पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना बांधील -राज्य अध्यक्ष किसनराव हासे.
श्रीरामपूर ( वार्ताहर ) पञकारीता क्षेञात हल्ली घुसखोरी वाढली असल्यामुळे खरी पञकारीता करणाऱ्या पञकारांची अनेकदा कुचंबना होत आहे. तरी देखील पञकार पञकारीतेचा दर्जा सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असुन त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना बांधील राहील असे प्रतिपादन संपादक व पञकार सेवा सेवा संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष किसनराव हासे यांनी केले संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या श्रीरामपुर तालुका कार्यकारीणीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या वेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे, राज्य समन्वयक नरेंद्र लचके, जेष्ठ पञकार बद्रीनाथ वढणे, तालुका कार्याध्यक्ष देविदास देसाई, तालुकाध्यक्ष संदिप जगताप उपाध्यक्ष चंद्रकांत लांडगे, हरीभाऊ बिडवे आदि प्रमुख उपस्थित होते. संपादक व पञकार सेवा संघाच्या श्रीरामपुर तालुका कार्यकारीणीची बैठक शासकिय विश्राम गृह येथे काल शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पञकारांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष हासे म्हणाले कि, पञकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी ही एकमेव पञकारांची संघटना राज्यात काम करीत आहे. ग्रामिण पञकारांना न्याय मिळण्यासाठी शासनावर दबाव टाकण्याचे सामर्थ्य केवळ याच संघटनेत आहे. युट्युब व पीडीएफ पञकारीता बेकायदेशीरपणे सुरु आहे. ही पञकारीता क्षेञासाठी धोक्याची घंटा आहे. प्रामाणिकपणे पञकारीता करणाऱ्या पञकारांची त्यामुळे गळचेपी होत आहे. पञकारीता क्षेञ वाचवायचे असेल तर त्यासाठी या पञकारांवर बंदी घालणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घेतला असुन अशी बेकायदेशीर पञकारीता करणारांना येत्या काळात चाप बसणार आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न केले जाणार आहेत. आपली संघटना ग्रामिण पञकारांना बळ देणारी संघटना आहे. संघटनेतील प्रत्येक पञकार हा वाघासारखा असला पाहीजे.उर्जा, दर्जा व राजा या ञिसुञीवर संघटनेचा पञकार तयार झाल्यास संघटनेतील पञकारांचे भविष्य उज्वल होण्यास वेळ लागणार नाही असे सांगुन ते म्हणाले कि, ग्रामिण पञकारांना संरक्षण, आधिस्विकृती व कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवुन देण्यासाठी मानधन व पेन्शन योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने संघटन अधिक मजबुत करा असा सल्लाही हासे यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे म्हणाले कि, पञकारीता क्षेञ भरकटत आसताना खऱ्या पञकारांना न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी संघटना राज्यभर काम करीत आहे. जिल्यात प्रत्येक तालुक्यात शाखा सुरु करण्यात येत आहेत. शासनाच्या विविध सवलती ग्रामिण पञकारांना मिळवुन देण्यासाठी राज्य अध्यक्षांचा लढा गेली अकरा वर्षे सुरु आहे. त्यासाठी जिल्ह्यात मजबुत संघटन केले जात आहे. आपल्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आंम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी राज्य समन्वयक नरेंद्र लचके, जेष्ठ पञकार बद्रिनाथ वढणे, तालुका कार्याध्यक्ष देविदास देसाई यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नुतन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या नुतन पदाधिकार्यांना ओळखपञ देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पञकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुञसंचलन नरेंद्र लचके यांनी केले तर आभार संदिप जगताप यांनी केले.यावेळी पत्रकार चंद्रकांत लांडगे, बापूसाहेब कोकणे, मोहन जगताप, बापूसाहेब नवले, दिलीप लोखंडे, संदीप जगताप, हरिभाऊ बिडवे, रामेश्वर आरगडे, अशोक रणनवरे, अशोक शेलार, शानवाज सय्यद, शकील शेख, किशोर कदम, सुहास शेलार, दत्तात्रय थोरात, विकास बोर्डे, अमोल बोर्डे, दिलीप तांबे, संदीप शेरमाळे, दिलीप दायमा, देविदास देसाई, बद्रीनारायण वढणे, जयेश सावंत, राजेश बोरुडे, राजेंद्र देसाई उपस्थित होते.
Post a Comment