नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कायम सफाई कामगारांच्या नऊ मुलाना वारसा हक्काने नोकरी.

श्रीरामपूर(वार्ताहर)- कुठल्याही संस्थेतील कर्मचारी हा त्या संस्थेचा कणा असतो, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, तसेच  दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसाला पुन्हा सेवेत घेतल्यास खऱ्या अर्थाने त्या कर्मचाऱ्याला न्याय दिल्याचे समाधान मिळते असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.येथील यंशवतराव चव्हाण सभागृहामध्ये नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कायम सफाई कामगारांच्या नऊ मुलाना वारसा हक्काने नोकरी आदेश नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक याच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ प्रणिती दिपक चव्हाण बोलत होत्या.यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, नगरसेवक राजेद्र पवार, राजेश अलघ, रवि पाटिल,मुक्ताहर शहा,अलतमश पटेल, कामगार नेते दिपक चरण चव्हाण, रोहित शिंदे ,सहायक मिळकत व्यवस्थापक प्रकाश जाधव, संजय प्रधान,राहुल खलिपे, कार्यलयीन निरीक्षक कविटकर,अ‍ॅड.सर्जेराव कापसे यांच्यासह कामगार उपस्थित होते.पुढे बोलताना नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, माझे वडील गोविंदराव आदिक यांनी राष्ट्रीय पातळीवर कामगारांची संघटना चालवुन त्यांना न्याय मिळवून दिला. तोच वारसा माझे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक व मी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्काप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात यासाठी नगरसेविका सौ प्रणिती चव्हाण व कामगार नेते  दीपक चव्हाण यांनी कायम पाठपुरावा केला, आज खऱ्या अर्थाने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेविका सौ प्रणिती दीपक  चव्हाण म्हणाल्या, श्रीरामपूर नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच या कार्यकाळामध्ये अर्ध शतकापेक्षा जास्त सफाई कामगाराच्या वारसाना वारस हक्काने,अनुंकप तत्वावर ५० पेक्षा जास्त शासकिय नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. त्या सोबतच घनकचरा कामगार हे मागील कार्यकाळात अत्यंत अल्पवेतनात घनकचरा कामगार काम करत होते मात्र नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्वतः जातीने लक्ष घालत सफाई, झाडु व गटार,व कचरा संकलन करणार्या महिला कामगार यांचे रोज॔दारी वेतन पुर्वीपेक्षा दुप्पटीने वाढ केले. त्यांच्या या कार्यकाळात सेवा निवृत झालेल्या कर्मचार्याना सेवानिवृतीच्या रक्कमा हि मोठ्या प्रमाणात कामगाराना देण्यात आल्या त्याच बरोबर करोना काळात आरोग्य विभागाच्या कर्मचार्यानी श्रीरामपूर शहराची घेतलेली स्वच्छतेची जबाबदारी बघता प्रती कायम कामगार रुपये दोन लक्ष विमा श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मार्फत काढण्यात आला आहे. तसेच कामगारांची कामधेनु असलेली श्रीरामपूर नगर परिषद सेवक सहकारी पतसस्थेला हि नित्य नियमाने वित्त पुरवठा करुन नगर परिषद पतसस्थेला जिल्हा बॅकेची अतिरिक्त व्याजदर न लागता संस्था ही दोन कोटी रूपये तोट्यातुन निघुन  चालु आर्थिक वर्षात 24 लक्ष रुपये नफा मिळवू शकली ती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी संस्थेबद्दल जे आर्थिक धोरण केले त्यामुळे हा नफा झाला आहे.यावेळी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कायम सफाई कामगाराच्या नऊ मुलाना वारासा हक्काने नोकरी आदेश देण्यात आले त्यामध्ये सौरव जाधव, हेंमत जेधे, जितु झिंगारे,रोहित सोनवणे,रविद्र शेळके,अजय जाधव,योगेश बागडे,अक्षय बागडे यामध्ये या कामगारांचा समावेश होता यावेळी वैभव लुक्कड, चांदमल मांडण,किशोर शिंदे ,चंद्रकांत कोळी,भरत खेडकर, धंनजय कादंळकर आदि उपस्थित होते. यावेळी  प्रास्तविक नगरसेवक राजेद्र पवार यांनी केले तर आभार कामगार नेते दिपक चरण चव्हाण यांनी मानले.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget