Latest Post

अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध    असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय चखाले रा. निगडी , पुणे यांनी Cr. No. 504/ 2020 IPC 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मा. श्री मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल मा. श्री. अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. 

सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)नयन राजेंद्र तांदळे 

1) सूपा 504/20 IPC 399, 402

 2) सुपा 111/ 17 IPC 379, 34, 411

 3)  तोफखाना 6663/20 IPC 394, 365, 34... 

4) तोफखाना 1756/19 ipc 393, 34.

 5) तोफखाना 1715/19 ipc 392, 34 

 6) तोफखाना 1607/19 ipc 392 , 323, 34                                         7) तोफखाना 1546/19 ipc 394, 323, 34                                8) तोफखाना 1765/19 ipc 392 ,34.   

     2) विठ्ठल साळवे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 402 

2) सुपा 111/17 IPC 379, 34.  3)तोफखाना 6663/20 IPC 394, 365 34

  3) अक्षय ठोंबरे 

1) सुपा ipc 399, 402 

  4) शाहुल पवार 

1) सुपा 505/20 IPC 399, 402. 

2) सुपा 153/ 17 ipc 341, 394,396, 34

 3) 87/ 17 IPC 394,397, 34 4) 23/15 ipc 379, 354, 323.... 

5) अमोल पोटे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 34 

2) 86/17 ipc 394, 397, 34

 3) 118/ 15 सुपा ipc 379, 34

पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, मा. सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके हे करीत असून त्यांना PI नितीन गोकावे, PN अमोल धामणे, PN साहेबराव ओव्हाळ, PC यशवंत ठोंबरे यांचे पथक सहाय्य करीत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- कृषि उत्पन्न बाजार समीती बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकविलेला भाजीपाला कुठे विकावा तो जास्त काळ ठेवावा तर खराब होणार त्यामुळे या भाजीपाल्याचे काय करावे अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे                                               कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता बाजार समीतीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कर्ज काढुन भेंडी गवार टोमँटो गोबी फ्लाँबर पिकवीले आता बाजारच बंद असल्यामुळे हा माल कुठे विकावा की फेकावा या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे सध्या भेंडी तोडणीचे काम जोरात सुरु असुन एक दिवस जरी भेंडी तोडण्यास उशीर झाला तरी ती भेंडी पक्व होते त्यामुळे ती फेकुनच द्यावी लागते शिवाय भाजीपाला पिकवीताना शेतकऱ्यानी महागडी खते उधार आणुन ती पिकाला टाकली आहे भाजीपाला विकुन शेतकरी खताने पैसे भरणार होते आता भाजीपाला तोडणीचा वेळ आला तर बाजार समीत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कारण हा भाजीपाला जास्त दिवस ठेवु  शकत नाही तो लवकर खराब होतो त्यामुळे भाजीपाला विक्री साठी बाजार समीती सुरु ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बेलापूरः (प्रतिनिधी  )-।गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बेलापुर  बु!! प्रशासन व कोरोना समितीने बुधवारदिनांक १९ मे ते रविवार दिनांक २३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला असुन या नियमाचे उल्लंघन करणारावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे     सध्या बेलापूर आणि परिसरात दिवसागणिक कोरोनाचा प्रसार वाढत आहे.विविध उपाययोजना करुनही परिस्थितीत सुधारणा होत नाही.या पार्श्वभूमीवर सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,सर्व राजकीय पक्षांचे नेते व प्रमुख,पत्रकार,पोलिस पाटिल,व्यापारी असोसिएशन,किराणा मर्चट असोसिएशन,महसूल व पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी आदिंनी विचार विनिमय करुन गावाच्या सुरक्षिततेसाठी  बुधवार १९ मे ते रविवार २३ मे पर्यंत पाच दिवसांचा कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या कालावधित नियमबाह्य वर्तन करणारावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे .या कालावधित वैद्यकीय सुविधा वगळता अन्य सर्व दुकाने भाजीपाला,फळे,किराणा,मांस,मासे,पीठ गिरणी,शेती विषयक दुकाने,बेकरी आदि सर्व व्यवहार बंद राहणार आहेत याची सर्व व्यापारी व्यवसायीक नागरीक यांनी नोंद घ्यावी .त्याचप्रमाणे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर प्रतिबंध असेल.या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.तरी नागरिक,व्यापारी,भाजीपाला व फळ विक्रेते आदिंनी ग्रामपंचायत,महसूल,पोलिस प्रशासन तसेच कोरोना समितीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख,व्यापारी व किराणा मर्चण्ट असोसिएशनचे पदाधिकारी,पत्रकार,ग्रामसेवक राजेश तगरे,का.तलाठी श्री.कैलास खाडे,पोलिस पाटिल अशोक प्रधान,बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल .लोटके  तसेच कोरोना समितीने केले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- येथील निराधार दिव्यांगाला वेळेवर औषधोपचार मिळाल्यामुळे तसेच   सकारात्मक मानसिकता व प्रबळ ईच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली असुन आता त्या पुर्णपणे बर्या झालेल्या आहे. बेलापुर येथील नंदाताई क्षिरसागर या दोन्ही पायाने विकलांग आहे तसेच त्यांना कुणाचाही आधार नाही तरीही गावातील घरोघरी जावुन मिळेल ती कामे करुन त्या आपला उदार निर्वाह करतात त्यांना थोडा त्रास झाल्यावर त्यांनी माजी सरपंच भरत साळुंके यांना सांगितले त्यांनी तातडीने त्यांची आरोग्य तपासणी करुन घेतली त्यात त्याचा अहवाल पाँजिटीव्ह आला  नंदाताई क्षिरसागर दिव्यांग असल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करुन त्यांचेवर उपचार करण्याचा निर्णय वरद विनायक कोवीड केअर सेंटरचे डाँक्टर शैलेश पवार व डाँक्टर राशिनकर डाँक्टर  देविदास चोखर यांनी घेतला त्यांनी क्षिरसागर यांचेवर घरीच उपचार सुरु केले शिवसेनेचे अशोक पवार सचिन कडेकर किशोर राऊत ज्ञानेश्वर कुलथे यांनी  जेवाणाची व्यवस्था केली चौदा दिवसानंतर त्या ठणठणीत बर्या झाल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी )-शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणांना पढेगाव ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत पोलीसांच्या स्वाधीन केले असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी भूमीका उदय लिप्टे या शिवसैनिकाने घेतली आहे.पढेगाव येथील उदय लिप्टे भूषण राऊत सौरभ बनकर वृषभ काळे पुष्पराज खैरनार या युवकावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाने  शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे तरुणाचे आयुष्य उध्वस्त होवु नये म्हणून गावातील नागरीकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेवुन दिलगीरी व्यक्त केली व गुन्हा मागे घेण्याची विनंती केली पंरतु अँम्बुलन्सची मागणीच केली नाही केवळ गोधंळ घालण्याच्या उद्देशाने ते कार्यकर्ते येथे आले असल्याचे खासदार लोखंडे यांनी ग्रामस्थांना सांगितले त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा गावात जाऊन गावकर्यांची बैठक घेतली या बैठकीत गावातील युवकावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीसांना सहकार्य करुन सर्वांना पोलीसांच्या ताब्यात देण्याचे ठरले त्या वेळी उदय लिप्टे म्हणाले की मी दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मित्राच्या वडीलांना दवाखान्यात जाण्यासाठी  वेळेवर साधन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण शिवसैनिक या नात्याने खासदार लोखंडे यांच्याकडे अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेलो होतो त्या वेळी तेथे फक्त रखवालदारच होता त्या ठिकाणी दोन गाड्या झाकुन ठेवलेल्या होत्या मला वाटले त्या गाड्याचा उपयोग होवू शकतो म्हणून त्या वरील कापड काढून फोटो काढले त्याचा राग मनात धरुन लोकप्रतिनिधीनी त्यांच्या अंगरक्षकाला पढेगाव येथे पाठविले तेथेच मेजर उंडे यानी आपल्याला दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली त्या नंतर खासदार लोखंडे यांच्या दबावाखाली मी व माझ्या सहकारी मित्रावर खोटा गुन्हा दाखल केला मी लोकप्रतिनिधीचा आदर करतो परंतु काम घेवुन येणार्या कार्यकर्त्यावरच असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सामान्य नागरीकांनी यांच्या दारात जायचेच नाही का असा सवालही लिप्टे यांने केला असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी प्रतिज्ञाच उदय लिप्टे यांने ग्रामस्थासमोर केली आहे त्यांनतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले एकंदरच हा विषय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला या पूर्वीही अनेक लोकप्रतिनीधींशी नागरीकांचे वाद विवाद झालेले आहेत हमरा तुमरी देखील झालेली आहे परंतु ते विषय तेथेच संपले होते परंतु हा विषय पोलीस ठाण्यापर्यत गेल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- लिप्टे नावाच्या व्यक्तीने अँम्बुलन्स बाबत माझ्याकडे मागणीच केलेली नाही केवळ राजकीय हेतुने कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्रास देणे हाच हेतु असल्याचे मत  खासदार सदाशिव लोखंडे यांनी पढेगाव येथील ग्रामस्थासमोर व्यक्त केले  पढेगाव येथील उदय लिप्टे याचेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पढेगावचे  ग्रामस्थानी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेतली त्या वेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की मी या मतदार संघाचा लोकप्रतिनीधी आहे त्यामुळे माझ्याकडे कामे घेवुन येणे हा लोकांचा हक्क आहे जनतेच्या कामासाठीच आपण मला निवडून दिलेले आहे परंतु संबधीत लिप्टे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे किंवा माझ्या कार्यालयाकडे अँम्बुलन्स बाबत मागणीच केलेली नाही केवळ राजकीय हेतुने त्रास देणे हाच उद्देश  असुन यांचा बोलविता धनी वेगळाच असण्याची शक्यता आहे ती व्यक्ती एकदा नव्हे तर दोन वेळा या ठिकाणी आली होती दोन्ही वेळेस त्यांनी रखवालदाराशी हुज्जत घातली तसेच ज्या गाड्यांची मागणी केली त्या गाड्या अँम्बुलन्स नाहीत हे सांगुन  देखील त्याने गाडीवरील पान कापड फाडून गोंधळ घातला हे कृत्य संबंधीतांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन केलेले आहे खरे कारण हे जनतेसमोर आले पाहीजे ग्रामस्थांनी देखील घडलेल्या घटनेची खरी माहीती घेवुनच बातम्या दिल्या पाहीजे असेही खासदार लोखंडे म्हणाले या वेळी पढेगावचे सरपंच किशोर बनकर रणजीत बनकर अँड .प्रविण लिप्टे दत्तात्रय लिप्टे गौरव कांदळकर विकास झगडे सचिन भूजबळ राजेंद्र बनकर चांगदेव येसेकर विठ्ठल बनकर सतीश काळे शशिकांत शिंदे संदीप मते भगवान तेलोरे उपस्थित  होते.

श्रीरामपुरात दोन हातात दोन तलवारी घेवुन दहशत माजवणाऱ्या शाहरुख शेखला पोलिसांनी पकडले...

 श्रीरामपूर- या घटनेची हकीकत अशी की,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की,साई नगर ,वॉर्ड नंबर 2 ,श्रीरामपूर येथे कच्चारोडने एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे.त्यावरून पोलीस साई नगर, वार्ड नंबर 2 ,श्रीरामपूर येथे गेले असता समोरून एक इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला म्हणून पोलिस त्याच्या दिशेने गेले आसता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.त्याला पंचांसमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरुख अन्वर शेख ,वय-21 राहणार -शनी चौक ,वॉर्ड नंबर 2 ,श्रीरामपूर असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या समोर त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या दोन लोखंडी तलवारी किंमत एकूण ११००₹ असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

              ही कामगिरी श्री.पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीमती डॉक्टर दिपाली काळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री.संदीप मिटके ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग ,श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी ,पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे ,पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार ,पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी ,पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget