करोना लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्यात यावे; - समाजवादी पार्टीची मागणी.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) - सध्या राज्यात महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या विजबील वसुली विरुद्ध समाजवादी पार्टीतर्फे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,यावेळी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादारसह स.पा.चे कार्यकर्ते उपस्थित होते.

 सध्या कोरोना संकटाने भरडला जात असलेला सर्वसामान्य नागरीक विज बिलाद्वारे संतप्त होत असुन आस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करत अक्षरशः मेटाकुटीला आला आहे,

विजबीलप्रश्नी शासनाने "सक्तीची विजबील वसुली" या सोडलेल्या तुघलकी फर्मानामुळे नागरीकांच्या संकटात आणखी भर पडून मोठ्या संतापाचा सामना करणे त्यांना भाग पडत आहे,कोरोना महामारीच्या संकटाने देशात  सर्वसामान्यांसोबत सर्वच क्षेत्रातील नागरीक भयंकर त्रस्त झालेले आहेत, त्यात शासनाकडून कधीही अचानक लॉकडाऊनचे नियोजन करण्यात येते ,यामुळे सर्वसामान्य माणसाला आपण जगावे कसे ? हेच समजून येत नाही,भविष्याची चिंता नेहमीच सर्वसामान्य माणसाला काळजीत टाकत असते,उद्याचा दिवस कसा असेल  किंवा आपल्या कुटूंबाचे उदर निर्वाह कसा करता येईल याच काळजीने त्यांचे रोजचे जीवन  भरडून जात आहे, माहे एप्रिल आणि मे २०२१ असे सलग दोन महिने शासनाकडून लॉकडाऊन लावले गेले,सर्वसामान्यांच्या घरात रोज कमविणे आणि खाणे असा नित्यक्रम असतो, दोन महिने सर्वसामान्यांच्या हाताला काम नव्हते,त्यात विज बिल भरले नाही म्हणून विज कंपनीची माणसे घरातील विज कनेक्शन बंद करणेकामी घरातील माणसांवर बळजबरी करत आहेत, विजेची बिले भरा अन्यथा विज कनेक्शन बंद करतो अशी धमकी दिली जात आहे, सर्वसामान्य नागरीकांचा अंत पाहिला जात आहे, त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे ,रोजगार नाही,काम नाही , उद्योग धंदे बंद आहेत,अशा परिस्थितीत प्रपंचाचा गाडा सर्वसामान्य माणूस कसा बसा पुढे रेटत आहे, त्याला शासनाच्या वतीने काही तरी सहानुभूती पुर्वक मदत अथवा सवलतीच्या माध्यमातून अर्धे विज बिल माफ करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते,मात्र सहानूभुती ऐवजी जर राज्यशासनाकडून नागरीकांना त्रास देण्याची भुमिका स्विकारली जात असेलतर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.अबु आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या या गलथान कारभार तथा तुघलकी फरमानाविरुद्ध  तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे भाग पडेल, असा गंभीर इशारा या निवेदनात देण्यात आला आहे,

 यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शहराध्यक्ष समीर शेख, शहरसचिव अब्दुल सैय्यद, शहर कार्याध्यक्ष ईरफान पठान, सोशल मीडिया अध्यक्ष जकरिया सैय्यद, शहर सहसंघटक परवेज शेख, जब्बार भाई पठाण,जलील शेख, शाहिद शेख, युनूस पठाण, आदी मान्यवार उपस्थित होते.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget