श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलांचे वसतिगृहामध्ये १०० बेडचे कोविड केअर सेंटर आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली. ‘अशोक’ च्या या कोविड सेंटरचा शुभारंभ प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, डॉ.रविंद्र कुटे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कोविड केअर सेंटरमध्ये ८ एचआरसीटी स्कोअरच्या आतील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर मोफत औषध उपचार केले जाणार आहे. तसेच सकाळी व सायंकाळी दोन वेळेस चहा, सकाळी नाष्टा आणि दोन वेळचे जेवण अशोक कारखान्याचे वतीने मोफत पुरविले जाणार आहे. सेंटरमध्ये ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा असणार नाही. तरी ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यायचे आहे त्यांनी सोबत एचआरसीटी स्कोअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, जेवणासाठी ताट, वाटी, ग्लास व पांघरुन आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment