अहमदनगर (प्रतिनिधी)-करोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने दुसर्या टप्प्यात कडक लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. पोलीस अधिकार्यांना 10 टक्के रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड व अन्य आरोग्य सुविधा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यात आता यात पोलीसांच्या नातेवाईकांही (घरातील व्यक्ती) समावेश करता येईल का? यासंदर्भात आरोग्य मंत्री यांच्याशी तत्काळ चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.मंत्री देसाई यांनी रविवारी नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री देसाई यांनी नुकताच विविध जिल्ह्यात जाऊन बैठका घेतल्या आहेत. तेथे सुद्धा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री देसाई म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्यांना करोनाची लागण झालेले आहेत, त्यांना आमच्या पॅनलवर जे रुग्णालय आहे.तेथे तात्काळ उपचार मिळत आहे. त्यामध्ये कुठेही कमतरता पडत नाही, काम करताना जर एखाद्या कर्मचार्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय या अगोदरच्या पहिल्या कोविड लाटेच्यावेळी घेण्यात आलेला होता. त्यानंतर तो थांबवण्यात आला होता, पण आता पुन्हा नव्याने तसा आदेश काढला जाणार आहे, कॅबिनेटने सुद्धा या विषयाला मंजुरी दिली असून त्याची सुद्धा लवकरच अंमलबजावणी होईल असे मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.राज्यभरामध्ये पोलीस विभागाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे कारवाई करून ज्या-ज्या ठिकाणी इंजेक्शन साठा हस्तगत केलेला आहे, या बाबत आता जप्त केलेले इंजेक्शन हे स्थानिक पातळीवर पुन्हा रुग्णांना वाटण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधिकार्यांनी निर्णय घ्यायचा आहे व त्याबाबत ते निर्णय घेतील असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment