बेलापुर (प्रतिनिधी )- कोरोनाचे रुग्ण वाढु लागल्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव कारेगावा बेलापुर खूर्द ही तीन गावे दिनांक ४ आँक्टोंबर पासुन १० आँक्टोंबर पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहे श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव बेलापुर खूर्द कारेगाव या तीन गावात १० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होवु नये या करीता खबरदारीचा उपाय म्हणून ही तीन गावे पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे आपल्या आदेशात त्यांनी पुढे म्हटले आहे की अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोबीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.ज्या अर्थी, संदर्भ क्र.४ अन्वये राज्यातील कोविड -19 ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अदयापहीको विड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकामी ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरुन या कार्यालयाकडील संदर्भ क्र.६ चे आदेशान्वये आहमदनगर जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपायायोजनांबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्याअर्थी, जिन्हयामध्ये दैनंदीन रित्या 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधीत रुग्ण संख्या आढळून येत आहे. तसेच जिल्हयाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. संदर्भ क्र. 7 अन्वये जिल्हयातील 20 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये Containment Zone जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त देणे, जनता कफ्युच्या माध्यमातून गावबंदी करणे, कोविड ऑपरोप्रायट बिहेवीअरची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, ग्रेसीव्ह टेस्टिंग करणे, गावातील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करणे बाबतची तपासणी करणेकामी अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली होती. ज्याअर्थी, संदर्भ क्र. 8 अन्वये बैठकीमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रूग्णसंख्या असणाया गावांच्या ठिकाणी Containment Zone घोषीत करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत घटना व्यवस्थापक यांना निर्देशीत करण्यात आलेले होते. तथापी, 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असणा-या गावांमध्ये Containment Zone घोषीत करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. त्यास्तव, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडील दिनांक 02/10/2021 रोजीच्या जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुजणसंख्या असणा-या गावांध्या प्राप्त यादीतील गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्याअथीं, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत माणसंख्या असणा-या खालील तक्त्यात गेल्या तालुक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 04/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून दिनांक 13/10/12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत या आदेशाद्वारे आदेशीत करीत आहे. सदरच्या क्षेत्रामध्ये जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर रोखण्याकामी गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत सणसंख्या असणा-या. सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. 4. Entry - Exit points चे ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवा व जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात यावा. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणा-या वाहनांच्या चालकांचे विलगीकरण करावे. विलगीकरण कक्षांची व्यवस्था स्थानिक प्राधिकरणाने करावी,Entry - Evil points चे ठिकाणी ये-जा करणा-या व्यक्तींची थर्मल स्कॅनरदबारे स्क्रिनिंग करण्यात यावी.कंट्रोल रूम मध्ये रजिस्टर ठेवून प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबींचा पुरवठा होणे कामी सदर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी 8.00 ते सकाळी 11.00 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी राहिल. संबंधीत किराणा दुकान मालक व कामगार यांनी कोबीड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे तसेच दुकानाचे मालक, कर्मचारी व ग्राहकांनी मास्कचा व सॉनिटायझरचा वापर करणे तसेच सामाजीक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहिल. सदर बाबींचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास तहसिलदार यांनी सदरचे दुकान 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत बंद करावे,दुध संकलन केंद्राव्दारे शेतक-यांच्या निवास वा दुधाळ जनावरे असलेल्या ठिकाणावरुन दुध संकलन करण्यात यावे. संबंधीतांनी मास्कचा व सॉनिटायझरचा वापर करणे तसेच सामाजीक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहिल. दुधाचे व्दार संकलन शक्य नसल्यास संकलन केंद्राच्या ठिकाणी कोवौड सुसंगत वर्तनाचं पालन करुन दूध संकलन कराने, तहसिलदार यांनी सदर संकलन केंद्रावर कोवीड सुसंगत वर्तनाचे पालन होणेबाबत उपनिबंधक (सहकार) यांचे सहाय्याने योग्य व्यक्तीची नेमणूक करावी व सदर ठिकाणी कोबीड सुसंगत वर्तनाचे उल्लंघन आढळल्यास अशा संकलन केंद्रास पुढील 30 दिवस दुध संकलनास मनाई करावी,उपरोक्त गावाच्या ठिकाणच्या सर्व शाळा व धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील..पोलीस विभागाने स्थानिक प्राधिकरणांच्या मदतीने सर्व पर्यायी रस्ते बंद कस्न Entry - exit points Movabie Baricades दद्वारे खुले ठेवावेत. सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्वप्रकारच्या वाहनांना सदरचे गाव ओलांडून पूढे जावयाचे असल्यास सदर गावामध्ये न थांबण्याच्या अटीवरपूढे जाण्यास परवानगी राहील.उपरोक्त गावाच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निबंध आणणे आवश्यक ठरले आहे. तहसिलदार यांनी कॉन्टॅक्ट ट्रेनिंग करणे व कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग करणेकामी नेमणुक करावी. कोबीड रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींनी तपासणीस प्रशासनास सहकार्य करणे बंधनकारक राहील...उपरोक्त गावाच्या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाने आरोग्य विभागाचे मदतीने 18 वर्षावरील व्यक्तीचे प्राधान्याने लसीकरण करावे,कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत तसेच गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रैनी, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील..उपरोक्त गावाच्या ठिकाणी लग्न समारंभास मनाई राहील.उपरोक्त गावाच्या ठिकाणी तहसिलदार यांना पूर्वकल्पना देवून अंत्यविधी! दशक्रिया विधी यासाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.असेही आदेशात म्हटले आहे.
Post a Comment