Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकुण १२ गावे येत असुन या १२ गावात आत्तापर्यत २११५७ नागरीकांना कोवीड लसीकरण करण्यात आले असल्याची माहीती आरोग्याधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी दिली आहे                                          लसीकरणा बाबत माहीती देताना डाँक्टर देविदास चोखर यांनी सांगितले की सुरुवातीला कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जात होते लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून टोकन पध्दत सुरु केली बेलापुर गावात सुरु झालेली टोकन पध्दत नंतर  जिल्ह्यात सुरु झाली टोकण पध्दतीमुळे आपापसात होणारी वादावादी कमी झाली सुरुवातीला लस घेण्याकरीता नागरीकात भितीचे वातावरण होते लसीकरण केल्यावर त्रास होतो या गैरसमजामुळे नागरीक लस घेत नव्हते परंतु हा गैरसमज दुर झाल्यावर नागरीक स्वेच्छेने लसीकरण केंद्रावर येवु लागले बेलापुर केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावोगाव जावुन लसीकरण करण्यास सुरुवात केली या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला नंतर वाडौया वस्त्यावर जावुन लसीकरण सुरु केले जे नागरीक वयोवृध्द आहेत बेडवर आहेत अशा नागरीकांना घरी जावुन लसीकरण दिले जात आहे हेल्थ वर्कर यांना पहीला डोस ९२ नागरीकांना तर दुसरिरा डोस ६३ नागरीकांना देण्यात आलाफ्रंट लाईन वर्कर यांना पहीला डोस ११९३ नागरीकांना दिला तर दुसरा डोस १०१८नागरीकांना दिला  १८ ते ४४ दरम्यानच्या नागरीकांना पहीला डोस ८८७४ नागरीकांना देण्यात आला तर दुसरा डोस ४४४नागरीकांना देण्यात आला ४५ ते ६० वयोगटातील नागरीकांना पहीला डोस ४५२२ नागरीकांना देण्यात आला तर दुसरा डोस २०३३नागरीकांना देण्यात आला ६० वर्षावरील नागरीकासाठी पहीला डोस ३०७९ नागरीकांना दिला तर दुसरा डोस १७०९ नागरीकांना असे एकुण २११५७ नागरीकांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे या कामाकरीता दोन वैद्यकीय अधिकारी पाच समुदाय अधिकारी सहा आरोग्य सेवीका तीन आरोग्या सेवक दोन सुपरवायजर दोन आशा सुपरवायजर व तीस आशा वर्कर या सर्वाच्या योगदानामुळे लसीकरण सुरळीत पारा पडत आहे या कामी जि प सदस्य शरद नवले पं स सदस्य अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड बाजार समितीचे संचालक सुधीर नवले तसेच गावातील पत्रकार यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहीती बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डाँक्टर चोखर यांनी दिली आहे.


बेलापुर (प्रतिनिधी  )-अहमदनगर उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगांव, सोनई परिसरामध्ये रात्रीचेवेळी शेतातील वस्तीवर दरोडे टाकून मारहाण करुन लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडण्यात गुन्हे अन्वेषन शाखा अहमदनगर व श्रीरामपुर शहर पोलीसांना यश आले असुन ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या गुन्हेगाराकडून अनेक गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे  आरोपीकडून २८लाखाचा मुद्देमाल जप्त.या बाबतची पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की, दि. २३सा संप्टेंबर/२०२१ रोजी रात्री  विराज उदय खंडागळे, वय-३८ वर्षे,धंदा- शेती, रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर हे आपल्या कुटूंबासह शेतातील बंगल्यामध्ये झोपलेले असताना अनोळखी चारचोरट्यांनी त्यांचे बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करुन लहान मुलाचे गळ्यास धारदार चाकू लावून वघरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देवून घरातील सोने चांदीचे दागिणे तसेच रोख रक्कम असा एकूण २,८२,०००/-रु.किं. चा ऐवज तसेच फिर्यादी यांचे जवळच राहणारे साक्षीदार सोमनाथ भागीरथ चिंतामणी यांचे घराचा दरवाजा तोडून त्यांनामारण्याची धमकी देवून त्यांचे घरातील २५,०००/-रु. रोख रक्कम असा एकूण ३,०७,०००/-रु. किं. चा ऐवज दरोडा टाकूनचोरुन नेला होता. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे गुरनं. १६६९/२०२१, भादवि कलम ३९४, ४५८, ३४ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापुर्वीही श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव यापरिसरामध्ये अशा प्रकारचेदरोड्याचे गुन्हे घडलेले असल्याने मा. पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचे आदेशाने श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हेउघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, वरील नमुद गुन्हा हासलाबतपूर, ता. नेवासा येथील सराईत गुन्हेगार सचिन भोसले व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून सचिन भोसले व त्याचा साथीदार अजय मांडवे हे चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमधून आलेलेआहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच श्रीरामपूर शहरपो.स्टे. चे अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने सलाबतपूर येथे जावून मिळालेल्या माहितीचेआधारे आरोपींचा शोध घेत असताना सलाबतपूर ते प्रवरा संगम जाणाऱ्या  रोडवर डॉ. योगेश वरगंटवार यांचे गोठ्याचे आडोशाला एका पांढरे रंगाचे कारजवळ दोन इसम संशईतरित्या उभे असलेले दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पोलीस पथक त्यांचे दिशेने जात असतानाच त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने त्यातील एक इसम बाजूस असलेल्याउसाचे शेतामध्ये पळून गेला, त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दुसऱ्या इसमास कारसह जागीच ताब्यात घेवूनत्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांस त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, अजय अशोकमांडवे, वय- २२ वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेवून वरील नमुद गुन्ह्याबाबतव गुन्ह्यातील चोरलेल्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे लागल्याने दोन पंचासमक्ष त्याचेकारची झडती घेतली असता त्याचे कारमधून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे त्यामध्ये राणीहार, गंठण, मणीमंगळसुत्र, कानातील मुंबर, अंगठ्या, चैन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ तसेच चांदीचे पायातील पैजण असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिणे तसेच स्विफ्ट कार व मोबाईल मिळून आल्याने ते पंचासमक्षजप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेल्या दागिण्याबाबत ताब्यात घेतलेला आरोपी अजय अशोक मांडवे याचेकडे कसून चौकशी केलीअसता त्याने सदरचे दागिणे हे त्याने व त्याचे साथीदार सचिन भोसले, प्रद्युम भोसले, डिच्चन भोसले, बयंग काळे, असिफ शेख, सर्व रा. सलाबतपुर, ता. नेवासा, बाबाखान भोसले, कृष्णा भोसले, रा. गोंडेगाव, ता. नेवासा, रुकुल चव्हाण, रा. शिरुर,ता. जि. पुणे, समीर उर्फ चिंग्या सय्यद, रा. मुकीदपुर, ता. नेवासा, रामसिंग भोसले, रा, गेवराई, ता. नेवासा, योगेश युवराजकाळे, रा. बिटकेवाडी, ता. कर्जत अशांनी मिळून मागील ५ ते ६ महीन्याचे कालावधीमध्ये निपाणी वडगाव, बेलापुर,बोंबलेनगर, खोकर, ता. श्रीरामपुर, शिर्डी, चांदा, सोनई, तरवळे वस्ती, हिवरे, ता. नेवासा, निमगाव, ता. शेवगाव, भिंगार अशावेगवेगळ्या ठिकाणाहून रात्रीचे वेळेस घराचे दरवाजे तोडून घरतील लोकांना मारहाण करुन चो-या करुन चोरुन आणलेअसल्याचे सांगीतल्याने आरोपीने दिलेल्या माहितीचे आधारे साथीदार आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे  प्रद्युम सुरेशभोसले, वय- १९ वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, समीर उर्फ चिंग्या राजु सय्यद, वय-२१ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ,नेवासा फाटा, ता. नेवासा, रामसिंग त्रिंबक भोसले, वय-३० वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, बाळासाहेब ऊर्फवयंग सुदमल काळे, वय-३४ वर्षे, रा. गेवराई, ता. नेवासा, योगेश युवराज काळे, वय- १९ वर्षे, रा. बिटकेवाडी, ता.कर्जत यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.नमुद ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे,स्विफ्ट कार, ७ मोबाईल व दोन मोटार सायकली असा एकूण २७,९२,५००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेलाआहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे सहा साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.गुन्हे उघडकीस आलेले आहेत.







