बेलापूर (प्रतिनिधी )- जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद करण्यात आलेला रस्ता पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली असुन मान्यवरांच्या उपस्थितीत ही भिंत तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाव घाटाकडे जाणारा रस्ता बंद करुन त्या ठिकाणी भिंत घातली होती त्या वेळी तत्कालीन पदाधिकार्यांनी विरोध करणे गरजेचे होते तसे न झाल्यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असणारा वहीवाटीचा रस्ता बांधकाम विभागाच्या आडमुठेपणामुळे बंद करण्यात आला होता हा रस्ता बंद झाल्यामुळे बेलापुर गावातील बाजारपेठ ओस पडली होती त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाने ही भिंत पाडून रस्ता पूर्ववत सुरु करण्याचे अश्वासन व्यापारी वर्गाला दिले होते . त्या अश्वासनाच्या पूर्तीसाठी जि प सदस्य शरद नवले यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या कडे पाठपुरावा केला ग्रामस्थांची मागणी योग्य असल्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या प्रकरणी योग्य तो मार्ग काढण्याची सुचना केली त्यानुसार बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गेट बसविण्याच्या अटीवर रस्ता खुला करण्यास परवानगी दिली.त्यामुळे हा रस्ता खुला होणार असल्यामुळे व्यापारी बंधूंनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच गावकरी मंडळाने निवडणूकित गावकऱ्यांना दिलेल्या अश्वासनाची वचनपूर्ती केली असल्याने नागरिकांनीगावकरी मंडळाला धन्यवाद दिले आहेत. यावेळी गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा,जि प सदस्य शरद नवले,प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड,सरपंच महेंद्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,अजय डाकले, भास्कर बंगाळ,अशोक गवते,भाजपाचे प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा,किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,यादव काळे,सचिन कोठारी प्रवीण लुक्कड,मुस्ताक शेख, रमेश अमोलिक,प्रभात कु-हे,गणेश बंगाळ,
मोहसीन सय्यद, रमेश काळे, अकबर सय्यद, शफिक आतार, दिपक क्षत्रिय,अनिल गाढे, रफिक शेख,सुमित बोरुडे, मनीष मुथा, सचिन अमोलिक, नितीन शर्मा,अक्षय दहिवाळ,विशाल आंबेकर,महेश कु-हे,दिलीप अमोलिक,सोमनाथ जावरे, जाकिर हसन शेख, शैलेश राठी, विलास कु-हे, शाहरुख आतार आदी उपस्थित होते.
Post a Comment