बेलापुर (प्रतिनिधी )- कृषि उत्पन्न बाजार समीती बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकविलेला भाजीपाला कुठे विकावा तो जास्त काळ ठेवावा तर खराब होणार त्यामुळे या भाजीपाल्याचे काय करावे अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता बाजार समीतीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कर्ज काढुन भेंडी गवार टोमँटो गोबी फ्लाँबर पिकवीले आता बाजारच बंद असल्यामुळे हा माल कुठे विकावा की फेकावा या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे सध्या भेंडी तोडणीचे काम जोरात सुरु असुन एक दिवस जरी भेंडी तोडण्यास उशीर झाला तरी ती भेंडी पक्व होते त्यामुळे ती फेकुनच द्यावी लागते शिवाय भाजीपाला पिकवीताना शेतकऱ्यानी महागडी खते उधार आणुन ती पिकाला टाकली आहे भाजीपाला विकुन शेतकरी खताने पैसे भरणार होते आता भाजीपाला तोडणीचा वेळ आला तर बाजार समीत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कारण हा भाजीपाला जास्त दिवस ठेवु शकत नाही तो लवकर खराब होतो त्यामुळे भाजीपाला विक्री साठी बाजार समीती सुरु ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Post a Comment