बेलापुर (प्रतिनिधी )- येथील निराधार दिव्यांगाला वेळेवर औषधोपचार मिळाल्यामुळे तसेच सकारात्मक मानसिकता व प्रबळ ईच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली असुन आता त्या पुर्णपणे बर्या झालेल्या आहे. बेलापुर येथील नंदाताई क्षिरसागर या दोन्ही पायाने विकलांग आहे तसेच त्यांना कुणाचाही आधार नाही तरीही गावातील घरोघरी जावुन मिळेल ती कामे करुन त्या आपला उदार निर्वाह करतात त्यांना थोडा त्रास झाल्यावर त्यांनी माजी सरपंच भरत साळुंके यांना सांगितले त्यांनी तातडीने त्यांची आरोग्य तपासणी करुन घेतली त्यात त्याचा अहवाल पाँजिटीव्ह आला नंदाताई क्षिरसागर दिव्यांग असल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करुन त्यांचेवर उपचार करण्याचा निर्णय वरद विनायक कोवीड केअर सेंटरचे डाँक्टर शैलेश पवार व डाँक्टर राशिनकर डाँक्टर देविदास चोखर यांनी घेतला त्यांनी क्षिरसागर यांचेवर घरीच उपचार सुरु केले शिवसेनेचे अशोक पवार सचिन कडेकर किशोर राऊत ज्ञानेश्वर कुलथे यांनी जेवाणाची व्यवस्था केली चौदा दिवसानंतर त्या ठणठणीत बर्या झाल्या.
Post a Comment