बेलापूर (प्रतिनिधी)-समाजाशी एकरूप होवून सामाजिक बांधिलकी ठेवून कोणत्याही क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीचा सत्कार व सन्मान केल्याने काम करणार्या व्यक्तीला उर्जा,प्रोत्साहन व पाठबळ मिळाल्याने समाज्याचे अधिकाधिक काम त्यांच्या हातुन घडत असते असे प्रतिपादन कृषी-उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे यांनी गळनिंब विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले.अध्यक्षस्थानी प्रवरा सह.बॅंकेचे व्हा.चेअरमन बापूसाहेब वडितके होते. यावेळी पद्मभूषन बाळासाहेब विखे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी लक्ष्मण रामजी चिंधे यांची तर कामगार तलाठी श्री.वायखिंडे यांची मंडलाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल नवीन कामगार तलाठी म्हणून रूजू झाल्याबद्दल सौ.नाईक मॅडम,वस्तीशाळेच्या उपमुख्यध्यापिका सौ.अंत्रे मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्यामुळे तसेच पंचायत समितीच्या बचत गटाच्या गट प्रमुखपदी सौ.ज्योती कोर्हाळे,तसेच कृषी सहाय्यक श्री.पाटील साहेब,दिपक बेलकर,संतोष पारखे,संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्र्ट मुंबई श्रीरामपूर संघटकपदी पत्रकार संदिप शेरमाळे यांची निवड झाल्याने तसेच कुरणपूर विविध कार्य.सेवा संस्थेच्या व्हा.चेअरमन पदी पुंजाहरी चिंधे यांची निवड झाल्याने,विकास तुपे हे फॅशन हेअर कटींग मध्ये उत्तीर्ण झाल्याने यावेळी सत्कार कण्यात आले. यावेळी पुणे विद्यापीठचे मा.सिनेट सदस्य प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर,आण्णासाहेब कडनोर,इंजि.सोहम चिंधे,संजय कुदनर,डाॅ.सुनिल चिंधे,आदींची भाषणे झाली. यावेळी मुळा प्रवरा वीज संस्थेचे मा.संचालक जिजाबा वडितके, संस्थेचे चेअरमन केशव चिंधे,सोपानराव गवळी,पोपटराव हाळनोर,देवराम बाचकर,कैलास मारकड,विष्णू चिंधे,पंढरीनाथ भोसले,रामदास भोसले,केरूनाना शिंदे,तबाजी जाटे,ग्रा.पं.सदस्य संजय शिंदे,संजय बाहूले,दिपक जाटे,विष्णू कुदनर,आण्णासाहेब वडितके,प्रकाश जाटे,गणेश शिंदे,शिवाजी कोर्हाळे,सुरेश पिलगर,संदिप शेंडगे,मुरलिशेठ वधवानी,सागर चिंधे,संदिप कचरे,संस्थेचे सचिव हनुमान चिंधे,आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन संस्थेचे व्हा.चेअरमन बापू वडितके यांनी तर आभार विष्णू चिंधे यांनी मांडले.

Post a Comment