Latest Post

राहुरी येथील बोधिसत्व डांँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या समाजसेवी स्ंस्थेतर्फे आयोजित  फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक,वंचित चे जिल्हा महासचिव व बोधिसत्व डांँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक कालकथित डांँ सुधीर क्षीरसागर व समितीचे दुसरे संस्थापक डांँ संजय पाटील यांना अभिवादन सभेत जिल्हातील विविध पक्ष व संघटनेतर्फे  नुकतीच भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाची सुरूवात समितीचे संस्थापक सदस्य मुख्याध्यापक  मंगेश पगारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अकोले येथील समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजयजी पवार यांच्या निवडीने करण्यात आली.तसेच या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अजयजी पवार,प्रमुख पाहुणे राहुरी न.पा चे उपनराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी,पंडुतात्या पवार,पत्रकार वसंतराव झावरे,आर पी आय चे बाळासाहेब जाधव,राहुरी खुर्द चे मा.सरपंच नंदुभाऊ डोळस डांँ प्रविण क्षीरसागर यांच्या हस्ते तथागत भगवान  बुध्द,डांँ बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित डांँ सुधीर  क्षीरसागर व कालकथित डांँ संजय पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.अध्यक्षबौध्दाचार्य संत्येंद्र तेलतुंबडे व बौध्दाचार्य संजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक त्रिशरण व पंचशिल घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत समितीचे संस्थापक व राहुरी खुर्द चे मां.सरपंच मधुकर साळवे यांनी संस्थेच्या पायाभरणी साठी डांँ सुधीर क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान व संस्थेंचे विविध कार्यांची आणि सध्यस्थितीची माहीती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक अजयजी पवार यांनी डांँ सुधीरजी क्षीरसागर यांचे बुध्द विहाराचे स्वप्न साकार करण्यासाठी भरीव अशी आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन डांँ क्षीरसागर,डांँ संजय पाटील,दादासाहेब साठे व विजयराव कदम यांना भावपुर्ण आदरांजली वाहली. यावेळी राहुल जगताप यांनी ६००० रू. खुरसडगावचे मा.सरपंच बाबासाहेब पवार व लक्ष्मीकांत पवार यांनी २१००रू,पत्रकार अयुब पठाण यांनी ११००० रू.,लक्ष्मण जाधव सर यांनी ५०००रू,पडुतात्या पवार यांनी११११ रू.मदत समितीला  बुध्द विहारासाठी  जाहीर केली.या प्रसंगी जेष्ठ नेते पंडुतात्या पवार,जेष्ठ पत्रकार वसंतराव झावरे,पारनेर चे मा.नगराध्यक्ष शंकरजी नगरे,राहुरी चे उपनराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी,माजी सरपंच नंदुभाऊ डोळस,अँड.रावसाहेब मोहन,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव,आर पी आय चे तालुका प्रमुख विलासनाना साळवे,आर पी आय चे बाळासाहेब जाधव,मानवी हक्क आयोगाचे प्रविण लोखंडे,वंचित चे  राहुरी तालुकाध्यक्ष अनिल जाधव,श्रीरामपुर अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन,वंचित चे आप्पासाहेब मकासरे,बहुजन समाज पार्टीचे सुनिल तांबे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेशराव लांबे,मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी,राष्ट्रवादीचे अविनाश ओव्हळ ,भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड,डी वाय एस पी प्रसाद सांगळे,बाबुराव मकासरे,ईब्टाचे राजेंद्रजी विधाते,समाजसेवक लक्ष्मण जाधव सर,विजय कदम सर,रमेश पगारे,खराडे सर,पारधे गुरूजी,सरपंच बाचकर,सरपंच बर्डे,सावंत साहेब  शिवाजी पवार,शिवाजी देठे,अंबादास साखरे इ.नी कालकथित डांँ सुधीर क्षीरसागर, तसेच कालकथित डांँ संजय पाटील,दादासाहेब साठे व विजयराव कदम यांच्या आठवणीला उजाळा देत भावपुर्ण  आदरांजली वाहीली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तमराव सातपुते तर आभार  मुख्याध्यापक विनितकुमार कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरूणजी तुपविहीरे,मनोज घोगशे,विरूभाऊ ठोंबरे,समितीचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी राहुरी,श्रीरामपुर,राहाता,अहमदनगर,अकोले,पारनेर अशा जिल्हातील विविध ठीकाणावरून कार्यकर्त्यांनी या अभिवादन सभेत हजेरी लावली होती.


श्रीरामपुर (प्रतिनिधी) - सध्या राज्यात महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या विजबील वसुली विरुद्ध समाजवादी पार्टीतर्फे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,यावेळी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादारसह स.पा.चे कार्यकर्ते उपस्थित होते.

 सध्या कोरोना संकटाने भरडला जात असलेला सर्वसामान्य नागरीक विज बिलाद्वारे संतप्त होत असुन आस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करत अक्षरशः मेटाकुटीला आला आहे,

विजबीलप्रश्नी शासनाने "सक्तीची विजबील वसुली" या सोडलेल्या तुघलकी फर्मानामुळे नागरीकांच्या संकटात आणखी भर पडून मोठ्या संतापाचा सामना करणे त्यांना भाग पडत आहे,कोरोना महामारीच्या संकटाने देशात  सर्वसामान्यांसोबत सर्वच क्षेत्रातील नागरीक भयंकर त्रस्त झालेले आहेत, त्यात शासनाकडून कधीही अचानक लॉकडाऊनचे नियोजन करण्यात येते ,यामुळे सर्वसामान्य माणसाला आपण जगावे कसे ? हेच समजून येत नाही,भविष्याची चिंता नेहमीच सर्वसामान्य माणसाला काळजीत टाकत असते,उद्याचा दिवस कसा असेल  किंवा आपल्या कुटूंबाचे उदर निर्वाह कसा करता येईल याच काळजीने त्यांचे रोजचे जीवन  भरडून जात आहे, माहे एप्रिल आणि मे २०२१ असे सलग दोन महिने शासनाकडून लॉकडाऊन लावले गेले,सर्वसामान्यांच्या घरात रोज कमविणे आणि खाणे असा नित्यक्रम असतो, दोन महिने सर्वसामान्यांच्या हाताला काम नव्हते,त्यात विज बिल भरले नाही म्हणून विज कंपनीची माणसे घरातील विज कनेक्शन बंद करणेकामी घरातील माणसांवर बळजबरी करत आहेत, विजेची बिले भरा अन्यथा विज कनेक्शन बंद करतो अशी धमकी दिली जात आहे, सर्वसामान्य नागरीकांचा अंत पाहिला जात आहे, त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे ,रोजगार नाही,काम नाही , उद्योग धंदे बंद आहेत,अशा परिस्थितीत प्रपंचाचा गाडा सर्वसामान्य माणूस कसा बसा पुढे रेटत आहे, त्याला शासनाच्या वतीने काही तरी सहानुभूती पुर्वक मदत अथवा सवलतीच्या माध्यमातून अर्धे विज बिल माफ करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते,मात्र सहानूभुती ऐवजी जर राज्यशासनाकडून नागरीकांना त्रास देण्याची भुमिका स्विकारली जात असेलतर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.अबु आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या या गलथान कारभार तथा तुघलकी फरमानाविरुद्ध  तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे भाग पडेल, असा गंभीर इशारा या निवेदनात देण्यात आला आहे,

 यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शहराध्यक्ष समीर शेख, शहरसचिव अब्दुल सैय्यद, शहर कार्याध्यक्ष ईरफान पठान, सोशल मीडिया अध्यक्ष जकरिया सैय्यद, शहर सहसंघटक परवेज शेख, जब्बार भाई पठाण,जलील शेख, शाहिद शेख, युनूस पठाण, आदी मान्यवार उपस्थित होते.


राहुरी( प्रतिनिधी): राहुरी येथील  पत्रकार   रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no. 286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास Dysp संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

Dysp मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असले बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने  त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. व त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात  जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी     मिळवून  सदर गुन्ह्याचा  सखोल तपास केला. यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता.  बीनंदनकी  जिल्हा  फत्तेपूर  उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु  सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे वाढवून  न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी  तथा श्रीरामपूर विभागाचे Dy.s.p. संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु मोरे याचे सह चार आरोपी विरोधात दोषारोप पत्र आज रोजी न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी कान्हु मोरे सह चार साथीदारांविरोधात 942 पानांचे दोषारोप पत्र दाखल.

आरोपींची नावे

1)कान्हु गंगाराम मोरे  2)लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी

3)तोफिक मुक्तार शेख 4)अक्षय सुरेश कुलथे

5)अनिल जनार्धन गावडे

राज्यभर गाजले प्रकरण

‌   पत्रकार रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते होते त्यांची हत्या झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले होते.आरोपीच्या  अटकेकरिता विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटना यांनी निवेदने दिली होती.

बेलापूर (वार्ताहर ) - बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जि.प.सदस्य शरद नवले, सुनिल मुथा, सरपंच महेन्द्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे व प्रा.आरोग्य केन्द्राचे अधिका-यांनी  टोकन पध्दतीचा वापर करुन लसीकरणाचे योग्य नियोजन केल्याने लसीकरण सुरळीतरित्या व शांततेत पार पडले.

     काल बेलापूर आरोग्य केन्द्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड गर्दी केली होती त्यातच लस केवळ १८० होती बऱ्याच दिवसापासुन लसीकरण बंद असल्यामुळे नागरीकांनी पहाटे पाच वाजेपासुनच रांगा पकडल्या होत्या त्यामुळे लसीकरण सुरु होताच कुणाचा नंबर या वरुन प्रचंड गोंधळ सुरु झाला या वेळी . जि.प.शरद नवले,सुनिल मुथा  उपसरपंच अभिषेक खंडागळे, रविंद्र खटोड भरत साळुंके पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक सुधीर नवले राम पोळ  देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार आदिंनी  लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला.गोंधळ वाढल्यामुळे पोलिसांनाही पाचारण केले गेले.त्या वेळी सुनिल मुथा यांनी प्रथम आलेल्या सर्व महीलांचे लसीकरण करण्यात यावे असे सुचविले व सर्वानुमते त्यावर तात्काळ कार्यवाही झाली व लसीकरण शांततेत पार पडले पुन्हा लसीकरणा दरम्यान असा गोंधळ होवू नये या करीता सुनिल मुथा यांनी टोकण पध्दतीचा वापर करुन सकाळी नाव नोदंणी करुन मग लसीकरण करण्याच्या सुचना केल्या तसेच लसीकरणात कुणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नका असा सुचना वजा दमही भरला सर्वांच्या सुचनेनुसार  आज पहाटेच उपसरपंच अभिषेक खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकाचे आधार कार्ड जमा करुन त्याचे नाव नोंदवुन टोकण दिल्यामुळे आजचे लसीकरण सुरळीत व शांततेत पार पडले 

     कालचा अनुभव लक्षात घेवून आज २३० व्यक्तींचे लसीकरणाचे पूर्व नियोजन करण्यात आले. लसीकरणासाठी टोकन नंबर पध्दतीचा वापर करण्यात आला. टोकन नंबर पध्दतीमुळे लसीकरण सुरळीत व नियोजनबध्दरित्या गोंधळ न होता शांततेत पार पडले.या करीता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे रमेश अमोलीक विशाल आंबेकर महेश कुऱ्हे राहुल माळवादे ऋतुराज वाघ ओंकार साळुंके गोपी दाणी धनंजय पोळ सतीश व्यास राजेंद्र दांडगे गणेश टाकसाळ आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीरामपूर(वार्ताहर)- कुठल्याही संस्थेतील कर्मचारी हा त्या संस्थेचा कणा असतो, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, तसेच  दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसाला पुन्हा सेवेत घेतल्यास खऱ्या अर्थाने त्या कर्मचाऱ्याला न्याय दिल्याचे समाधान मिळते असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.येथील यंशवतराव चव्हाण सभागृहामध्ये नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कायम सफाई कामगारांच्या नऊ मुलाना वारसा हक्काने नोकरी आदेश नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक याच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ प्रणिती दिपक चव्हाण बोलत होत्या.यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, नगरसेवक राजेद्र पवार, राजेश अलघ, रवि पाटिल,मुक्ताहर शहा,अलतमश पटेल, कामगार नेते दिपक चरण चव्हाण, रोहित शिंदे ,सहायक मिळकत व्यवस्थापक प्रकाश जाधव, संजय प्रधान,राहुल खलिपे, कार्यलयीन निरीक्षक कविटकर,अ‍ॅड.सर्जेराव कापसे यांच्यासह कामगार उपस्थित होते.पुढे बोलताना नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, माझे वडील गोविंदराव आदिक यांनी राष्ट्रीय पातळीवर कामगारांची संघटना चालवुन त्यांना न्याय मिळवून दिला. तोच वारसा माझे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक व मी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्काप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात यासाठी नगरसेविका सौ प्रणिती चव्हाण व कामगार नेते  दीपक चव्हाण यांनी कायम पाठपुरावा केला, आज खऱ्या अर्थाने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेविका सौ प्रणिती दीपक  चव्हाण म्हणाल्या, श्रीरामपूर नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच या कार्यकाळामध्ये अर्ध शतकापेक्षा जास्त सफाई कामगाराच्या वारसाना वारस हक्काने,अनुंकप तत्वावर ५० पेक्षा जास्त शासकिय नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. त्या सोबतच घनकचरा कामगार हे मागील कार्यकाळात अत्यंत अल्पवेतनात घनकचरा कामगार काम करत होते मात्र नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्वतः जातीने लक्ष घालत सफाई, झाडु व गटार,व कचरा संकलन करणार्या महिला कामगार यांचे रोज॔दारी वेतन पुर्वीपेक्षा दुप्पटीने वाढ केले. त्यांच्या या कार्यकाळात सेवा निवृत झालेल्या कर्मचार्याना सेवानिवृतीच्या रक्कमा हि मोठ्या प्रमाणात कामगाराना देण्यात आल्या त्याच बरोबर करोना काळात आरोग्य विभागाच्या कर्मचार्यानी श्रीरामपूर शहराची घेतलेली स्वच्छतेची जबाबदारी बघता प्रती कायम कामगार रुपये दोन लक्ष विमा श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मार्फत काढण्यात आला आहे. तसेच कामगारांची कामधेनु असलेली श्रीरामपूर नगर परिषद सेवक सहकारी पतसस्थेला हि नित्य नियमाने वित्त पुरवठा करुन नगर परिषद पतसस्थेला जिल्हा बॅकेची अतिरिक्त व्याजदर न लागता संस्था ही दोन कोटी रूपये तोट्यातुन निघुन  चालु आर्थिक वर्षात 24 लक्ष रुपये नफा मिळवू शकली ती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी संस्थेबद्दल जे आर्थिक धोरण केले त्यामुळे हा नफा झाला आहे.यावेळी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कायम सफाई कामगाराच्या नऊ मुलाना वारासा हक्काने नोकरी आदेश देण्यात आले त्यामध्ये सौरव जाधव, हेंमत जेधे, जितु झिंगारे,रोहित सोनवणे,रविद्र शेळके,अजय जाधव,योगेश बागडे,अक्षय बागडे यामध्ये या कामगारांचा समावेश होता यावेळी वैभव लुक्कड, चांदमल मांडण,किशोर शिंदे ,चंद्रकांत कोळी,भरत खेडकर, धंनजय कादंळकर आदि उपस्थित होते. यावेळी  प्रास्तविक नगरसेवक राजेद्र पवार यांनी केले तर आभार कामगार नेते दिपक चरण चव्हाण यांनी मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी )- डाँक्टर डे चे औचित्य साधुन कोरोना काळात बेलापुकराना चांगली सेवा देणाऱ्या डाँक्टरांचा बेलापुरातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कोरोना काळात बेलापुर गावात सेवा देणाऱ्या सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  रुग्णांना चांगली सेवा दिली गावात सुरु केलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना योग्य उपचार व वैद्यकीय सुविधा देण्याचे काम गावातील डाँक्टरांनी केले त्यामुळे अनेक रुग्णांना जिवनदान मिळाले तसेच मोठ्या प्रमाणात पैशाचीही बचत झाली त्यामुळे डाँक्टर डेच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर सिद्धांत कुदळे डाँक्टर मंजुश्री जाधव श्रीमती ममता धिवर डाँक्टर शषांक जैन डाँक्टर अरबाज पठाण डाँक्टर दिपक तेलोरे गणेश टाकसाळ संतोष शेलार गायकवाड सिस्टर खरात सिस्टर तसेच गावातील डाँक्टर रविंद्र गंगवाल डाँक्टर शशिकांत जोशी कडेकर डाँक्टर अशुतोष जोशी डाँक्टर स्मिता जोशी डाँक्टर सुधीर काळे डाँक्टर संपदा काळे डाँक्टर श्रीकृष्ण काळे डाँक्टर संदीप काळे डाँक्टर शैलेश पवार डाँक्टर रामेश्वर राशिनकर डाँक्टर जयश्री राशिनकर डाँक्टर भारत काळे डाँक्टर दिपक अनभुले डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ डाँक्टर  अनिता निर्मळ डाँक्टर भारत भुजबळ डाँक्टर अविनाश  गायकवाड डाँक्टर आरती गायकवाड डाँक्टर मिलींद बडधे डाँक्टर अपर्णा बडधे डाँक्टर वसुंधरा भुजबळ डाँक्टर महेश जोशी  आदिंचा सत्कार करण्यात आला या वेळी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम दिपक क्षत्रिय महेश ओहोळ अतिश देसर्डा आदि उपस्थित होते.

(प्रतिनिधी) :राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास  Dy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग होताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे यास  उत्तरप्रदेश येथून शिताफीने अटक केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु राहुरी पोलिसांनी व्यापारी अनिल गावडे यास सहआरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे कलम वाढवून   न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget