मुक्या सोनीने जपली मालकाची कृतज्ञता मालकाच्या निधना नंतर फोटो समोर बसुन आहे सोनी.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-माणसातील माणूसकी संपत असली तरी एखाद्या मुक्या प्राण्याला जिव लावला तर तो ही प्राणी आपल्यावर तितकेच प्रेम करतो अशीच एक घटना संक्रापुर तालुका राहुरी येथे घडली असुन मालक मयत झाल्यानंतर त्यांची पाळीव कुत्री दररोज त्यांच्या फोटोजवळ जावुन बसत आहे.तीन वर्षापूर्वी कुणीतरी शिर्डी येथुन कुत्रे पकडून ते संक्रापुर येथे आणून सोडले त्यात हे कुत्रीचे पिलू होते. ते संक्रापुर येथील धर्माजी धोंडीबा चव्हाण यांच्या घराजवळ राहु लागले. काही दिवसातच धर्माजी चव्हाण यांना त्या कुत्रीचा लळा लागला .ती घरात, परिसरात घाण करु लागल्यामुळे धर्माजी चव्हाण यांची मुले नानासाहेब व दादासाहेब हे त्या कुत्रीचा रागराग करु लागले .परंतु धर्माजी चव्हाण यांनी मुलांची सुनांची समजुत काढली अन त्या कुत्रीचे पालन

पोषण केले तीचे नाव सोनी ठेवले आज ती सोनी तीन वर्षाची झाली आहे तिचे पालन पोषण करणारे तिचे मालक धर्माजी चव्हाण यांचे अचानक निधन झाले त्यांच्या निधनाच्या तीन दिवस सोनीने काहीच खाल्ले नाही परंतु ही बाब घरच्यांच्या लक्षात आली नाही. वडील आजारी पडल्यामुळे नानासाहेब व दादासाहेब तसेच घरातील सर्व मंडळी त्याच्या देखभाली करीता तैनात असल्यामुळे सोनीकडे कुणी पाहीलेच नाही. परंतु ती मुकाट्याने अश्रू ढाळत होती अखेर धर्माजी चव्हाण यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधीही उरकण्यात आला त्या नंतर  धर्माजीचा फोटो घरात ठेवण्यात आला त्यापुढे दिवा लावण्यात आला अन ती सोनी सरळ त्या फोटोपुढे नतमस्तक होवुन अश्रू ढाळत बसली. सुरुवातीला घरातील कुणालाही काही वाटले नाही परंतु ती सोनी सारखी धर्माजी चव्हाण यांच्या फोटो समोर येवुन बसु लागली अन मग घरातील लोकांना या मुक्या प्राण्याच्या भावनेचा, दुःखाचा अंदाज आला .आपल्या भावना आपण व्यक्त करु शकतो परंतु मुक्या प्राण्याला देखील  आपल्या सारख्याच भावना असतात .


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget