बेलापुर (प्रतिनिधी )- लिप्टे नावाच्या व्यक्तीने अँम्बुलन्स बाबत माझ्याकडे मागणीच केलेली नाही केवळ राजकीय हेतुने कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्रास देणे हाच हेतु असल्याचे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी पढेगाव येथील ग्रामस्थासमोर व्यक्त केले पढेगाव येथील उदय लिप्टे याचेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पढेगावचे ग्रामस्थानी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेतली त्या वेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की मी या मतदार संघाचा लोकप्रतिनीधी आहे त्यामुळे माझ्याकडे कामे घेवुन येणे हा लोकांचा हक्क आहे जनतेच्या कामासाठीच आपण मला निवडून दिलेले आहे परंतु संबधीत लिप्टे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे किंवा माझ्या कार्यालयाकडे अँम्बुलन्स बाबत मागणीच केलेली नाही केवळ राजकीय हेतुने त्रास देणे हाच उद्देश असुन यांचा बोलविता धनी वेगळाच असण्याची शक्यता आहे ती व्यक्ती एकदा नव्हे तर दोन वेळा या ठिकाणी आली होती दोन्ही वेळेस त्यांनी रखवालदाराशी हुज्जत घातली तसेच ज्या गाड्यांची मागणी केली त्या गाड्या अँम्बुलन्स नाहीत हे सांगुन देखील त्याने गाडीवरील पान कापड फाडून गोंधळ घातला हे कृत्य संबंधीतांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन केलेले आहे खरे कारण हे जनतेसमोर आले पाहीजे ग्रामस्थांनी देखील घडलेल्या घटनेची खरी माहीती घेवुनच बातम्या दिल्या पाहीजे असेही खासदार लोखंडे म्हणाले या वेळी पढेगावचे सरपंच किशोर बनकर रणजीत बनकर अँड .प्रविण लिप्टे दत्तात्रय लिप्टे गौरव कांदळकर विकास झगडे सचिन भूजबळ राजेंद्र बनकर चांगदेव येसेकर विठ्ठल बनकर सतीश काळे शशिकांत शिंदे संदीप मते भगवान तेलोरे उपस्थित होते.
Post a Comment