श्रीरामपूर शहरात अवैध व्यवसाय, अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई.
श्रीरामपूर - शहरात चोरट्या मार्गाने, अवैध व्यवसाय सुरू असल्या संदर्भात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व आमलदारांनी, शहरातील बस स्थानक,रेल्वे मालधक्का तसेच विविध ठिकाणी छापा टाकून, मन्ना पत्ता,सोरट नावाचा जुगार खेळविल्या जाणाऱ्या अड्डयांवर छापे टाकून, आरोपी यांना विविध ठिकाणांहून जुगाराच्या साहित्य,व रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, वरील आरोपी विरुद्ध, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जुगार प्रतीबंध कायदा कलाम १२ अ प्रमाणे, आरोपी संदीप पवार, शरद आडांगळे, नितीन त्रिभुवन यांना ताब्यात घेतले असून.आरोपी संदीप पवार, शरद आडांगळे, यांच्या कडून १ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल, तर आरोपी नितीन त्रिभुवन यांच्या कडून १ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन, आरोपी विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून. या गुन्ह्याचा पुढील तपास, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, हिंगडे, विठेकर,चव्हाण, पोलीस नाईक विशाल दळवी, लोढे, माने, यमूल, जाधव, सोळंकी, कुसळकर, गावढे आदींच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे, शहरातील अवैध धंदे करणा-यांचेधाबे दणाणले आहेत. 
