बेलापुर (प्रतिनिधी )- येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या कोवीड केअर सेंटरमुळे रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी सांदीप मिटके यांनी व्यक्त केले आहे बेलापुर येथील कोवीड सेंटरला उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी भेट दिली त्या वेळी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे डाँक्टर देविदास चोखर यांनी गावात सुरु असलेल्या मोफत कोवीड सेंटरची सविस्तर माहीती दिली या कोवीड सेंटरमधुन सर्व रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी गेले असल्याची माहीती शरद नवले यांनी दिली तसेच गावातील अनेक दानशुर व्यक्तींनी या कोवीड सेंटरला सढळ हाताने मदत केल्यामुळेच हे मोफत कोवीड सेंटर चालवीणे शक्य झाले असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले तर अजय डाकले अकबर टिन मेकरवाले गागरे यांनी रुग्णासाठी जेवाण सकस आहार अंडी हळदीचे दुध दिले असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले या वेळी रुग्णांना देण्यात येणारी औषधे व ईतर सुविधांची माहीती डाँक्टर देविदास चोखर यांनी दिली या वेळी रणजीत श्रीगोड अजय डाकले मुस्ताक शेख हाजी ईस्माईल पोलीस नाईक गणेश भिंगारदे साहेबराव वाबळे पोलीस पाटील अशोक प्रधान महेश ओहोळ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment