बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकुण १२ गावे येत असुन या १२ गावात आत्तापर्यत २११५७ नागरीकांना कोवीड लसीकरण करण्यात आले असल्याची माहीती आरोग्याधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी दिली आहे लसीकरणा बाबत माहीती देताना डाँक्टर देविदास चोखर यांनी सांगितले की सुरुवातीला कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जात होते लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून टोकन पध्दत सुरु केली बेलापुर गावात सुरु झालेली टोकन पध्दत नंतर जिल्ह्यात सुरु झाली टोकण पध्दतीमुळे आपापसात होणारी वादावादी कमी झाली सुरुवातीला लस घेण्याकरीता नागरीकात भितीचे वातावरण होते लसीकरण केल्यावर त्रास होतो या गैरसमजामुळे नागरीक लस घेत नव्हते परंतु हा गैरसमज दुर झाल्यावर नागरीक स्वेच्छेने लसीकरण केंद्रावर येवु लागले बेलापुर केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावोगाव जावुन लसीकरण करण्यास सुरुवात केली या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला नंतर वाडौया वस्त्यावर जावुन लसीकरण सुरु केले जे नागरीक वयोवृध्द आहेत बेडवर आहेत अशा नागरीकांना घरी जावुन लसीकरण दिले जात आहे हेल्थ वर्कर यांना पहीला डोस ९२ नागरीकांना तर दुसरिरा डोस ६३ नागरीकांना देण्यात आलाफ्रंट लाईन वर्कर यांना पहीला डोस ११९३ नागरीकांना दिला तर दुसरा डोस १०१८नागरीकांना दिला १८ ते ४४ दरम्यानच्या नागरीकांना पहीला डोस ८८७४ नागरीकांना देण्यात आला तर दुसरा डोस ४४४नागरीकांना देण्यात आला ४५ ते ६० वयोगटातील नागरीकांना पहीला डोस ४५२२ नागरीकांना देण्यात आला तर दुसरा डोस २०३३नागरीकांना देण्यात आला ६० वर्षावरील नागरीकासाठी पहीला डोस ३०७९ नागरीकांना दिला तर दुसरा डोस १७०९ नागरीकांना असे एकुण २११५७ नागरीकांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे या कामाकरीता दोन वैद्यकीय अधिकारी पाच समुदाय अधिकारी सहा आरोग्य सेवीका तीन आरोग्या सेवक दोन सुपरवायजर दोन आशा सुपरवायजर व तीस आशा वर्कर या सर्वाच्या योगदानामुळे लसीकरण सुरळीत पारा पडत आहे या कामी जि प सदस्य शरद नवले पं स सदस्य अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड बाजार समितीचे संचालक सुधीर नवले तसेच गावातील पत्रकार यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहीती बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डाँक्टर चोखर यांनी दिली आहे.
Post a Comment