Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपूर शहरातील  अजब प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला असुन श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी  चक्क सी सी टी व्ही कँमेरे  बंद असल्याचे पत्र श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या कार्यकर्त्याला लेखी दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे       या बाबत मिळालेली माहीती  अशी कि श्रीरामपूर शहरातील तिरंगा न्युज चे संपादक असलम बिनसाद यांनी दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी शहर पोलीस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती कि दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजीची छ.शिवाजी चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सी सी टी वि फुटेज मीळण्यास विनंती केली होती त्यावर शहर पोलीस स्टेशनने असलम बिनसाद यांना पोलीस स्टेशनच्या लेटर पॅडवर दिनांक २१ मे २०२१ रोजी लिखित पत्र  दिले कि आमच्या पोलीस स्टेशनचे  डी व्ही आर यात वरील तारखेस तांत्रिक अडचण  आल्याने  सी सी टी वि फुटेज ची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून आपणास सी सी टी वि ची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही असा उल्लेख शहर पोलीस स्टेशने केला आहे यावरून स्पष्ट होते कि हे सी सी टी वि कॅमेरे हे फक्त शोभेचे बाहुले आहे की काय ? पोलिसांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावले असल्याने शहराची सुरक्षा राम भरोसे आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे दिलेल्या माहिती अधिकारात असे उत्तर शहर पोलीस स्टेशन कडून अपेक्षित नव्हते कारण कि शहरात गजबजल्या ठिकाणीच जर सी सी टी वि बंद आहेत तर  पोलिसांना हे माहित  बंद असलेले सी सी टि व्ही सुरु करण्याची तसदी का घेतली नाही  आहेत कदाचित कँमेरे चालूही असतील परतु काही माहीती उघड होवु नये  म्हणून तर अश्या प्रकारचे पत्र देऊन माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली की काय अशी शंका येत आहे   ह्या माहिती आधीकारात पाठविलेल्या  प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप विभागीय अधिकारी यांच्या कडे अपील दाखल करणार असल्याचे  असलम बिनसाद यांनी प्रसार माध्यम यांना सांगितले .

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्रच कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सुरक्षितेचा उपाय म्हणून जिल्हाभरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे, शासनाच्या आदेशान्वये दुचाकीवर एकाच प्रवाशात अत्यावश्यक कामांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे,अशा प्रकारे शासनस्तरावरून कोरोनास प्रतिबंध घालण्याच्या विविध उपाययोजना चालु आहे,हे खरोखरच स्तूतीजन्य व रास्त असलेतरी,आता प्रत्येकाच्या घरी काही चारचाकी वाहन नक्कीच नाही,किंबाहूना दुचाकीही नाही,मात्र परीवारातील कोणी सदस्य आजारी असल्यास अक्षरशः शेजाऱ्यांकडून तात्पुर्ती दुचाकी घेऊन का होईना जर संबंधित रुग्णांस रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घेऊन गेल्यास आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ जनमानसासाठी भररस्त्यावर उभा पोलिस दादा आपल्या काठीने दुचाकीची खोपडी फोडतो,

इंडिगेटर तोडतो त्यावर दोनशे रुपयांचा दंड फाडतो,मात्र काहीही बोलायास गेलो की चक्क दुचाकी पोलिस स्टेशनला ओढतो, स्वतः:च दुखत असल्याने रुग्णांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात जाता येईना, आणि दुसऱ्यांना देखील त्यांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेता येईना,अशा पद्धतीने जनसामान्यांना मोठ्या संतापाचा सामना करावा लागत आहे,काही ठिकाणी तर एकट्या दुचाकी चालकास कुठलीही विचारपूस न करता दुचाकी दिसताच लांबुनच काही पोलिस दादा काठी फेकुन मारण्याचे यशस्वी प्रयोग करत आहेत,यामध्ये रुग्णांसह दुचाकीस्वारास खाली कोसळून गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागत आहे,नुकतेच एक प्रकरण  मागेही असेच घडले आहे, ज्यात एका धार्मिक स्थळाचा सेवेकरी धार्मिक स्थळाचा अश्व (घोडा) घेऊन चालला होता,त्यास पोलिसदादांकरवी इतकी अमानूष मारहाण करण्यात आली की हात फॅक्चर होऊन थेड रुग्णालयात दाखल व्हावे लागले,अशाप्रकारे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नावाखाली श्रीरामपूर शहरात पोलिसदादांकरवी लोकांना मारहाण आणि जबरदस्तीने दंड पावती फाडण्याचे कामे सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे वरीष्ठ पोलिस अधिकारी देखील यावर काहीच बोलण्यास तयार नाही, यामुळे सदरील प्रकरणी त्यांचाही अशा गैरप्रकारांना छुपा पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस प्रशासन'आरोग्य सेवा ही आजच्या काळात साक्षात देवदुतच आहेत याबाबत दुमत नाहीच,मात्र यातील काही असंमंजस प्रवृती या पवित्र खात्याला आणि नात्याला बदनाम करु पाहत आहेत,यावर  जिल्हाधिकारी/जिल्हा पोलिस प्रमुख,जनतेला दिलासा दायक काही निर्णय घेतील का ? अन्यथा जनतेवर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या गळचेपीवर सामाजिक कार्यकर्ताआता गप्प बसणार नाहीत तर याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे समाजवादी पार्टी चे उत्तर जिल्हाध्यक्ष तथा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-लोक सहभागातुन सुरु केलेल्या कोवीड केअर सेंटरला एक महीन्याचा कालावधी पुर्ण झाला असुन या कालावधीत दोनशे रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याची माहीती जि. प .सदस्य शरद नवले यांनी दिली .  बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या मोफत कोवीड केअर सेंटरला एक महीना पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन खरेदी केलेल्या अँम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा जि .प. सदस्य शरद नवले यांच्या हस्ते डाँक्टर देविदास चोखर ,सरपंच महेंद्र साळवी यां मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला  .   या वेळी बोलताना जि. प. सदस्य शरद नवले म्हणाले की जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन  अँम्बुलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातील एक अँम्बुलन्स बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रास देण्यात आलेली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन नविन अँम्बुलन्समुळे वैद्यकीय अधिकार्यांना काम करणे सोपे होईल . लोक सहभागातुन सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेटर मधुन रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा दिल्यामुळे सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले . हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी गाव व परिसरातील अनेक दाते, देणगीदार धावुन आले .सर्वांनी केलेल्या योगदानामुळेच हे अवघड काम शक्य झाले असुन गावाचे गावपण टिकविण्यासाठी सर्वांनी अशीच एकजुट दाखवावी असे अवाहनही नवले यांनी केले आहे. या वेळी डाँक्टर सुधीर काळे ,डाँक्टर रविंद्र गंगवाल, डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ ,डाँक्टर अविनाश  गायकवाड ,डाँक्टर अनिल भगत, रणजीत श्रीगोड ,अजय डाकले, पुरुषोत्तम भराटे, पोलीस पाटील अशोक प्रधान, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, बाळासाहेब दाणी, साहेबराव वाबळे, अकबर टिन मेकरवाले, मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, अशोक राशिनकर, संतोष डाकले, मिनु अंबिलवादे ,दिलीप अमोलीक, नाना चव्हाण ,सोमनाथ जवरे, किरण गागरे ,अमोल गाढे, सतीश शेलार ,विशाल आंबेकर, महेश कुर्हे ,संतोष शेलार उपस्थित होते .

अहमदनगर-अश्लील फोटो (सोशल मीडिया) इंस्टाग्रामवर प्रसारीत करुन  मुलीला आणि कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे.  पोनि .अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून  रोहीत जालिंदर पाटोळे( रा.फर्याबाग) यास अटक केली आहे. भादविक ३५४(ड), ५०६ (२), ५०७ सह माहीती तंत्रज्ञान कायदा २०२० चे कलम ६६ (अ), ६६ होता. (ई) व ६७ प्रमाणे आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहित अशी की  १७ मे २०२१ रोजी  एका  मुलीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, रोहीत जालिंदर पाटोळे रा.फर्याबाग, अहमदनगर याचे व माझे एकमेकावर प्रेम होते. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहीत पाटोळे याने त्याचे मोबाईल मध्ये आमचे दोघांचे काही खाजगी फोटो काढलेले होते. त्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फिर्यादी मुलीस लग्नाची मागणी घालु लागला. त्यास फिर्यादी मुलीने नकार दिला असता आरोपीने यांने फिर्यादी मुलीस व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवू लागला. तसेच फिर्यादी मुलीचे नावाने इंस्टाग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावर त्यांचे मोबाईलमध्ये काढलेले खाजगी फोटो व व्हीडीओ प्रसारीत करु लागल्याने फिर्यादी मुलीने भिंगार पोलीस स्टेशनला गु.रजि.नं. १७८/२०२१ भादविक ३५४(ड), ५०६ (२), ५०७ सह माहीती तंत्रज्ञान कायदा २०२० चे कलम ६६ (अ), ६६ होता. (ई) व ६७ प्रमाणे आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फरार झालेला होता. पोनि .अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी नाम रोहीत पाटोळे हा येरवडा, पुणे येथे राहत आहे. सदर बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/ फकीर शेख, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/ रविकिरण सोनट्टके पो कॉ/ सागर सुलाने पोकां/ रोहीत येमुल, पोकॉ/ मयुर गायकवाड पोकॉ/ मच्छिंद्र बर्ड व चालक पोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांनी मिळुन येरवडा पुणे परीसरात आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे रोहित जालींदर पाटोळे वय २४ रा.फर्याबाग सोलापुर रोड, अहमदनगर यास गुन्हयात वापरलेल्या मोबाईलसह ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाई कामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोस्टे करीत आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- गेल्या दीड वर्षांपासून 'उम्मती फाउंडेशन' कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन यांबरोबर खांद्याला खांदा लावून सातत्याने प्रयत्न करीत आहे. भविष्यात येणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण हाेणे अतिशय आवश्यक आहे. सरकारी लसीकरण केंद्रात तुफान गर्दी होत असल्याने 'उम्मती फाउंडेशन' तर्फे श्रीरामपूर शहरात नवीन व सर्व सुविधांनी परिपूर्ण असे खासगी कोव्हीड लसीकरण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे, यावेळी उम्मतीचे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी ग्रामीण रुग्णालय,श्रीरामपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड यांना भेटून लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली, त्यावेळी डॉ.बंड यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे पाठविला, त्यावेळी 'उम्मती' चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपुर-दि.२१/०५/२०२१ रोजी रात्री ०३/३० या चे दरम्यान बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वार्ड नं.२ येथील राहते घराचे जिन्याचे बंद घराचे दरवाज्याचे आतील कडी काढून ओप्पो कंपनीचे २ मोबाईल फोन घरफोडी चोरी करुन नेले बाबत जमील इब्राहिम शहा वय-४१ वर्षे,धंदा- व्यापार रा.बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वार्ड नं.२ श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर यांचे फिर्याद वरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल. झालेला होता. तसेच दिनांक २१/०५/२०२१ रोजी रात्री १०/०० ते दिनांक २२/०५/२०२१ रोजी सकाळी ०६/०० वा.चे दरम्यान संजयनगर वार्ड नं.२ श्रीरामपूर येथील गोडावून मधील खोलीची खिडकी कशाने तरी उघडून खिडकीतून टेबलावर ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरुन नेले बाबत शकील शहा यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. तसेच दिनांक २१/०५/२०२१ रोजी रात्री बाबरपूरा चौक, काझीबाबा रोड वार्ड नं.२ श्रीरामपूर येथे घराचे दरवाज्याचे कुलुप तोडून सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले बाबत फिर्यादी नामे इसाक शहा यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता.त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री संजय सानप यांना मिळालेला गुप्त माहिती प्रमाणे आरोपीनामे शहबाज सलिम शहा वय-२२ वर्ष रा.काझीबाबारोड वार्ड नं.२ श्रीरामपूर यास वार्ड नं.२ श्रीरामपूर यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्या संदर्भात सखोल तपास करता त्याने उपरोक्त तिनही घरफोड्या केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडून तीन मोबाईल व एक मंगळसुत्र असे एकूण ७५,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमूद तिन्ही घरफोड्याचे गुन्हे घडल्यानंतर अवघ्या २४ तासाचे आत आरोपीला पकडून त्याचकडून उपरोक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदर आरोपीविरुध्द खालील प्रमाणे दरोडा तयारीचे दोन गुने, दुखापतीचा एक गुन्हा, तसेच चोरीचा एक गुन्हा दाखल आहेत.

१) श्रीरामपूर शहर पोस्टे गुर.नं. १ २३०/२०१९ भादवि कलम ३८०,३४ 

२) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. १ २७२/२०१४ भादवि कलम ३२५,३२३,५०४,५०६

३) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. । २७७/२०१८ भादवि कलम ३९९,४०२

४) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं ।। ११५/२०२१ म.पो.का.क १२४

५) राहुरी पोस्टे गुरनं. १२३५/२०१९ भादवि कलम ३९९,४०२ आर्म अॅक्ट ४/२५ सदरची कारवाई मा.श्री मनोज पाटील पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे मंडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री संदीप मिटके साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय सानप, पोहेको जोसेफ साळवी,पोना बिरप्पा करमल पोकॉ/ किशोर जाधव पोकों/ राहुल नरवडे पोकों/ सुनिल दिघे पोका महेंद्र पवार यांनी केली आहे.


आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके ,  PI सानप, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार  व नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांचे सह छत्रपती शिवाजी चौक येथे अचानक नाकाबंदी लावून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याचे  वाहनावर कारवाई करून जप्त केले  तसेच 85 इसमांची रॅपिड टेस्ट केली .त्यापैकी 2 पॉझिटिव्ह आढळून  आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या   इसमांची रवानगी  थेट कोविड केअर सेंटर येथे करण्यात आली आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही वेळातच श्रीरामपूर शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे पहायला मिळाले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget