Latest Post

राहुरी (प्रतिनिधी )-खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी कान्हू गंगाराम मोरे  वय 42 हा नगर येथील शासकीय रुग्णालयात आजारावर उपचार घेत असताना पोलिसांच्या तावडीतून पसार झाला.करोना बाधित  झाल्याने त्यास राहुरी तुरूंगातून उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. मोरे यास मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी घेवून जाण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र या वेळेतच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून मोरे हा पसार झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यासह बाहेरील रूग्णालये आली आहेत. मोरे हा राहुरीतील  पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी आहे. दातीर यांचा खून केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे चारही आरोपी राहुरी येथील तुरूंगात होते. तेथे मोरे यास करोनाने गाठल्यानंतर त्याला नगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेही त्याला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने मोरे यास पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. यातच तो पसार झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राहुरी (प्रतिनिधी)-माजी आमदार जनतेची दिशाभूल करत आहे.खोटी पाणी योजना मंजूर करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम माजी आमदारांनी केले. तर येणाऱ्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी राहुरी नगरपालिकेला येणार असून निवडणुकी दरम्यान दिलेल्या जाहीर नामा प्रमाणे सर्व कामे मार्गी लागणार असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी घोषणा केली.

        राहुरी शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, ना. विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, डॉ. सौ. उषाताई तनपुरे शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष नंदाताई उंडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडे, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन सदस्य धनराज गाडे, ज्ञानदेव वाफारे, सौ. सोनालीताई तनपुरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा खुळे युती अध्यक्ष तृप्ती येवले आदी व्यासपीठावर होते.

      यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, ज्योती तनपुरे, अशोक आहेर, विलास तनपुरे, नंदू तनपुरे अॅड. राहुल शेट, महेश उदावंत, नगरसेविका ज्योती तनपुरे, अनिता पोपळघट, इंद्रभान थोरात, दिलीप चौधरी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, अशोक कदम, शरद तनपुरे आदी उपस्थित होते.



श्रीरामपूर : आजकाल विवाह जमविणे अतिशय क्लेषदायक प्रक्रिया झालेली आहे.त्यात दिव्यांगाची वैवाहिक जीवनाची घडी बसवितांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन श्री.संजय साळवे यांनी मागील 20 वर्षापूर्वी दिव्यांग वधू वर सूचक केंद्राची श्रीरामपूरात स्थापना केली व त्या माध्यमातून आजतागायत राज्यातील 272 दिव्यांग व्यक्तीचे विवाह जमविले व संसारात देखील यशस्वी केले.याबरोबरच 18 दिव्यांग व्यक्तीचे नाॅर्मल व्यक्तीशी आंतरजातीय विवाह यशस्वी केले. चि.सौ.कां.सविता भालेराव ( कर्णबधिर ) व चि.राजेंद्र जाधव ( नाॅर्मल ) यांचा आंतरजातीय विवाह श्री.संजय साळवे यांनी आज यशस्वी केला आहे.अपंग सामाजिक विकास संस्थेचा दिव्यांग वधू वर सूचक केंद्र प्रकल्प दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींच्या पालकांकरिता अतिशय दिलासादायक व दिशादर्शक  ठरत आहे.असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना आयोजित दिव्यांग नाॅर्मल शूभविवाह कार्यक्रम प्रसंगी आ.लहू कानडे यांनी केले.

         अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालय यां ठिकाणी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रम प्रसंगी रोटरी एज्यूकेशन ट्रस्टचे चेअरमन सूरेश पा.बनकर,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,चेअरमन संजय साळवे,आसान दिव्यांग संघटनेच्या महिला राज्याध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी,राज्य उपाध्यक्ष सूनिल कानडे,मूकबधिर विद्यालयाचे मूख्याध्यापक संतोष जोशी,संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू फा.सूरेश साठे,काँग्रेसचे तालूकाध्यक्ष अरूण पा.नाईक,ज्ञानेश्वर मूरकूटे,संत लूक हाॅस्पिटलच्या संचालिका सि.फिलोमिना चालील,व्यवस्थापिका सि.मेरी डार्लिल,मेट्रन सि.फातिमा मेरी यांची प्रमूख उपस्थिती होती.

          याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देतांना मागील 16 वर्षापासून दर वर्षी मोफत राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर परिचय मेळावा आयोजीत केला जात आहे.कोरोना महामारीच्या संकटामूळे मेळावा आयोजीत करता येत नाही परंतू विवाह जमविण्याचे पवित्र कार्य मात्र थांबलेले नाही.कोरोना काळात देखील 16 विवाह जमविण्यात आली आहेत.मानव जातीवर संकटे येतच राहतील परंतू जीवन रहाटी थांबवून चालनार नाही.त्यामूळे दिव्यांगा करिता अहोरात्र सेवाधर्म हा सूरूच राहणार आहे.सदरचा विवाह अहमदनगर येथील रजिष्टार आॅफिसमध्ये नोंदणीक्रूत पध्दतीने करण्यात आला तदनंतर श्रीरामपूर येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर जोडप्यास जि.प.समाज कल्याण विभागाची दिव्यांग सदृढ विवाह योजनेचे 50 हजार रूपयांचे अनूदान प्रस्ताव दाखल करण्यात येइल

         याप्रसंगी संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू यांनी सूखी व समाधानी वैवाहिक जीवनांची त्रिसूत्री सांगितली.नवविवाहित व संसारिक लोकांनी विवाह पवित्र बंधन मानून सूसंस्कारित पिढीची पायाभरणी करणे आवश्यक आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय साळवे,वर्षा गायकवाड, सौ.मिना भालेराव,श्री.भगवान भालेराव,श्री.तूळशीराम जाधव,तेलधूने परिवार,सौ.श्रूती जाधव इ,नी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भालेराव यांनी केले तर आभार सौ.मनिषा भालेराव यांनी मानले.

लोणी (प्रतिनिधी) - दिनांक २६/०८/२०२१ रोजी २३.०० ते दिनांक २७/०८/२०२१ रोजी ०५.०० वाजेपावेतो समाधान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी लोणी पोलीस स्टेशन यांना तसेच पो.ना.२१८० दिपक रोकडे चालक पो.ना.१२५ कैलास भिंगारदिवे अशांना शिर्डी विभागात विभागीय गस्त करत असताना रात्री ०४.४० वाजण्याचे सुमारास लोणी ते संगमनेर रोडवर पेट्रोलींग करीत असताना चंद्रपुर बस स्टापचे समोर एक महेंद्रा पिक अप गाडी नं. MH २५ P १२९४ ही संशयीत स्थितीत जात असताना दिसल्याने सदरची पिक गाडीचे चालकास थांबण्याचा इशाला केला असता सदर गाडीवरील चालक यांनी गाडी न थांबताच पुढे जात असल्याने सदर पिक अप गाडी यांचा पाठलाग करुन थांबविली व यातील आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी दिलेले उत्तेर समाधानकारक न वाटल्याने आमचा संशय बळावला त्यामुळे सदर गाडीची कसुन झडती घेतली असता त्यांत गांजा असलेल्या पांढ-या रंगाचे गोण्या या नारळाचा भुश्याने भरलेल्या गोण्याचे खाली लपवलेल्या होत्या त्यातील गांजाची गोणी काढुन त्यातील माल चेक केले असता त्याचा उग्र वास व त्याचे रंगावरुन आमची खात्री झाल्याने सदर वाहनाचा सरकारी पंच मा. तालुका दंडाधिकारी सो राहाता, पोलीस निरीक्षक श्री. सुभाष भोये सो राहाता पोलीस स्टेशन फोटोग्राफर व वजन काटा धारक यांचे समक्ष पंचनामा करुन गाडीतील ५१० किलो ७५ लाख रुपये किमतीचा गांजा व ५ लाख रुपये किपतीची महेंद्रा पिक अप गाडी नं. MH २५ P १२९४ असा एकुन ८० लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री.मनोज पाटील सो पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे मँडम मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, मा.श्री.संजय सातव सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदशनाखाली सपोनि समाधान पाटील, पोहेकॉ २३१ राजेंद्र औटी पो.ना.२१८० दिपक रोकडे, चालक पो.ना.१२५ कैलास भिंगारदिवे ,सहा फौज लबडे, पो.ना संभाजी कुसळकर, पोना. मनोज सनानसे, पो.ना.संतोष लांडे, पो.ना.अशोक शिंदे, पोहेकॉ सांगळे, पोहेकॉ जायभाये, पो.कॉ.वडणे, पोहेकॉ आव्हाड, पोकॉ इंगळे यांचे पथकाने केली आहे.


बेलापुर(  विशेष प्रतिनिधी  )- येथील एका अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या जोडप्याला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले असुन दोघांनाही ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरकडे रवाना झाले आहे.बेलापुर येथील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी २३ जुलै रोजी दुपारी घरातून निघुन गेली होती या बाबत बेलापुर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता मुलीचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी जि प सदस्य शरद नवले  सरपंच   महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व गावातील पत्रकारांनी  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे केली होती त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गावात येवुन ग्रामस्थांची बैठक घेतली होती त्या वेळीही तपास सुरु आहे लवकरच दोघांनाही ताब्यात घेवु असे अश्वासन त्यांनी दिले होते त्यांनंतर भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दोनच दिवसांनी शिवप्रहार संघटनेच्या वतीने श्रीरामपुर बेलापुर बंदचे अवाहन करण्यात आले होते व्यापारी व ग्रामस्थांनीही बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता त्यामुळे पोलीसावर दबाव वाढला होता पोलीस आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत होते ज्या ज्या ठिकाणी पोलीसांना माहीती मिळत होती पोलीस तेथे जावुन रिकाम्या हाताने परत येत होते तपासाबाबत ग्रामस्थ तसेच वरीष्ठाकडूनही वांरवार विचारणा   होत असल्यामुळे त्या जोडप्यांना पडण्यासाठी पोलीसांनी चंग बांधला होता अखेर २३जुलै रोजी सैराट झालेले ते दोघे तब्बल एक महीन्यानंतर धुळे येथे असल्याची खबर पोलीसांना मिळाली पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजय सानप ऐ पी आय संभाजी पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे धुळे जिल्ह्यात पोहोचले धुळे जिल्ह्यातील पाळधी या गावी अल्पवयीन मुलीसह तो मुलगा असल्याची पक्की खबर पोलीसांना मिळाली ऐ पी आय संभाजी पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे वेषांतर करुन मिळालेल्या ठिकाणावर पोहोचले परंतु पोलीस पोहोचण्या आधीच तो मुलगा फरार झाला होता पोलीसांनी पुन्हा त्याच ठिकाणी सापळा लावला दुसऱ्या दिवशी त्या मुलाला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले यात फुरकान शेख यांनी तांत्रीक विश्लेषणच्या आधारे कामात मोठी कामगिरी बजावली अल्पवयीन मुलगी व त्या मुलाला ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरच्या दिशेने रवाना झाली आहेत एक महीन्याच्या प्रयत्नानंतर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे पोलीसांच्या विशेष कामगीरी बद्दल नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-पोलीस असल्याचे भासवून बेलापूर बायपास जवळ  एक तोळ्याची अंगठी घेवुन चोरटे पसार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे                       या बाबत समजलेली माहीती अशी की गोरक्षनाथ कुऱ्हे हे आपल्या घरी चालले असताना बेलापुर बायपासला एका लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत तुमची झडती घ्यावयाची आहे असे सांगुन बोटातील एक तोळ्याची अंगठी काढुन धूम ठोकली त्या वेळी जवळच काही नागरीक उभे होते त्यांच्या ही बाब लक्षात आली तो पर्यत  चोरटे पसार झाले होते बेलापुर चौकात आता सी सी टी व्ही कँमेरे लावलेले असतानाही कँमेऱ्याची नजर चुकवुन चोरटे दिवसा नागरीकांना लुटत आहे घटनेची माहीती मिळताच पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे व हरिष पानसंबळ यांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे परंतु ठोस असे काहीही हाती आले नाही.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोरोनामुळे बस सेवा बंद असल्यामुळे एस टी महामंडळ अडचणीत सापडले असुन डिझेल अभावी बसेस डेपोत उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव आहे असे मत एस टी स्थापनेतील पहीले वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी व्यक्त केले. एस टी परिवहन महामंडळाच्या स्थापनेतील पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांनी वयाच्या ९८ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोरख बारहाते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड  प्रसिध्द उद्योजक रामेश्वर मणियार आडते बाजार असोसिएशनचे सचिव संतोष बोरा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षिरसागर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोहनलालजी मानधना यांच्या हस्ते केवटे यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड म्हणाले की आज एस टी महामंडळाची परिस्थिती ,आर्थिक नियोजन बिघडले आहे .या काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही महामंडळाकडे डिझेल भरण्यास पैसे नाहीत त्यामुळे सणासुदीचा काळ असतानाही बसेस डेपोत प्रवाशांची वाट पहात उभ्या आहेत अन बाहेर प्रवाशी बसेसची वाट पहात आहेत ही चिंतेंची तसेच चिंतनाची बाब आहे एस टी महामंडळाचे पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांची १००वी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येईल आजही केवटे यांची प्रकृती उत्तम असुन या वयातही ते चष्म्याशिवाय पुस्तक वाचु शकतात ही आश्चर्याची बाब असल्याचे श्रीगोड म्हणाले या वेळी प्रवासी संघटनेचे बाबासाहेब भालेराव जयंत देशपांडे नरेश पांडव पत्रकार देविदास देसाई संतोष बोरा  आदि उपस्थित होते सुरेश केवटे यांनी स्वागत केले तर योग गुरु अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget