बेलापुर (प्रतिनिधी )-अहमदनगर उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगांव, सोनई परिसरामध्ये रात्रीचेवेळी शेतातील वस्तीवर दरोडे टाकून मारहाण करुन लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडण्यात गुन्हे अन्वेषन शाखा अहमदनगर व श्रीरामपुर शहर पोलीसांना यश आले असुन ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या गुन्हेगाराकडून अनेक गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे आरोपीकडून २८लाखाचा मुद्देमाल जप्त.या बाबतची पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की, दि. २३सा संप्टेंबर/२०२१ रोजी रात्री विराज उदय खंडागळे, वय-३८ वर्षे,धंदा- शेती, रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर हे आपल्या कुटूंबासह शेतातील बंगल्यामध्ये झोपलेले असताना अनोळखी चारचोरट्यांनी त्यांचे बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करुन लहान मुलाचे गळ्यास धारदार चाकू लावून वघरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देवून घरातील सोने चांदीचे दागिणे तसेच रोख रक्कम असा एकूण २,८२,०००/-रु.किं. चा ऐवज तसेच फिर्यादी यांचे जवळच राहणारे साक्षीदार सोमनाथ भागीरथ चिंतामणी यांचे घराचा दरवाजा तोडून त्यांनामारण्याची धमकी देवून त्यांचे घरातील २५,०००/-रु. रोख रक्कम असा एकूण ३,०७,०००/-रु. किं. चा ऐवज दरोडा टाकूनचोरुन नेला होता. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे गुरनं. १६६९/२०२१, भादवि कलम ३९४, ४५८, ३४ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापुर्वीही श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव यापरिसरामध्ये अशा प्रकारचेदरोड्याचे गुन्हे घडलेले असल्याने मा. पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचे आदेशाने श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हेउघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, वरील नमुद गुन्हा हासलाबतपूर, ता. नेवासा येथील सराईत गुन्हेगार सचिन भोसले व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून सचिन भोसले व त्याचा साथीदार अजय मांडवे हे चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमधून आलेलेआहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच श्रीरामपूर शहरपो.स्टे. चे अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने सलाबतपूर येथे जावून मिळालेल्या माहितीचेआधारे आरोपींचा शोध घेत असताना सलाबतपूर ते प्रवरा संगम जाणाऱ्या रोडवर डॉ. योगेश वरगंटवार यांचे गोठ्याचे आडोशाला एका पांढरे रंगाचे कारजवळ दोन इसम संशईतरित्या उभे असलेले दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पोलीस पथक त्यांचे दिशेने जात असतानाच त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने त्यातील एक इसम बाजूस असलेल्याउसाचे शेतामध्ये पळून गेला, त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दुसऱ्या इसमास कारसह जागीच ताब्यात घेवूनत्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांस त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, अजय अशोकमांडवे, वय- २२ वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेवून वरील नमुद गुन्ह्याबाबतव गुन्ह्यातील चोरलेल्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे लागल्याने दोन पंचासमक्ष त्याचेकारची झडती घेतली असता त्याचे कारमधून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे त्यामध्ये राणीहार, गंठण, मणीमंगळसुत्र, कानातील मुंबर, अंगठ्या, चैन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ तसेच चांदीचे पायातील पैजण असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिणे तसेच स्विफ्ट कार व मोबाईल मिळून आल्याने ते पंचासमक्षजप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेल्या दागिण्याबाबत ताब्यात घेतलेला आरोपी अजय अशोक मांडवे याचेकडे कसून चौकशी केलीअसता त्याने सदरचे दागिणे हे त्याने व त्याचे साथीदार सचिन भोसले, प्रद्युम भोसले, डिच्चन भोसले, बयंग काळे, असिफ शेख, सर्व रा. सलाबतपुर, ता. नेवासा, बाबाखान भोसले, कृष्णा भोसले, रा. गोंडेगाव, ता. नेवासा, रुकुल चव्हाण, रा. शिरुर,ता. जि. पुणे, समीर उर्फ चिंग्या सय्यद, रा. मुकीदपुर, ता. नेवासा, रामसिंग भोसले, रा, गेवराई, ता. नेवासा, योगेश युवराजकाळे, रा. बिटकेवाडी, ता. कर्जत अशांनी मिळून मागील ५ ते ६ महीन्याचे कालावधीमध्ये निपाणी वडगाव, बेलापुर,बोंबलेनगर, खोकर, ता. श्रीरामपुर, शिर्डी, चांदा, सोनई, तरवळे वस्ती, हिवरे, ता. नेवासा, निमगाव, ता. शेवगाव, भिंगार अशावेगवेगळ्या ठिकाणाहून रात्रीचे वेळेस घराचे दरवाजे तोडून घरतील लोकांना मारहाण करुन चो-या करुन चोरुन आणलेअसल्याचे सांगीतल्याने आरोपीने दिलेल्या माहितीचे आधारे साथीदार आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे प्रद्युम सुरेशभोसले, वय- १९ वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, समीर उर्फ चिंग्या राजु सय्यद, वय-२१ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ,नेवासा फाटा, ता. नेवासा, रामसिंग त्रिंबक भोसले, वय-३० वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, बाळासाहेब ऊर्फवयंग सुदमल काळे, वय-३४ वर्षे, रा. गेवराई, ता. नेवासा, योगेश युवराज काळे, वय- १९ वर्षे, रा. बिटकेवाडी, ता.कर्जत यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.नमुद ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे,स्विफ्ट कार, ७ मोबाईल व दोन मोटार सायकली असा एकूण २७,९२,५००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेलाआहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे सहा साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
Post a Comment