शहरातील अस्वच्छतेप्रश्नी उपोषणाचा तीसरा दिवस प्रशासनाचा हेतुपुरस्सर दुर्लक्ष-जोयेफ जमादार.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पहिलेच नागरीक कोरोना महामारीने  त्रस्त झालेले आहेत त्यावर शहरातील  अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई आणि साथीच्या आजाराची साथीचा फैलाऊ होऊ शकतो, श्रीरामपूर नगर पालिकेच्या मार्फत घन-कचरा ठेकेदारास दर महिन्याला तब्बल ३० लाख रुपये मोजले जातात, मात्र शहरातील अस्वच्छता जशीच्या तशीच आहे,मग इतकी मोठी रक्कम मोजूनही जर कोणताच काम होत नसेल तर नगर पालिकेने हा ठेका रद्द करुन इतर दुसऱ्यास द्यावा, जेणे करुन शहरातील स्वच्छतेने नागरीकांचे आरोग्य आबाधित राहील,मात्र नगर पालिका प्रशासनासह संबंधित काही नगरसेवक आणि विद्यमान नगराध्यक्षांना केवळ ठेकेदार पोसण्याचे कामे करुन जनतेच्या करापोटी वसूल करण्यात

आलेली रक्कम ठेकेदारांच्या घशात टाकायची असल्याचे दिसून येत आहे,मग यामध्ये संबंधित अधिकारी यांचा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा  संशय देखील बळावत आहे. शहरवासियांच्या ज्वलंत सामाजिक आरोग्याप्रश्नी तथा संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी  समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा जे जे फौंडेशनचे जोएफ जमादार हे आपल्या कार्यकर्त्यांसह नगर पालिके समोर आमरण उपोषणास बसलेले आहेत,उपोषणाचा आज तीसरा दिवस असताना संबंधित नगर सेवक, नगराध्यक्षा आणि नगर पालिका प्रशासन कोणतीच ठोस भुमिका घेण्यासाठी पुढे धजावलेले नाहीत, याचाच अर्थ असा होतो की शहरातील नागरीकांच्या सामाजिक आरोग्याप्रश्नी त्यांना काही एक घेणे-देणे राहिले नाही,त्यांना केवळ ठेकेदार पोसण्यात स्वारस्य आहे, शहरातील अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई पसरुन जरी नागरीक आजारी पडले तरी आपण मात्र सुरक्षित आहोत असा त्यांचा भास असावा,मात्र शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगर पालिका प्रशासन आणि काही संधी साधू पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत शहरातील जागरुक नागरीक आवश्य त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी उपोषणकर्ते जोयफ जमादार यांनी सांगितले आहे,

आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त उपोषण स्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले तथा उपोषणकर्त्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आर्पण करत देशभक्तीपर गिते देखील मंद आवाजात वाजविण्यात आल्याने आतातरी झोपी गेलेल्या नगरपालिका प्रशासनास जाग येऊन संबंधित नागरी समस्याप्रकरणी ते तात्काळ उचित निर्णय घेतील असे शहरवासियांना वाटू लागले आहे.

या उपोषणास आमदार लहू कनडे, उपनगराध्यक्ष, करण ससाणे, कामगार नेते नागेशभाई सावंत, केतन खोरे,सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे, कॉंगेस शहराध्यक्ष संजय छल्लारे,मुन्ना पठान, रितेश ऐडके हनीफ पठान, विठ्ठल गोराणे,फिरोज पठान, चरन त्रिभुवन, शिवा साठे, फैय्याज बागवान, सागर दुपाटी, नगरसेवक रवि गुलाटी, नाजिर पिंजारी,प्रभाकर,जाकिर शाह, रईस शेख,कॉंगेस पक्ष,आम आदमी पार्टी,भारतीय लहुजी सेना,प्रहार जनशक्ति,R P I,भिम गर्जना सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी, मुसलिम ओबीसी, ऑर्गनाइजेशन,आदींनी आपला पाठिंबा दर्शविला असुन जमादार यांच्यासोबत,आसिफ तांबोळी, अय्युब पठान,ज़करिया सैय्यद, अरबाज़ कुरैशी,अमन शेख, साद पठान, शाहिद शेख, फैज़ान काज़ी, तौफीक शेख,अतीक पठान,उपोषणास बसलेले आहेत.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget