Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-पोलीस असल्याचे भासवून बेलापूर बायपास जवळ  एक तोळ्याची अंगठी घेवुन चोरटे पसार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे                       या बाबत समजलेली माहीती अशी की गोरक्षनाथ कुऱ्हे हे आपल्या घरी चालले असताना बेलापुर बायपासला एका लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत तुमची झडती घ्यावयाची आहे असे सांगुन बोटातील एक तोळ्याची अंगठी काढुन धूम ठोकली त्या वेळी जवळच काही नागरीक उभे होते त्यांच्या ही बाब लक्षात आली तो पर्यत  चोरटे पसार झाले होते बेलापुर चौकात आता सी सी टी व्ही कँमेरे लावलेले असतानाही कँमेऱ्याची नजर चुकवुन चोरटे दिवसा नागरीकांना लुटत आहे घटनेची माहीती मिळताच पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे व हरिष पानसंबळ यांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे परंतु ठोस असे काहीही हाती आले नाही.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोरोनामुळे बस सेवा बंद असल्यामुळे एस टी महामंडळ अडचणीत सापडले असुन डिझेल अभावी बसेस डेपोत उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव आहे असे मत एस टी स्थापनेतील पहीले वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी व्यक्त केले. एस टी परिवहन महामंडळाच्या स्थापनेतील पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांनी वयाच्या ९८ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोरख बारहाते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड  प्रसिध्द उद्योजक रामेश्वर मणियार आडते बाजार असोसिएशनचे सचिव संतोष बोरा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षिरसागर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोहनलालजी मानधना यांच्या हस्ते केवटे यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड म्हणाले की आज एस टी महामंडळाची परिस्थिती ,आर्थिक नियोजन बिघडले आहे .या काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही महामंडळाकडे डिझेल भरण्यास पैसे नाहीत त्यामुळे सणासुदीचा काळ असतानाही बसेस डेपोत प्रवाशांची वाट पहात उभ्या आहेत अन बाहेर प्रवाशी बसेसची वाट पहात आहेत ही चिंतेंची तसेच चिंतनाची बाब आहे एस टी महामंडळाचे पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांची १००वी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येईल आजही केवटे यांची प्रकृती उत्तम असुन या वयातही ते चष्म्याशिवाय पुस्तक वाचु शकतात ही आश्चर्याची बाब असल्याचे श्रीगोड म्हणाले या वेळी प्रवासी संघटनेचे बाबासाहेब भालेराव जयंत देशपांडे नरेश पांडव पत्रकार देविदास देसाई संतोष बोरा  आदि उपस्थित होते सुरेश केवटे यांनी स्वागत केले तर योग गुरु अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

प्रकृती कारणास्तव उपोषण मागे घेण्याची विनंती राहुरी (प्रतिनिधी) डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्री शिवाजी नगर राहुरी येथे दिनांक 23  ऑगस्ट 2021रोजी पासून उपोषणास बसलेल्या कामगारांची आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली

कारखाना कामगारांच्या अनेक वर्षापासून दरमहा मिळणाऱ्या पगार, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युएटी, पगाराचा फरक, रिटेन्शन  अलाउंस,अशा स्वरूपाचे अनेक रकमा थकीत आहे त्या अनुषंगाने Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषण   कर्त्याबरोबर सकारात्मक चर्चा करून सहाय्यक कामगार आयुक्त तसेच असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांचेशी पत्रव्यवहार करून उपोषणकर्ते यांचेशी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. भेटीदरम्यान उपोषणास बसलेल्या कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करून उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासंदर्भात पोलीस विभागाच्या वतीने विनंती करण्यात आली.

यावेळी उपोषणकर्ते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे आदींनी पोलीस विभागाने लक्ष देण्याची विनंती केली आणि आभार व्यक्त केले.


नाऊर ( वार्ताहर):। श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गरीब शेतकरी कुंटुंबातील  विलास अशोक देसाई (वय ४१  वर्ष ) हा तरुण विद्युत प्रवाहच्या पोलवरील तारेला चिकटून दुर्देवी अपघाती मृत्यु झाला. मयत विलास हा घरात एकुलता एक कमवता  मुलगा होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा व 2 मुली असा परिवार आहे.

     हाती आलेल्या वृत्तानुसार घडलेली घटना अशी की घराचा वीज पुरवठा गेल्या २ दिवसापासुन बंद होता या बाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क  साधला होता आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान संबधित महावितरणचा  कर्मचारी घटनास्थळी आला व विलास यास तु पोलवर चढुन विज जोडून घे असे म्हणून फिडर वरुन विज प्रवाह बंद करुन घटनास्थळी आला त्याच वेळी दुसर्या फिडरवरुन विज प्रवाह सुरुच होता ही बाब सांबधीत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही कट केलेली विज जोडणी करण्यासाठी संबधीत कर्मचाऱ्यांने विलास यास पोलवर चढण्याचा आग्रह धरला महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार विलास पोलवर चढला परंतु दुसऱ्या फिडरवरुन विज प्रवाह सुरु असल्यामुळे त्याला जोराचा शाँक बसला व तो फेकला गेला परंतु त्याचा पाय वरच अडकला तसेच पोलवरील अँंगलला पँट अडकल्यामुळे तो जागेवरच मयत झाला  विलास गेला त्यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले . 

    मयत विलास हा अतिशय गरीब कुंटुबातील एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

*पप्पा उठा ना !*

    मुलगा तुषार मुलगी शुभांगी, साक्षी यांच्या पप्पा उठा ना, आमच्याशी बोला ना ! या हंबरड्याने अंत्यविधी जमलेल्या हजारो ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. महावितरणच्या गलथान कारभारा विषयी नागरिकामधुन संताप व्यक्त करण्यात येत असुन मयत विलासच्या कुंटूबियाला महावितरण ने तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.*

पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सतिश गोरे व कॉन्स्टेबल संतोष बडे हे करत आहे.

बेलापूर -(प्रतिनिधी ) येथील बाजारतळ परिसरात तरस या सहसा आपल्या परिसरात न आढळणार्‍या दुर्मिळ प्राण्याचे अचानक दर्शन झाले. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.बेलापूर येथे सोमवारी संध्याकाळी तरस या प्राण्याचा संचार आढळून आला. दुर्मिळ प्रजाती वर्गातील हा प्राणी मांसाहारी मानला जातो. मेलेल्या प्राणी, पक्षांचे मांस व हाडे खावून गुजराण करणे हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तरस हा निशाचर असून अंगाच्या विशिष्ट ठेवणीमुळे शिकार करत नाही. असे असले तरी रात्रीच्यावेळी शेळ्या, कोंबड्यांवर मात्र ताव मारतो.बिबट्याने शिकार करून खाऊन उरलेल्या मांस व हाडांचे अवशेष खाण्यासाठी तो भटकत असावा अशीही शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे हा प्राणी आढळल्याने याची गावभर चर्चा पसरली. तरस आढळून आल्याबाबत मोबाईलवर फोटोसह संदेश टाकून लोकांना सावधगिरीची सूचना देण्यात आली. बेलापूर परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना त्यात तरस आढळल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अहमदनगर०६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी २९ वर्षीय सुमिता दिनेश जाधव राहणार म्हसे खुर्द, तालुका पारनेर ही महिला गावातून घराच्या दिशेने जाधववाडी रस्त्यावरून एकटी पायी जात असतांना, पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या, अनोळखी इसमाने सदर महिलेस चाकूचा धाक दाखवून, तिच्या जवळील सोन्याचे मंगळसुत्र, कर्णफूले व दोन मोबाईल असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेल्याचा घटना घडली होती, सदर घटनेबाबत सुमिता दिनेश जाधव या महिलेने, दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात, अज्ञात आरोपी विरुद्ध गुरनं. ५६९/२०२१, भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने, समांतर तपास करीत असताना, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, सदर गुन्हा किरण मेहेत्रे, राहणार जामखेड याने केला असल्याची माहिती मिळताच.पोलीस निरीक्षक कटके यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ रणजित जाधव, जालिंदर माने, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदींना आरोपी संदर्भातील माहितीची शहानिशा करून, ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, आरोपी नामे किरण अरुण मेहेत्रे, वय- २७ वर्षे, राहणार सदाफूले वस्ती, जामखेड,यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता. तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपणीचा मोबाईल काढून दिल्याने, पोलिसांनी तो जप्त करुन,आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर की असून. या पुढील कार्यवाही पारनेर पोलीस करीत आहेत. आरोपी किरण अरुण मेहेत्रे हा सराईत गुन्हेगार असून. त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, अपहार अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )-नारायण राणे हे जेष्ठ नेते आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते भूमिका स्पष्ट करतीलच प्रदेशाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु त्यावरुन जे सूडाचे राजकारण चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे असे मत माजी मंत्री  राधाकृष्ण विखे पा यांनी व्यक्त केले. जि प सदस्य शरद नवले यांच्या वस्तीवर स्नेह मेळावा व कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया घेतली असता माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा म्हणाले की राज्यातील शासन सूडाचे राजकारण करत आहे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताच नाही आँन लाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिक्षण मंत्री महोदयांना राज्यातील सर्व मुलांना मोफत टँब देण्याची सूचना केली होती अनेक मुलाकंडे छोटे छोटे मोबाईल असल्यामुळे त्यांना निट समजत नाही मोबाईलला रेंजच नसते शाळा केव्हा सुरु होईल याचाही साधा निर्णय घेता आलेला नाही सर्व परीक्षेत हे सरकार नापास झाले आहे कुणालाच मदत करण्याची या सरकारची तयारी नाही  कोवीडमुळे अनेक स्थीत्यंतरे आली कोरोना लसीकरणाबाबत राज्याच केंद्रा विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतात मोफत लस देण्याची घोषणा करुन लसीकरण सुरुही केले आहे गोरगरीबांना कोरोना काळात मोफत धान्य दिले आता तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात उतरले पाहीजे राजकारणाच्या पलीकडे जावुन तरुणाकरीचा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहीजे शरद नवले हा लढवय्या कार्यकर्ता आहे सभापती असताना त्यानी जिल्ह्यात चांगले काम केले प्रस्थापीताविरुध्द लढण्याचे काम शरद नवले यांनी केले आहे असेही विखे पा म्हणाले या वेळी भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते मा सभापती दिपक पटारे राधाकृष्ण आहेर गिरीधर पा आसने उपसभापती बाळासाहेब तोरणे सरपंच महेंद्र साळवी गणेश मुदगुले सचिन गिरमे शंतनु फोफसे रणजित श्रीगोड  नितीन भागडे अनिल थोरात नानासाहेब शिंदे सुनिल मुथा आजय डाकले शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा प्रविण बाठीया अरविंद साळवी डाँक्टर देविदास चोखर पंकज हिरण साहेबराव वाबळे प्रफुल्ल डावरे हाजी ईस्माईल शेख अकबर टिन मेकरवाले अशोक गवते मोहसीन सय्यद मुस्ताक शेख शफीक बागवान सुभाष अमोलीक पत्रकार देविदास देसाई प्रदिप आहेर सुनिल नवले दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम दिपक क्षत्रीय रमेश अमोलीक विशाल आंबेकर अमोल गाढे रामेश्वर सोमाणी बालू राशिनकर महेश ओहोळ अजिज शेख दादा कुताळ गोरख कुताळ गोपी दाणी विनायक जगताप श्रीराम मोरे मास्टर हुडे श्रीकांत अमोलीक आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिं प सदस्य शरद नवले यांनी केले तर अरविंद नवले यांनी सूत्रसंचलन केले तर चंद्रकांत नवले यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget