बेलापूरः (प्रतिनिधी )-।गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बेलापुर बु!! प्रशासन व कोरोना समितीने बुधवारदिनांक १९ मे ते रविवार दिनांक २३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला असुन या नियमाचे उल्लंघन करणारावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे सध्या बेलापूर आणि परिसरात दिवसागणिक कोरोनाचा प्रसार वाढत आहे.विविध उपाययोजना करुनही परिस्थितीत सुधारणा होत नाही.या पार्श्वभूमीवर सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,सर्व राजकीय पक्षांचे नेते व प्रमुख,पत्रकार,पोलिस पाटिल,व्यापारी असोसिएशन,किराणा मर्चट असोसिएशन,महसूल व पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी आदिंनी विचार विनिमय करुन गावाच्या सुरक्षिततेसाठी बुधवार १९ मे ते रविवार २३ मे पर्यंत पाच दिवसांचा कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या कालावधित नियमबाह्य वर्तन करणारावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे .या कालावधित वैद्यकीय सुविधा वगळता अन्य सर्व दुकाने भाजीपाला,फळे,किराणा,मांस,मासे,पीठ गिरणी,शेती विषयक दुकाने,बेकरी आदि सर्व व्यवहार बंद राहणार आहेत याची सर्व व्यापारी व्यवसायीक नागरीक यांनी नोंद घ्यावी .त्याचप्रमाणे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर प्रतिबंध असेल.या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.तरी नागरिक,व्यापारी,भाजीपाला व फळ विक्रेते आदिंनी ग्रामपंचायत,महसूल,पोलिस प्रशासन तसेच कोरोना समितीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख,व्यापारी व किराणा मर्चण्ट असोसिएशनचे पदाधिकारी,पत्रकार,ग्रामसेवक राजेश तगरे,का.तलाठी श्री.कैलास खाडे,पोलिस पाटिल अशोक प्रधान,बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल .लोटके तसेच कोरोना समितीने केले आहे.
Post a Comment