Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा उद्या दिनांक ४ जुन पासुन सुरु होत असुन या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार होवु नये म्हणून शासनाने लाँकडाऊन घोषीत केला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाजावर बंदी आणली या जिल्ह्यातील प्रवासी त्या जिल्ह्यात जावून कोरोनाचा प्रसार करु नये म्हणून प्रवासी  बस वहातुक बंद केली त्यामुळे नोकरी निमित्त दुसऱ्या जिल्ह्यात जाणारांची मोठी गैरसोय झाली याचा फायदा खाजगी वहातुक करणाऱ्या वाहन धारकांनी घेतला अन प्रवाशांची लुटच सुरु झाली श्रीरामपुर ते पुणे हे भाडे आडीचशे रुपये असताना वाहन धारक अडवणूक करुन तिप्पट आकाराणी करु लागले ज्यांना जाणे गरजेचे होते त्यांनी ते ही सहन केले अखेर श्रीरामपुर बस डेपोने उद्यापासुन  श्रीरामपुर पुणे बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीतीआगार प्रमुख राकेश शिवदे यांनी दिली असुन या निर्णयाचे प्रवासी संघटनेने स्वागत केले असुन सकाळी सात वाजता श्रीरामपुर  पुणे ही बसा सुरु होणार असुन प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन
श्रीगोड यांनी केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी )- जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद करण्यात आलेला रस्ता पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली असुन मान्यवरांच्या उपस्थितीत ही भिंत तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे          काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाव घाटाकडे जाणारा रस्ता बंद करुन त्या ठिकाणी भिंत घातली होती त्या वेळी तत्कालीन  पदाधिकार्यांनी विरोध करणे गरजेचे होते तसे न झाल्यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असणारा वहीवाटीचा रस्ता बांधकाम विभागाच्या आडमुठेपणामुळे बंद करण्यात आला होता हा रस्ता बंद झाल्यामुळे बेलापुर गावातील बाजारपेठ ओस पडली होती त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाने ही भिंत पाडून रस्ता पूर्ववत सुरु करण्याचे अश्वासन व्यापारी वर्गाला दिले होते . त्या अश्वासनाच्या पूर्तीसाठी जि प सदस्य शरद नवले यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या कडे पाठपुरावा केला ग्रामस्थांची मागणी योग्य असल्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या प्रकरणी योग्य तो मार्ग काढण्याची सुचना केली त्यानुसार बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गेट बसविण्याच्या अटीवर रस्ता खुला करण्यास परवानगी दिली.त्यामुळे हा रस्ता खुला होणार असल्यामुळे व्यापारी बंधूंनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच गावकरी मंडळाने निवडणूकित गावकऱ्यांना दिलेल्या अश्वासनाची वचनपूर्ती केली असल्याने नागरिकांनीगावकरी मंडळाला धन्यवाद दिले आहेत. यावेळी गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा,जि प सदस्य  शरद नवले,प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड,सरपंच महेंद्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,अजय डाकले, भास्कर बंगाळ,अशोक गवते,भाजपाचे प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा,किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,यादव काळे,सचिन कोठारी  प्रवीण लुक्कड,मुस्ताक शेख, रमेश अमोलिक,प्रभात कु-हे,गणेश बंगाळ,

मोहसीन सय्यद, रमेश काळे, अकबर सय्यद, शफिक आतार,  दिपक क्षत्रिय,अनिल गाढे, रफिक शेख,सुमित बोरुडे, मनीष मुथा, सचिन अमोलिक, नितीन शर्मा,अक्षय दहिवाळ,विशाल आंबेकर,महेश कु-हे,दिलीप अमोलिक,सोमनाथ जावरे, जाकिर हसन शेख, शैलेश राठी, विलास कु-हे, शाहरुख आतार आदी उपस्थित होते.

अहमदनगर : दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असणा-या आरोपीसह वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी  पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे. सुरेश रणजित निकम, सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव या तिघांना पकडण्यात आले आहे.यापूर्वीच विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २३ एप्रिल रोजी मित्रासह गोरक्षानाथ गड, मांजरसुंबा येथे त्यांची ( एमएच१६ सीबी ३३२८) या दुचाकीवरुन वांबोरीफाटा मार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाच्या चढावर दुचाकीचा वेग कमी झाला. त्यावेळी घजालानी यांच्या समोरुन दोन व पाठीमागुन दोन असे एकूण ४ अज्ञात इसम दोन दुचाकीवरुन त्यांच्याजवळ येऊन त्याच्या मित्रास मारहाण करुन घजालानी  व त्याचा मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागिणे असा एकूण १ कोटी १६ लाख ५ हजार रु. किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत  एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितीक प्रेमचंद छजलानी (वय २० वर्ष रा. पंचशीलनगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. २५४/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी आरोपी  विकास हनवत, करण शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. ला हजर केलेले आहे.सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश निकम हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या पथकाच्या मदतीने शोध घेत असताना श्री कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे त्याचे घरी आला आहे. त्यानुसार श्री कटके यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने आरोपी रहात असलेल्या परिसरात सापळा लावला असता सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जावू लागला. त्यावेळी पथकातील पोलीसानी आरोपीचा पाठलाग करुन आरोपी  सुरेश रणजित निकम यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वसात घेऊन कसून व सखोल चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा यापूर्वी अटक करण्यात आलेले साथीदार तसेच सतिष बर्डे व सागर जाधव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी   सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई  गणेश इंगळे, पोहेकाॅ  दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना  सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, संदीप पवार, दिनेश मोरे, दिपक शिंदे, पोकॉ मच्छिन्द्र बर्डे, रविन्द्र घुंगासे, संदीप दरंदले, योगेश सातपूते, जालिंदर माने आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, जबरी चोरी या सारखे खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात अद्याप पावेतो फरार आहे.आरोपी सुरेश रणजित निकम याचे विरुध्द गुन्हे दाखल  असून एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. २१०/२०१५ भादवि कलम ३४१, ३९४, ३९५, ३९७ (फरार) २१५/२०१५ भादवि कलम ३९४, ३९५, ३९७ (फरार),एमआयडीसी पो.स्टे.  एमआयडीसी पो.स्टे.  सोनई पो.स्टे. गुरनं. येथे दाखल आहे.आरोपी सतिष अरुण बर्डे याचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे..,राहूरी पो.स्टे. येथे विविध प्रकारचे गुन्हा दखल आहे.आरोपी सागर शिवाजी जाधव याचे विरुध्द दाखल गुन्हे एमआयडीसी पो.स्टे. ,एमआयडीसी पो.स्टे. गुरनं.,पारनेर पो.स्टे. गुरनं.  राहूरी पो.स्टे. गुन्हा दाखल केले आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- शासकीय पातळीवरुन १ तारखेपर्यत लाँकडाऊनची घोषणा केल्यामुळे १ जुनला नागरीकांनी खुलेआम फिरण्यास सुरुवात केली असुन आपल्याकडे पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता लाँकडाऊन सुरुच असुन नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे अवाहन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.एक जुन उजाडताच व्यापार्यांनी लाँकडाऊन शिथील झाला या अविर्भावात व्यवहार सुरु केले तसेच नागरीकही विनाकारण बाहेर पडू लागले आहेत मात्र

आपल्या जिल्ह्यात असलेली पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता आपल्या जिल्ह्यात तालुक्यात लाँकडाऊनच्या नियमात शिथीलता आलेली नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून आपल्या सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विनाकारण घराबाहेर पडू नका मास्क व सँनिटायझरचा वापर करा असे अवाहन पोलीस निरीक्षक सांजय सानप यांनी केले असुन नियमाचे पालन न करणारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशाराही सानप यांनी दिला आहे.

 

*कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीला Dysp संदीप मिटकेंचा झटका,*

*चोरी आणि बनावट पोलिस ओळखपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल*

सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले  आहे. मोक्काच्या  गुन्ह्याचा तपास करीत असताना Dysp संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केलाआहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नयन तांदळे टोळीस मोठा झटका दिला आहे.

     फिर्यादी महेश  साहेबराव ससे वय 29 वर्ष धंदा व्यवसाय रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर यांचे दि 21/12/2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून  नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे चहा पिण्याकरिता गेले असता त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून फिर्यादीची तसेच  पोलिस विभागाची फसवणूक केली आहे त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून अजून एक गुन्हा रजि. नंबर I 419/2021 भा.द.वि. कलम. 379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास A.P.I.मुंडे हे करत आहेत.


*श्रीरामपुरातील सुरक्षा रामभरोसे!*

♦️श्रीरामपूर शहरात विविध भागात बसवलेले काही सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले आहे. तसे लेखी पत्रच

श्रीरामपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात माहिती मागविलेल्या कार्यकर्त्याला दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा रामभरोसे आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*सीसीटीव्ही फुटेजची केली होती मागणी*

♦️श्रीरामपूर शहरातील असलम बिनसाद यांनी २६ एप्रिल रोजी शहर पोलिस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यामध्ये २३ एप्रिल रोजीची पोलिसांकडून झालेल्या या अमानुष मारहाणी मुळे युवकाचे हात फँक्चर तर अनेकांना झाली अमानुष मारहाण प्रकरणाचे एका चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास विनंती केली होती.


*पोलिसांनी दिले हे उत्तर*

♦️पोलिसांनी असलम बिनसाद यांना पोलिस स्टेशनच्या लेटर पॅडवर २१ मे रोजी लिखित दिले की, 'आमच्या पोलिस स्टेशनच्या डीव्हीआरमध्ये वरील तारखेस तांत्रिक अडचण आल्याने सीसीटीव्ही फुटेजची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही, म्हणून आपणास सीसीटीव्हीची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही.'

*शहरातील सुरक्षा विषयी  केला सवाल*

♦️शासकीय व प्रशासकीय अधिकारी यावर घेणार का अँक्शन.

♦️शहरातील सुरक्षा व्यवस्था बंद पडल्याची केली होती का नोंद.

♦️ श्रीरामपूरातील वरिष्ठ अधिकारी यांची चुप्पी का?

♦️  जिल्हा पोलीस प्रमुख करणार का कारवाई.

बेलापूर(प्रतिनिधी  )- कोरोना काळात अडचणीत सापडलेले मागास वर्गीय अंपग महीलांना आधार देण्यासाठी  महीला व बाल कल्याण निधीतुन १०% रक्कम खर्च करावी अशी मागणी सरपंच  महेंद्र साळवी यांच्याकडे चंद्रकांत नाईक व इतरांनी केली आहे                                बेलापुर  ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व ग्राम विकास अधिकारी राजेश तगरे  यांना दिलेल्या  निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत फंडातील सन 2020-21 व सन 2021 -22 या दोन वर्षांचा मागासवर्गीय 15 टक्के, अपंग 5 टक्के, महिला व बालकल्याण 10 टक्के ग्रा. प. फंडातून खर्च करावयाच्या निधीचे  वाटप तातडीने करावे व  कोरोना सारख्या आजारामुळे लॉक डाऊन असल्याने मोल मजुरी चे काम बंद आहे  या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय अपंग महिलांना जीवनावश्यक वस्तू औषधे आदी कामा साठी रोख स्वरूपात ग्रा. पंचायतने निधिच्या रकमेतून आर्थिक सहाय्य करावे तसेच गावामधे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंगू मलेरिया टायफॉईड सारखे साथी च्या आजार चा फैलाव होऊ शकतो यासाठी गावा मध्ये व वाड्या वस्त्यावर डास निर्मूलन औषधा ची फवारणी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच श्री महिंद्र साळवी ग्राम विकास अधिकारी श्री तगरे  यांना निवेदन देण्यात आले या वेळी  सर्वश्री चंद्रकांत पाटील नाईक, अय्याज  सय्यद, विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, सुरेश अमोलिक, अनिल पवार, प्रकाश जाजू, अक्षय नाईक, वैभव कुर्ह्र त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत साळुंके व रविंद्र  खटोड, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक आदी उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget