श्रीरामपुर (प्रतिनिधी )-नगर परिषदेने सुरु केलेल्या कोवीड सेंटर मधील वैद्यकीय अधिकारी नर्स यांनी रुग्णांची चांगली काळजी घेतल्यामुळे बरेच रुग्ण ठणठणीत बरे झाले असुन नागरीकांनी स्वतंःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे. श्रीरामपुर नगरपरिषदेच्या वतीने नगरी प्राथमिक आरोग्य कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते या कोवीड सेंटरमध्ये दाखल झालेले १२ रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी सोडण्यात आले त्या वेळी नगराध्यक्षा अनुराधा अदिक व नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे यांनी गुलाब पुष्प देवुन अभिनंदन केले व घरीच रहा सुरक्षित रहा असा सल्ला दिला या वेळी बोलताना नगराध्यक्षा अनुराधा आदिक पुढे म्हणाल्या की या कोवीड सेंटरमध्ये दाखल झालेली बारा जणांची पहीली बँच घरी सुखरुप जात आहे या रुग्णांची डाँक्टर परे डाँक्टर मुंदडा तसेच रुग्णांच्या सेवेत असणार्या सिस्टर यांनी योग्य सेवा व औषधोपचार दिल्यामुळे हे सर्व जण बरे होवुन घरी जात आहे हा आनंदाचा क्षण आहे नागरीकांच्या आमच्या प्रति काही अपेक्षा आहेत तशा आमच्याही नागरीकाप्रती अपेक्षा आहे नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये बाहेर पडताना मास्कचा वापर करा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असेही त्या म्हणाल्या या वेळी बोलताना नगरपालीकेचे सी ओ गणेश शिंदे म्हणाले की आपला आजार अंगावर काढु नका वेळेवर उपचार घ्या कोरोनाची लक्षणे वाटल्यास घरी न राहाता कोवीड सेंटरमध्ये दाखल व्हा कोवीड सेंटरमध्ये योग्य उपचार केल्यामुळे रुग्ण लवकर बरा होवुन घरी जातो त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या कोरोनाचा प्रसार होवु नये याची खबरदारी घ्या असेही शिंदे म्हणाले या वेळी अनेक रुग्णांनी या ठिकाणी चांगली सेवा मिळाल्यामुळे लवकर बरे झाल्याचे सांगितले.
Post a Comment