बेलापुर (प्रतिनिधी )-शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणांना पढेगाव ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत पोलीसांच्या स्वाधीन केले असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी भूमीका उदय लिप्टे या शिवसैनिकाने घेतली आहे.पढेगाव येथील उदय लिप्टे भूषण राऊत सौरभ बनकर वृषभ काळे पुष्पराज खैरनार या युवकावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे तरुणाचे आयुष्य उध्वस्त होवु नये म्हणून गावातील नागरीकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेवुन दिलगीरी व्यक्त केली व गुन्हा मागे घेण्याची विनंती केली पंरतु अँम्बुलन्सची मागणीच केली नाही केवळ गोधंळ घालण्याच्या उद्देशाने ते कार्यकर्ते येथे आले असल्याचे खासदार लोखंडे यांनी ग्रामस्थांना सांगितले त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा गावात जाऊन गावकर्यांची बैठक घेतली या बैठकीत गावातील युवकावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीसांना सहकार्य करुन सर्वांना पोलीसांच्या ताब्यात देण्याचे ठरले त्या वेळी उदय लिप्टे म्हणाले की मी दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मित्राच्या वडीलांना दवाखान्यात जाण्यासाठी वेळेवर साधन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण शिवसैनिक या नात्याने खासदार लोखंडे यांच्याकडे अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेलो होतो त्या वेळी तेथे फक्त रखवालदारच होता त्या ठिकाणी दोन गाड्या झाकुन ठेवलेल्या होत्या मला वाटले त्या गाड्याचा उपयोग होवू शकतो म्हणून त्या वरील कापड काढून फोटो काढले त्याचा राग मनात धरुन लोकप्रतिनिधीनी त्यांच्या अंगरक्षकाला पढेगाव येथे पाठविले तेथेच मेजर उंडे यानी आपल्याला दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली त्या नंतर खासदार लोखंडे यांच्या दबावाखाली मी व माझ्या सहकारी मित्रावर खोटा गुन्हा दाखल केला मी लोकप्रतिनिधीचा आदर करतो परंतु काम घेवुन येणार्या कार्यकर्त्यावरच असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सामान्य नागरीकांनी यांच्या दारात जायचेच नाही का असा सवालही लिप्टे यांने केला असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी प्रतिज्ञाच उदय लिप्टे यांने ग्रामस्थासमोर केली आहे त्यांनतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले एकंदरच हा विषय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला या पूर्वीही अनेक लोकप्रतिनीधींशी नागरीकांचे वाद विवाद झालेले आहेत हमरा तुमरी देखील झालेली आहे परंतु ते विषय तेथेच संपले होते परंतु हा विषय पोलीस ठाण्यापर्यत गेल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
Post a Comment