काल बेलापूर आरोग्य केन्द्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड गर्दी केली होती त्यातच लस केवळ १८० होती बऱ्याच दिवसापासुन लसीकरण बंद असल्यामुळे नागरीकांनी पहाटे पाच वाजेपासुनच रांगा पकडल्या होत्या त्यामुळे लसीकरण सुरु होताच कुणाचा नंबर या वरुन प्रचंड गोंधळ सुरु झाला या वेळी . जि.प.शरद नवले,सुनिल मुथा उपसरपंच अभिषेक खंडागळे, रविंद्र खटोड भरत साळुंके पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक सुधीर नवले राम पोळ देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार आदिंनी लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला.गोंधळ वाढल्यामुळे पोलिसांनाही पाचारण केले गेले.त्या वेळी सुनिल मुथा यांनी प्रथम आलेल्या सर्व महीलांचे लसीकरण करण्यात यावे असे सुचविले व सर्वानुमते त्यावर तात्काळ कार्यवाही झाली व लसीकरण शांततेत पार पडले पुन्हा लसीकरणा दरम्यान असा गोंधळ होवू नये या करीता सुनिल मुथा यांनी टोकण पध्दतीचा वापर करुन सकाळी नाव नोदंणी करुन मग लसीकरण करण्याच्या सुचना केल्या तसेच लसीकरणात कुणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नका असा सुचना वजा दमही भरला सर्वांच्या सुचनेनुसार आज पहाटेच उपसरपंच अभिषेक खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकाचे आधार कार्ड जमा करुन त्याचे नाव नोंदवुन टोकण दिल्यामुळे आजचे लसीकरण सुरळीत व शांततेत पार पडले
कालच्या गोंधळानंतर योग्य नियोजनामुळे आजचे लसीकरण सुरळीत नागरीकाकडून धन्यवाद.
बेलापूर (वार्ताहर ) - बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जि.प.सदस्य शरद नवले, सुनिल मुथा, सरपंच महेन्द्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे व प्रा.आरोग्य केन्द्राचे अधिका-यांनी टोकन पध्दतीचा वापर करुन लसीकरणाचे योग्य नियोजन केल्याने लसीकरण सुरळीतरित्या व शांततेत पार पडले.
कालचा अनुभव लक्षात घेवून आज २३० व्यक्तींचे लसीकरणाचे पूर्व नियोजन करण्यात आले. लसीकरणासाठी टोकन नंबर पध्दतीचा वापर करण्यात आला. टोकन नंबर पध्दतीमुळे लसीकरण सुरळीत व नियोजनबध्दरित्या गोंधळ न होता शांततेत पार पडले.या करीता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे रमेश अमोलीक विशाल आंबेकर महेश कुऱ्हे राहुल माळवादे ऋतुराज वाघ ओंकार साळुंके गोपी दाणी धनंजय पोळ सतीश व्यास राजेंद्र दांडगे गणेश टाकसाळ आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment