श्रीरामपूर प्रतिनिधी- गेल्या दीड वर्षांपासून 'उम्मती फाउंडेशन' कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन यांबरोबर खांद्याला खांदा लावून सातत्याने प्रयत्न करीत आहे. भविष्यात येणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण हाेणे अतिशय आवश्यक आहे. सरकारी लसीकरण केंद्रात तुफान गर्दी होत असल्याने 'उम्मती फाउंडेशन' तर्फे श्रीरामपूर शहरात नवीन व सर्व सुविधांनी परिपूर्ण असे खासगी कोव्हीड लसीकरण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे, यावेळी उम्मतीचे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी ग्रामीण रुग्णालय,श्रीरामपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड यांना भेटून लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली, त्यावेळी डॉ.बंड यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे पाठविला, त्यावेळी 'उम्मती' चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment