Latest Post

अहमदनगर -दिनांक २२/०४/२०२१ रोजी आरोपी नामे १) विपूल नरेश वक्कानी, वय- ४० वर्षे, ह. रा. प्लॉट नं. १०, कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, मूळ रा. प्लॉट नं. डी-९०३, मार्वल इनिगमा, युवान आयटी पार्क जवळ, खराडी, पुणे याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून स्टेट बँक, शाखा- सावेडी येथे बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न करुन तसेच साथीदार आरोपशी संगनमत करुन अशाच प्रकारे आयसीआयसीआय बँक, शाखा चिंचवड, पुणे येथेही बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न केला तसेच वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांचे नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करुन त्यावर खोट्या सह्या करुन सदर दस्त हे खरे असल्याचे भासवून शासनाची व वेगवेगळ्या फर्मची फसवणूक करुन ते बँकेमध्ये वटविण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केलेली आहे. याबाबत पोना/१५१६ रविकिरण बाबूराव सोनटक्के, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३१७/२०२१, भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्ह्याचा तपास श्री. मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत असून सदर गुन्ह्यात यापूर्वी आरोपी नामे १) विपूल नरेंद्र वक्कानी, वय- ४० वर्षे, रा. प्लॉट नं. १०, कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, २) यशवंत दत्तात्रय देसाई, वय- ४९ वर्षे, रा. सी-४१, एसडीएफसी कॉलनी, शाहूनगर, चिंचवड, पुणे, ३) नरेश रामचंद्र बालकोंडेकर, वय- ३३ वर्षे, रा. सर्वे नं. २३, हनुमान नगर, भगत वस्ती, भोसरी, पुणे, ४) राहूल ज्ञानोबा गुळवे, वय ४६ वर्षे, रा. राम मंदीर जवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ५) संदीप पंजाबराव भगत, वय ३२ वर्ष रा. कच्चरवाडी ता. इंदापुर जि. पुणे, ६) तुषार आत्माराम कुंभारे, वय ३४ वर्ष रा. कुंभारवाडा, वाघोली, जि. पुणे, ७) पंचशिल ज्ञानदेव शिंदे वय ४५ वर्ष रा. पुष्पा हो सोसा. संभाजी नगर, चिंचवड, जि. पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे.तपासामध्ये सदर गुन्ह्यात विजेंद्र दक्ष, रा. कालकाजी, दक्षिण दिल्ली हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे परवानगीने व श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि मिथून घुगे, पोना/सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, पोकॉ/रोहीत येमूल, चा. पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून दिल्ली येथे जावून दिल्ली पोलीसांचे मदतीने आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे विजेन्द्रकुमार उर्फ विजेन्द्र रघुनंदनसिंग दक्ष, वय ३९ वर्षे, रा. एन-२, कालकाजी, दक्षिण दिल्ली यांस ताब्यात घेतले. सदर आरोपीस मा. महानगर दंडाधिकारी, साकेत न्यायालय परिसर, नवी दिल्ली यांचे न्यायालयात हजर करुन आरोपीची दोन दिवसांची ट्रान्झीट रिमांड घेवून त्यांस अहमदनगर येथे आणून दि. ०३/०५/२०२१ रोजी अहमदनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची दि. ०७/०५/२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेकडून महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील अशा प्रकारचे विवीध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील कार्यवाही श्री. मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत आहेत.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विशाल ढुमे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर शहर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपुर शहर पोलीसांनी एका इसमाकडून गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतुस व एक चोरीची मोटारसायकल सह एकुण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या बाबत मिळालेली माहीती अशी की श्रीरामपूर शहराच्या प्रांत कार्यालय शेजारील खबड्डी या ठिकाणी एक इसम ज्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त बातमी द्वारे मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक  डॉ. दिपाली काळे यांच्या सूचनेनुसार डी वाय एस पी संदीप मिटके यांच्यासह पी आय संजय सानप

यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवाडे, पंकज गोसावी, राहुल गायकवाड, यांनी एका संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले  त्याने आपले नाव  बळीराम उर्फ बल्ली रामचीत यादव वय 30 वर्ष राहणार सरस्वती कॉलनी देवकर वस्ती वार्ड नंबर 7 असे असल्याचे सांगितले  त्याची अंग झडती घेतली असता  त्याच्याकडे  2500  रुपये किमतीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस त्याचप्रमाणे एक्टिवा गाडी 40000 रुपये किमतीचे एकूण 65000 रुपये किमतीचे मुद्देमाल आढळून आला त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ऍक्टिवा गाडी ही पुणे येथून चोरून आणल्याची कबुली आरोपीने दिली आहे  त्याचप्रमाणे आरोपीवर चैन  स्नँशिंग मोबाईल चोरी अशा अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर  1/ 248 / 2021 आर्म एक्ट 3,5,7/ 25 अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलीस यांचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवे हे करत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळमधल्या माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच शिखराच्या बेस कॅम्पवर श्रीरामपूर येथील तरुणाने भगवा ध्वज फडकावून पराक्रम केला आहे.शहरातील दळवीवस्ती मोरगे हॉस्पिटल परिसरात राहणारे सुनील कांबळे यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प नुकतेच सर केले आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे म्हणजे जवळपास माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची 60% मोहीम पूर्ण करणे होय. 21 एप्रिल 2021 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथून सुनील विलास छाया कांबळे यांनी एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर विविध टप्पे पार करून तसेच करोना आणि वैद्यकीय संदर्भातील इतर चाचण्या यांची पूर्तता करून सुनील कांबळे काल 1 मे रोजी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (उंची पाच हजार 364 मीटर) इथपर्यंत पोहोचले आहेत. तेथे पोहचल्यावर त्यांनी भगवा व तिरंगा ध्वज फडकाविला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महिन्यात ते एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचतील आणि श्रीरामपूरसाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित करतील अशी आशा आहे. सुनील कांबळे यांना या पुढच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी श्रीरामपूरकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अहमदनगर (प्रतिनिधी)-करोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने दुसर्‍या टप्प्यात कडक लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. पोलीस अधिकार्‍यांना 10 टक्के रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड व अन्य आरोग्य सुविधा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यात आता यात पोलीसांच्या नातेवाईकांही (घरातील व्यक्ती) समावेश करता येईल का? यासंदर्भात आरोग्य मंत्री यांच्याशी तत्काळ चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.मंत्री देसाई यांनी रविवारी नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री देसाई यांनी नुकताच विविध जिल्ह्यात जाऊन बैठका घेतल्या आहेत. तेथे सुद्धा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री देसाई म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्‍यांना करोनाची लागण झालेले आहेत, त्यांना आमच्या पॅनलवर जे रुग्णालय आहे.तेथे तात्काळ उपचार मिळत आहे. त्यामध्ये कुठेही कमतरता पडत नाही, काम करताना जर एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय या अगोदरच्या पहिल्या कोविड लाटेच्यावेळी घेण्यात आलेला होता. त्यानंतर तो थांबवण्यात आला होता, पण आता पुन्हा नव्याने तसा आदेश काढला जाणार आहे, कॅबिनेटने सुद्धा या विषयाला मंजुरी दिली असून त्याची सुद्धा लवकरच अंमलबजावणी होईल असे मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.राज्यभरामध्ये पोलीस विभागाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे कारवाई करून ज्या-ज्या ठिकाणी इंजेक्शन साठा हस्तगत केलेला आहे, या बाबत आता जप्त केलेले इंजेक्शन हे स्थानिक पातळीवर पुन्हा रुग्णांना वाटण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधिकार्यांनी निर्णय घ्यायचा आहे व त्याबाबत ते निर्णय घेतील असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी) कोल्हार, तालुका राहाता येथील रहिवाशी,महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद करीम शेख यांचीअहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे साहेब यांनी दिली. गेले वीस ते पंचवीस वर्षापासून साप्ताहिक राजरिपोर्टर चे संपादक,दै. राष्ट्र सह्याद्री,चे प्रतीनिधी,राजनिती समाचार चे कार्यकारी संपादक व पत्रकार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व गोर गरीबां  वरील अन्याय अत्याचार, अडी अडचणी निर्मुलनासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे राजमोहंमद करीम शेख यांच्या कार्याचा आढावा घेऊन ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे साहेब यांनी नियुक्तीपत्र ऑन लाइन देऊन नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र  लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शौकत भाई शेख,ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय महासचिव मा.राजेश आंधळे,राष्ट्रीय प्रवक्ता मा.सिध्दार्थ मोरे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.संदिप भाऊ जाधव,राष्ट्रीय महासचिव मा.रोहिणी भामरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा.विद्याताई गडाख,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.सत्यजित जानराव,महाराष्ट्र राज्य सचिव मा. दिपक जाधव,अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.राजूभाऊ बनसोडे, तसेच महाराष्ट्र  लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहंमद, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, प्रदेश सचिव किशोर गाढे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफभाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक शहराध्यक्ष छबुराव साळुंके, नाशिक शहर उपाध्यक्ष अन्वर पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी,  इलेक्ट्रॉनिक मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, राहता तालुकाध्यक्ष विजय खरात,राहता तालुका संपर्क प्रमुख गोरक्ष गाढवे,शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जादभाई पठाण, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जिशान काजी, शेवगाव ता. कार्याध्यक्ष जमीर शेख, वैजापूर तालुकाध्यक्ष मुअज्जमभाई शेख, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख (वायरमन), श्रीरामपूर तालुका महिलाध्यक्षा संगीता वाबळे,श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेदभाई शेख, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफभाई शेख, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्लाभाई चौधरी,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद ईदरीसभाई शेख,  संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, घाटकोपर तालुकाध्यक्ष आसिफभाई सय्यद, संगमनेर शहराध्यक्ष शाहनवाज बेगमपूरे, मालेगाव शहराध्यक्ष मोहम्मद इलियास छोटेमिया, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, अकबरभाई शेख, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.शब्बीर फतुभाई कुरेशी, अरुण बागुल, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट, जावेद के. शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोनाची लक्षणे आढळताच विलगीकरण कक्षात दाखल व्हा. बेलापुर केंद्रात दाखल झालेला एकही रुग्ण पुढील उपचारासाठी पाठवीले गेलेले नाही त्यामुळे घरी न  थांबता कोवीड सेंटरमध्ये दाखल व्हा असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले.  बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या कोवीड सेंटर करीता कै. गौतम हिरण यांच्या स्मरणार्थ पंकज हिरण व शांतीलाल हिरण यांच्या वतीने एक लाख रुपये किमतीची आवश्यक औषधे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली त्या वेळी बोलताना उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की बेलापुरकरांनी अतिशय चांगला उपक्रम सुरु करुन सुरळीत चालविलेला आहे कोरोनाची लक्षणे आढळणारांनी घरी बसु नका आपल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होवु शकतो बेलापुर येथील वैद्यकीय अधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी दिलेल्या माहीती वरुन येथील सर्व रुग्ण बरे होवुन आनंदात घरी गेलेले असल्याचे समजले आपली काळजी आपणच घ्या मास्क वापरा सँनिटायझरचा वापर करा विनाकारण फिरु नका असे अवाहनही उपविभागीय अधिकारी पवार यांनी केले या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी देणगीदार दात्यांचे अभिनंदन केले या वेळी बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या कोवीड सेंटरला हिरण परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांची औषधे बेलापुर केमिस्ट व ड्रगीस्ट असोसीएशनच्या वतीने ३१ हजार रुपयांची औषधे शशिकांत दिगंबर उंडे यांच्याकडून रोख अकरा हजार रुपये संदीप डावखर यांच्याकडून अकरा हजार रुपये देगणी देण्यात आली या वेळी जि प सदस्य शरद नवले अजय डाकले कैलास चायल डाँक्टर दिलीप शिरसाठ डाँक्टर देविदास चोखर डाँक्टर सुधीर काळे रणजीत श्रीगोड सुनिल मुथा पत्रकार देविदास देसाई  किशोर कदम पोलीस पाटील अशोक प्रधान राम पोळ विष्णूपंत डावरे पुरुषोत्तम भराटे अकबर टिन मेकरवाले साहेबराव वाबळे सुजित सहानी रमेश अमोलीक विशाल आंबेकर महेश कुर्हे शुभम नवले संतोष डाकले  महेश ओहोळ राहुल माळवदे रोहीत शिंदे सचिन वाघ आदि उपस्थित होते.

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलांचे वसतिगृहामध्ये १०० बेडचे कोविड केअर सेंटर आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली. ‘अशोक’ च्या या कोविड सेंटरचा शुभारंभ प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, डॉ.रविंद्र कुटे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कोविड केअर सेंटरमध्ये ८ एचआरसीटी स्कोअरच्या आतील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर मोफत औषध उपचार केले जाणार आहे. तसेच सकाळी व सायंकाळी दोन वेळेस चहा, सकाळी नाष्टा आणि दोन वेळचे जेवण अशोक कारखान्याचे वतीने मोफत पुरविले जाणार आहे. सेंटरमध्ये ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा असणार नाही. तरी ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यायचे आहे त्यांनी सोबत एचआरसीटी स्कोअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, जेवणासाठी ताट, वाटी, ग्लास व पांघरुन आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget