बेलापूर =(प्रतिनिधी) पत्रकार हा समाजाचा आरसा असतो जनतेच्या चांगल्या किंवा वाईट बातम्यांना प्रसिद्धी देणे हे पत्रकारांचे कर्तव्य असते सत्तेवर राहून कामे करीत असताना आमच्या हातूनही चुका घडू शकतात अशा वेळेस आमच्या चुकांवर पांघरुन टाकण्याऐवजी पत्रकारांनी त्या जनतेसमोर मांडाव्यात त्याचबरोबर आमच्या हातून घडलेल्या चांगल्या कामाचा विसर पडू न देता त्यास प्रसिद्धी देण्याचे काम देखील पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन बेलापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले दि 04/0 9/2021 रोजी दुपारी एक वाजता गावातील नगर रोडवर महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शहर महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघा च्या बेलापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व फलकाचे अनावरण महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बेलापूर चे उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामुक्ती अध्यक्ष ,पुरुषोत्तम भराटे ग्रामसेवक राजेश तगरे पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज भाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक कासम शेख यांनी केले. त्यावेळेस सर्वांचा सत्कार करण्यात आला . यावेळी आपल्या प्रमुख भाषणात अभिषेक खंडागळे पुढे म्हणाले की कोरोना ची पहिली लाट व दुसऱ्या लाटे च्या वेळी रुग्णांना या महामारी पासून वाचविणे करिता ग्रामपंचायत च्या वतीने आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या त्यावेळी पत्रकारांनी मदतीचा हात म्हणून आमच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा केली आहे विशेष म्हणजे या काळात रुग्णसेवेचे कार्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची पावती म्हणून पत्रकार संघाच्या वतीने दोन महिन्यापूर्वी कोरोना योद्धा हे मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अर्थातच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने विधायक कार्य केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे अशा सर्व पत्रकारांना आम्ही हवी असलेली मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत असे त्यांनी सांगितले बेलापूर येथील महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या शाखेचे बेलापूर शहर प्रमुख, एजाज सय्यद, उपप्रमुख मोहम्मद अली सय्यद, बेलापूर शहर सचिव, शफिक शेख, बेलापूर शहर खजिनदार, सलीम शेख, बेलापूर शहर संघटक मुसा सय्यद, या संघाचे श्रीरामपूर तालुका कार्य अध्यक्ष,कासम शेख, रसूल सय्यद, भामाठाण, मोहम्मद गौरी सदस्य, तसेच रामगड येथील मतदार संघाचे नवनिर्वाचित तालुका कार्याध्यक्ष राज मोहम्मद शेख व इतर पत्रकार तसेच रामगड येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा भाई नारळ वाले आदी लोक उपस्थित होते उपस्थितांचे आभार तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख यांनी मानले.
Post a Comment