बेलापुर  (प्रतिनिधी  )--कोरोना पेशंटची संख्या वाढल्याने बेलापूर खुर्द गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना समीतीने घेतला असुन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर खूर्द रेड झोनमध्ये येत असल्या कारणाने गाव बंद ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत तसेच व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची केलेली मागणी अमान्य करण्यात आली 

बेलापुर खुर्द या गावात जवळपास दहा कोरोना रुग्ण असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये त्या करीता गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते बँरेकेट्स लावून बंद करण्यात आले आहे गावातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवाही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गावातील व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली होती देवाण घेवाण वाढल्याने कोरोनाचा प्रसार होवू शकतो त्यामुळे सर्व व्यवसायीकांनी आपापले व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत


तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही बेलापुर खूर्द या गावात रुग्ण वाढत असल्यामुळे नागरीकांनी आपली काळजी आपणच घ्यावी मास्क वापरा हात साबणाने स्वच्छ धुवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा बाधीत व्यक्तींनी घरी न थांबता दवाखान्यात दाखल व्हावे असे अवाहनही तहसीलदार पाटील यांनी केले आहे 

बेलापूर खुर्द गावामध्ये कोरोना चे पेशंट वाढले असल्याने प्रशासनाने गाव सात तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून बेलापूर खुर्द गावातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना व्यवसाय सुरू ठेवण्यात यावे अशी विनंती केली तसे निवेदनही देण्यात आले होते . 

याप्रसंगी उपसरपंच ॲड. दीपक बारहाते, हरिहर केशव गोविंद संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास, दुकानदार सुधाकर बारहाते, श्याम बडदे, जगन्‍नाथ भगत आदी उपस्थित होते.

 बेलापुर खूर्द गावात आत्तापर्यत १५ रुग्ण आढळून आले असुन काही रुग्ण बरे झालेले आहेत बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत हे चुकीचे असले तरी काही रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत .गावात रँपीड टेस्ट करण्यात आल्या असुन रुग्ण असणाऱ्या परिसरात विशेष खबरदारी  घेत आहे अशी माहीती   डाँक्टर देविदास चोखर आरोग्याधिकारी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी दिली आहे

बेलापुर खूर्दला आज रोजी जास्त रुग्ण संख्या दिसत असली तरी यातील बरेचसे रुग्ण बरे झाले असुन केवळ दोन तीन जणच पाँजिटीव्ह आहेत शासनाकडे अहवाल उशीरा आलेला आहे तो पर्यत ते रुग्ण बरे झालेले होते रुग्ण आढळलेल्या परिसरातील सर्व नागरीकांच्या आरटीफीसीएल व रँपीड टेस्ट करुन घेतलेल्या आहेत गावात सर्वांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माही.ती उपसरपंच अँड दिपक बारहाते यांनी दिली.






बेलापूरः(प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व.भागवतराव खंडागळे यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह हरिहरनगर व  गावठाण येथे घरकुल वसाहत,खटकाळी बंधारा यासारखी विविध विकास कामे करुन गावाचे नाव उज्वल केले.त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. बेलापूर गावला वीस वर्षे नेतृत्व देवून गावाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे माजी सरपंच स्व.भागवतराव पा.खंडागळे यांची ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी गावच्या दिवंगत सरपंच व उपसरपंच यांची पुण्यतिथी ग्रामपंचायतीच्या वतीने साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.यानिमित्त भागवत प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास(रु.सात हजार),गावकरी आरोग्य निधीला(तिन हजार)तर माऊली वृध्दाश्रमास(दोन हजार)याप्रमाणे शरद नवले,प्रकाश नाईक,महेन्द्र साळवी,रवीन्द्र खटोड,भरत सोमाणी,शिवाजी वाबळे,पञकार देवीदास देसाई,दिलिप दायमा आदिंच्या हस्ते देणगी देण्यात आली.यानिमित्त जि.प.सदस्य शरद नवले,पं.समिती सदस्य अरुण पा.नाईक,भाजपाचे नेते सुनिल मुथा,सरपंच महेन्द्र साळवी,प्रवासी संघटनेचे  रणजित श्रीगोड, 'अशोक 'चे माजी व्हा.चेअरमन जालिंदर कु-हे पत्रकार देविदास देसाई  आदिंनी मनोगत व्यक्त करुन स्व.खंंडागळे यांच्या कार्याचा गौरव केला.उपसरपंच आभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक  तर सुधाकर खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.                              याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले,पंस सदस्य अरुण पा  नाईक,सरपंच महेंद्र साळवी,बेलापुर पत्रकार सांघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सुनील मुथ्था,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,प्रकाश नाईक,जालिंदर कु-हे,देविदास देसाई,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,प्रकाश नवले,विष्णुपंत डावरे,भाऊसाहेब कुताळ,भरत सोमाणी,प्रफुल्ल डावरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अजय डाकले,सुधाकर खंडागळे,शिवाजीराव वाबळे,पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा,किशोर कदम रामेश्वर सोमाणी,विश्वास अमोलीक,चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, किरण गागरे, प्रकाश  कुऱ्हे ,प्रसाद खरात,पोलीस पाटील अशोक प्रधान,यादव काळे,रफिक बागवान,गणेश बंगाळ,दादासाहेब आढाव,राजेंद्र अमोलिक, प्रभात कुऱ्हे  ,शफीक बागवान,गोरख कुताळ, अन्वर बागवान, अमोल गाढे, महेश कु ऱ्हे,भाऊसाहेब वाबळे,रमेश लगे,प्रशांत लड्डा, जिना शेख, चंद्रकांत नवले, प्रशांत मुंडलिक, मास्टर हुडे,किशोर खरोटे,जाकीर हसन शेख,कुंदन कुताळ,बाबूलाल पठाण, शशिकांत तेलोरे,गफूर शेख,जावेद शेख, बाळू शेलार, सागर लाहोर,जय संचेती आदिंसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर सुधाकर खंडागळे यांनी आभार मानले


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- शहरातील दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असुन तक्रार करुनही कुणीच दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ साई मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर तलवार यांनी भर रस्त्यावरच मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्के बांधकाम करण्याचा ईशारा दिला आहे                                  या बाबत पत्रकारांशी बोलताना सागर तलवार म्हणाले की शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढत आहे कुणाचाच त्यावर अंकुश राहीलेला नाही सत्ताधारी कुणाला दुःखावून आपले मत कमी करण्याच्या विचारात नाही तर विरोधकही अतिक्रमणाबाबत गप्प आहेत आता तर अनेक ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण होत आहे सर्वसामान्यांनी आता दाद कुणाकडे मागायची सत्ताधारी व विरोधक हे कुणालाही दुखवायच्या मनःस्थितीत नाही त्यामुळे जो तो आपल्या पुढाऱ्यांच्या आड दडून अतिक्रमण करत आहे या बाबत तक्रार करुनही काहीच उपयोग होत नाही त्यामुळे आता साई मित्र मंडळाच्या वातीने रस्त्यावरच पक्के बांधकाम करुन गाळा बांधण्याचा निर्णय आमच्या मंडळाने घेतला असुन नगरपालीकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या कार्यक्रमामुळे विरोध सत्ताधाऱ्यांना काही वाटले नाही तरी निदान अतिक्रमण करणारांना जनाची नाही तर मनाची थोडीफार वाटेल असेही तलवार यांनी म्हाटले आहे.


बेलापुर  (देविदास देसाई  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी गटाचे शनैश्वर जगताप हे २५७ मते मिळून विजयी झाले असुन त्यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले  उपाध्यक्ष पदी ईब्राहीम ईमाम शेख यांची बिनविरोध निवड झाली    तंटामूक्ती अध्यक्षाची निवड ही ग्रामसभेतुन सर्वानुमते घेण्याचा अधिकार हा सर्व ग्रामसभेला दिला असला तरी एकमत न झाल्यास काय करावयाचे? हे मात्र सांगितले गेले नाही त्यामुळे राहुरी तालुक्यात  तंटामूक्तीचा अध्यक्ष निवडण्यासाठी चक्क गुप्त मतदानाची पध्दत अवलंबविण्यात आली.राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावाच्या तंटामूक्त अध्यक्षाची निवड होण्याकरीता ग्रामसभा बोलविण्यात आली होती .मा. रामदास पांढरे यांच्या अध्क्षतेखाली ग्रामसभेत कामकाज झाले. तंटामुक्ती अध्यक्ष  निवडीबाबत एकमत न झाल्यानेगुप्त मतदानाने निवड करण्याचे ठरले  निवडणूकी प्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पडली राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावच्या तटामूक्ती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता परंतु गावात दोन्ही गट प्रबळ असल्यामुळे अध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते हात वर करुन अध्यक्ष निवडण्याचे ठरले परंतु त्यास अनेकांनी विरोध दर्शविला निवड ही गुप्त मतदान पध्दतीने घ्यावी असा सर्वानुमते निर्णय झाला अन सुरु झाली

गुप्त मतदानाची प्रक्रीया.  जगताप गटाच्या वतीने संक्रेश्वर महाविकास आघाडी  रोहीदास खपके यांनी अर्ज दाखल केला तर संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे पांढरे गटाच्या वतीने शनैश्वर जगताप यांनी अर्ज दाखल केला खपके यांना कपबशी तर जगताप यांंना छत्री हे चिन्ह देण्यत आले  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गायकवाड यांनी काम पाहीले मग काय तंटामूक्ती अध्यक्षाची निवडच तंट्यातून सुरु होवुन गुप्त मतदानावर संपली दोन्ही गटाच्या उमेद्वारांनी आपापली ताकद पणाला लावुन मतदार आणण्यासाठी चारचाकी दुचाकी वाहनाचा वापर सुरु केला   घरोघर जावुन मतदाराला गाडीत घालून मतदान  करवुन घेण्यासाठी दोन्ही गटाची चढाओढ सुरु झाली  एकुण ५०० मतदान झाले होते सायंकाळी चार  वाजता लगेच मतमोजणी करण्यात आली त्यात सरपंच रामा पांढरे यांच्या संक्लेश्वर   जनसेवा मंडळाचे शनैश्वर जगताप यांना २५७ मते मिळाली तर संजय जगताप यांच्या संक्लेश्वर महविकास आघाडीचे  उमेदवार रोहीदास खपके यांना २१० मते मिळाली १५ मते बाद झाली निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक काजल गायकवाड यांनी शनैश्वर जागताप यांना जास्त मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत केले   त्या करीता गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्ष पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान घेवुन मतदान प्रक्रीयेद्वारे तंटामूक्ती अध्यक्ष निवडणारे राहुरी तालुक्यातील संक्रापुर हे पहीले गाव ठरले आहे. ग्रामसभेत खालील ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी जाफर शेख सरपंच रामा पांढरे उपसरपंच विठ्ठल पांढरे सुदर्शन बोरावके महेश बोरावके दावल शेख आप्पासाहेब जगताप दिलावर शेख विजय गोसावी रमेश सालबंदे गोकुळ सालबंदे गेनु चव्हाण बापुसाहेब चव्हाण संभाजी जाधव रामदास जाधव विजय जाधव सोपान जगताप लक्ष्मण चव्हाण राधाजी चव्हाण धर्मा चव्हाण शशिकांत भोंगळे कांतीलाल जगताप संपत जगताप साहेबराव जगताप उदयपाल जाधव बाळासाहेब जाधव सांजय किसन जगताप राजेंद्र जगताप पंढरीनाथ जगताप काशिनाथ जगताप अनिल जगताप चांगदेव पांढरे साहेबराव पांढरे अंकुश गरगडे सुभाष गाडेकर काशिनाथ पांढरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते


बेलापुर  (देविदास देसाई  )- तंटामूक्ती अध्यक्षाची निवड ही ग्रामसभेतुन सर्वानुमते घेण्याचा अधिकार हा सर्व ग्रामसभेला दिला असला तरी एकमत न झाल्यास काय करावयाचे? हे मात्र सांगितले गेले नाही त्यामुळे राहुरी तालुक्यात  तंटामूक्तीचा अध्यक्ष निवडण्यासाठी चक्क गुप्त मतदानाची पध्दत अवलंबविण्यात आली असुन मतदान सुरु झाले आहे.राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावाच्या तंटामूक्त अध्यक्षाची निवड होण्याकरीता बैठक बोलविण्यात आली होती परंतु निवडीबाबत एकमत न झाल्यानेगुप्त मतदानाने निवड करण्याचे ठरले  निवडणूकी प्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पडणार असुन पाच वाजता मतमोजणी होणार आहे .राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावच्या तटामूक्ती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता परंतु गावात दोन्ही गट प्रबळ असल्यामुळे अध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते हात वर करुन अध्यक्ष निवडण्याचे ठरले परंतु त्यास अनेकांनी विरोध दर्शविला निवड ही गुप्त मतदान पध्दतीने घ्यावी असा सर्वानुमते निर्णय झाला अन सुरु झाली गुप्त मतदानाची प्रक्रीया.  जगताप गटाच्या वतीने संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे रोहीदास खपके यांनी अर्ज दाखल केला तर संक्रेश्वर विकास मंडळाचे पांढरे गटाच्या वतीने शनैश्वर जगताप यांनी अर्ज दाखल केला खपके यांना कपबशी तरा जगताप यांंना छत्री हे चिन्ह देण्यत आले  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गायकवाड यांनी काम पाहीले मग काय तंटामूक्ती अध्यक्षाची निवडच तंट्यातून सुरु होवुन गुप्त मतदानावर संपली दोन्ही गटाच्या उमेद्वारांनी आपापली ताकद पणाला लावुन मतदार आणण्यासाठी चारचाकी दुचाकी वाहनाचा वापर सुरु केला मतदारांना अमिषही दाखविण्यात आले  घरोघर जावुन मतदाराला गाडीत घालून मतदान  करवुन घेण्यासाठी दोन्ही गटाची चढाओढ सुरु झाली शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ७१९ मतदान झाले होते सायंकाळी पाच वाजता लगेच मतमोजणी होणार आहे त्या करीता गावात पोलीस बंदोबस्तही तैनातकरण्यात आला आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget