शहर खजिनदार, सलीम शेख, बेलापूर शहर संघटक मुसा सय्यद, या संघाचे श्रीरामपूर  तालुका कार्य अध्यक्ष,कासम शेख, रसूल सय्यद, भामाठाण, मोहम्मद गौरी सदस्य, तसेच रामगड येथील मतदार संघाचे नवनिर्वाचित तालुका कार्याध्यक्ष राज मोहम्मद शेख व इतर पत्रकार तसेच रामगड येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा भाई नारळ वाले आदी लोक उपस्थित होते उपस्थितांचे आभार तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख यांनी मानले.



बेलापूर  ( प्रतिनिधी ) -  बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.           डॉ.कोकाटे यांना यापूर्वीही अठरा पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना अध्यापन क्षेत्रातील २१ वर्षांचा अध्यापन अनुभव असून गेल्या दोन वर्षांपासून त्या  प्रभारी प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचे प्रशासकीय काम पाहत आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या व ग्रंथ अन्वेषक आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रशासकीय, शैक्षणिक, साहित्यिक,संशोधन,महिला सक्षमीकरण,सामाजिक, सांस्कृतिक  या विविध क्षेत्रात केलेल्या या सेवा कार्याबद्दल त्यांचा उचित सन्मान केला गेला आहे. स्व.पै.किसनराव नाना डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री. नवनाथ युवा मंडळ,धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.या कार्यक्रमात धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे व कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.आझादी का अमृत महोत्सवा निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धा घेण्यात आल्या.पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मेगा रन स्पर्धा घेण्यात आल्या . मतदार जागृती अभियाना अंतर्गत निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखूसेवन विषय दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणावर ऑनलाइन घरगुती देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभही आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला पारनेरचे आमदार  निलेश लंके,अभिनेते मोहनराव गटणे,नाना डोंगरे, डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले..या कार्यक्रमात लोकनेते निलेश लंके यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा गुंड,दिलीप पवार, रामदास भोर,संभाजीराजे दहातोंडे,प्रशांत गायकवाड,ज्ञानदेव पांडूळे,आबापाटील सोनवणे, सुनिल पैठणे, डॉ.शैलेंद्र भणगे,रुपाली जाधव आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम  संपन्न झाला ..सदर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन निमगाव वाघा येथिल डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा नाना किसन डोंगरे यांनी केले तर नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालयातील सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोनाचे रुग्ण वाढु लागल्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव कारेगावा बेलापुर खूर्द ही तीन गावे दिनांक ४ आँक्टोंबर पासुन १० आँक्टोंबर पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले  यांनी दिले आहे  श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव बेलापुर खूर्द कारेगाव या तीन गावात १० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होवु नये या करीता खबरदारीचा उपाय म्हणून ही तीन गावे पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे आपल्या आदेशात त्यांनी पुढे म्हटले आहे की  अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोबीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.ज्या अर्थी, संदर्भ क्र.४ अन्वये राज्यातील कोविड -19 ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अदयापहीको विड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकामी ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरुन या कार्यालयाकडील संदर्भ क्र.६ चे आदेशान्वये आहमदनगर जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपायायोजनांबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्याअर्थी, जिन्हयामध्ये दैनंदीन रित्या 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधीत रुग्ण संख्या आढळून येत आहे. तसेच जिल्हयाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. संदर्भ क्र. 7 अन्वये जिल्हयातील 20 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये Containment Zone जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त देणे, जनता कफ्युच्या माध्यमातून गावबंदी करणे, कोविड ऑपरोप्रायट बिहेवीअरची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, ग्रेसीव्ह टेस्टिंग करणे, गावातील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करणे बाबतची तपासणी करणेकामी अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली होती. ज्याअर्थी, संदर्भ क्र. 8 अन्वये बैठकीमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रूग्णसंख्या असणाया गावांच्या ठिकाणी Containment Zone घोषीत करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत घटना व्यवस्थापक यांना निर्देशीत करण्यात आलेले होते. तथापी, 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असणा-या गावांमध्ये Containment Zone घोषीत करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. त्यास्तव, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडील दिनांक 02/10/2021 रोजीच्या जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुजणसंख्या असणा-या गावांध्या प्राप्त यादीतील गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्याअथीं, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत माणसंख्या असणा-या खालील तक्त्यात गेल्या तालुक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 04/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून दिनांक 13/10/12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत या आदेशाद्वारे आदेशीत करीत आहे. सदरच्या क्षेत्रामध्ये जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर रोखण्याकामी गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत सणसंख्या असणा-या. सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. 4. Entry - Exit points चे ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवा व जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात यावा. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणा-या वाहनांच्या चालकांचे विलगीकरण करावे. विलगीकरण कक्षांची व्यवस्था स्थानिक प्राधिकरणाने करावी,Entry - Evil points चे ठिकाणी ये-जा करणा-या व्यक्तींची थर्मल स्कॅनरदबारे स्क्रिनिंग करण्यात यावी.कंट्रोल रूम मध्ये रजिस्टर ठेवून प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबींचा पुरवठा होणे कामी सदर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी 8.00 ते सकाळी 11.00 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी राहिल. संबंधीत किराणा दुकान मालक व कामगार यांनी कोबीड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे तसेच दुकानाचे मालक, कर्मचारी व ग्राहकांनी मास्कचा व सॉनिटायझरचा वापर करणे तसेच सामाजीक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहिल. सदर बाबींचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास तहसिलदार यांनी सदरचे दुकान 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत बंद करावे,दुध संकलन केंद्राव्दारे शेतक-यांच्या निवास वा दुधाळ जनावरे असलेल्या ठिकाणावरुन दुध संकलन करण्यात यावे. संबंधीतांनी मास्कचा व सॉनिटायझरचा वापर करणे तसेच सामाजीक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहिल. दुधाचे व्दार संकलन शक्य नसल्यास संकलन केंद्राच्या ठिकाणी कोवौड सुसंगत वर्तनाचं पालन करुन दूध संकलन कराने, तहसिलदार यांनी सदर संकलन केंद्रावर कोवीड सुसंगत वर्तनाचे पालन होणेबाबत उपनिबंधक (सहकार) यांचे सहाय्याने योग्य व्यक्तीची नेमणूक करावी व सदर ठिकाणी कोबीड सुसंगत वर्तनाचे उल्लंघन आढळल्यास अशा संकलन केंद्रास पुढील 30 दिवस दुध संकलनास मनाई करावी,उपरोक्त गावाच्या ठिकाणच्या सर्व शाळा व धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील..पोलीस विभागाने स्थानिक प्राधिकरणांच्या मदतीने सर्व पर्यायी रस्ते बंद कस्न Entry - exit points Movabie Baricades दद्वारे खुले ठेवावेत. सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्वप्रकारच्या वाहनांना सदरचे गाव ओलांडून पूढे जावयाचे असल्यास सदर गावामध्ये न थांबण्याच्या अटीवरपूढे जाण्यास परवानगी राहील.उपरोक्त गावाच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निबंध आणणे आवश्यक ठरले आहे. तहसिलदार यांनी कॉन्टॅक्ट ट्रेनिंग करणे व कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग करणेकामी  नेमणुक करावी. कोबीड रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींनी तपासणीस प्रशासनास सहकार्य करणे बंधनकारक राहील...उपरोक्त गावाच्या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाने आरोग्य विभागाचे मदतीने 18 वर्षावरील व्यक्तीचे प्राधान्याने लसीकरण करावे,कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत तसेच गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रैनी, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील..उपरोक्त गावाच्या ठिकाणी लग्न समारंभास मनाई राहील.उपरोक्त गावाच्या ठिकाणी तहसिलदार यांना पूर्वकल्पना देवून अंत्यविधी! दशक्रिया विधी यासाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.असेही आदेशात म्हटले आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget