बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा उद्या दिनांक ४ जुन पासुन सुरु होत असुन या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार होवु नये म्हणून शासनाने लाँकडाऊन घोषीत केला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाजावर बंदी आणली या जिल्ह्यातील प्रवासी त्या जिल्ह्यात जावून कोरोनाचा प्रसार करु नये म्हणून प्रवासी बस वहातुक बंद केली त्यामुळे नोकरी निमित्त दुसऱ्या जिल्ह्यात जाणारांची मोठी गैरसोय झाली याचा फायदा खाजगी वहातुक करणाऱ्या वाहन धारकांनी घेतला अन प्रवाशांची लुटच सुरु झाली श्रीरामपुर ते पुणे हे भाडे आडीचशे रुपये असताना वाहन धारक अडवणूक करुन तिप्पट आकाराणी करु लागले ज्यांना जाणे गरजेचे होते त्यांनी ते ही सहन केले अखेर श्रीरामपुर बस डेपोने उद्यापासुन श्रीरामपुर पुणे बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीतीआगार प्रमुख राकेश शिवदे यांनी दिली असुन या निर्णयाचे प्रवासी संघटनेने स्वागत केले असुन सकाळी सात वाजता श्रीरामपुर पुणे ही बसा सुरु होणार असुन प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन
Post a Comment