डाँक्टर गुंफां कोकाटे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित आमदार लंके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

बेलापूर  ( प्रतिनिधी ) -  बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.           डॉ.कोकाटे यांना यापूर्वीही अठरा पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना अध्यापन क्षेत्रातील २१ वर्षांचा अध्यापन अनुभव असून गेल्या दोन वर्षांपासून त्या  प्रभारी प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचे प्रशासकीय काम पाहत आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या व ग्रंथ अन्वेषक आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रशासकीय, शैक्षणिक, साहित्यिक,संशोधन,महिला सक्षमीकरण,सामाजिक, सांस्कृतिक  या विविध क्षेत्रात केलेल्या या सेवा कार्याबद्दल त्यांचा उचित सन्मान केला गेला आहे. स्व.पै.किसनराव नाना डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री. नवनाथ युवा मंडळ,धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.या कार्यक्रमात धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे व कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.आझादी का अमृत महोत्सवा निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धा घेण्यात आल्या.पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मेगा रन स्पर्धा घेण्यात आल्या . मतदार जागृती अभियाना अंतर्गत निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखूसेवन विषय दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणावर ऑनलाइन घरगुती देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभही आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला पारनेरचे आमदार  निलेश लंके,अभिनेते मोहनराव गटणे,नाना डोंगरे, डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले..या कार्यक्रमात लोकनेते निलेश लंके यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा गुंड,दिलीप पवार, रामदास भोर,संभाजीराजे दहातोंडे,प्रशांत गायकवाड,ज्ञानदेव पांडूळे,आबापाटील सोनवणे, सुनिल पैठणे, डॉ.शैलेंद्र भणगे,रुपाली जाधव आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम  संपन्न झाला ..सदर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन निमगाव वाघा येथिल डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा नाना किसन डोंगरे यांनी केले तर नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालयातील सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget