Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- साई खेमानंद फौंडेशनच्या माध्यमातून उंबरगाव येथे  कोविड सेंटर सुरु करण्यात यावे अशी मागणी बेलापुर व पंचक्रोषितील गावच्या सरपंचांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना केली आहे                       बेलापुर वळदगाव उंबरगाव पढेगाव केसापुर आंबी दवणगाव संक्रापुर अंमळनेर गंगापुर एकलहरे उक्कलगाव कुरणपुर गळनिंब फत्याबाद मांडवे कडीत येथील सरपंचानी खासदार सदाशिव लोखंडे यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की बेलापुर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अनेक ठिकाणी रुग्णांना बेड देखील उपलब्ध होत नाही सर्व दवाखाने गच्च भरलेले आहेत नातेवाईक रुग्णांना घेवुन वणवण या दवाखान्यातून त्या दवाखान्यात चकरा मारत आहे खासदार लोखंडे यांनी ईंबरगाव येथे साई खेमांनद फौंडेशन सुरु केले या ठिकाणी रुग्णांना लागणार्या सोयी सुविधा उपलब्ध होवु शकतात त्यामुळे उंबरगाव येथे कोविड सेंटर सुरु करावे असेही  प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे या निवेदनावर बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर खूर्दच्या सरपंच सौ वर्षा महाडीक उक्कलगावचे सरपंच नितीन थोरात एकलहरे येथील सरपंच रिजवाना शेख पढेगावचे सरपंच किशोर बनकर लाडगावचे सरपंच गिताराम खरात उंबरगावचे माजी सरपंच राजेंद्र ओहोळआदिंच्या सह्या आहेत   तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे हे डाँक्टर आहेत त्यामुळे त्याचा लाभ  परिसरातील रुग्णांना होवु शकतो निवडणुकीच्या आगोदर डाँ.चेतन लोखंडे यांनी बेलापुर  व परिसरात अनेक आरोग्य तपासणी शिबीर भरविले होते गावातीलच काही तरुण कार्यकर्ते त्या वेळी अघाडीवर होते आज परिसरातील नागरीकांना खरोखर उपचाराची आधाराची गरज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यासाठी आग्रह धरावा अशीही मागणी नागरीकामधुन केली जात आहे.

 .बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातील ५६ हजार रुपये किमतीची आठ गाढव चोरीला गेली असुन या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे  पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे           या बाबत सविस्तर हकीकत अशी की बेलापुर येथील रविंद्र आंबादास बोरुडे हा माती वहातुक करत असुन या कामाकरीता त्याच्याकडे चार गाढव होती त्याला पाथरे तालुका राहुरी येथील माती वहातुक करण्याचे काम मिळाल्यामुळे रविंद्र याचेकडील चार गाढव तसेच रवि राजेंद्र रोकडे याचेकडील दोन गाढव व भाऊसाहेब विश्वनाथ नवनिधे याची दोन गाढव अशी आठ गाढव घेवुन रविंद्र बोरुडे हा पाथरे ता .राहुरी येथे गेला होता दिनांक  १६ मार्च रोजी माती वहातुक केल्यानंतर रविंद्र बोरुडे याने आठही गाढंव पायाला दोरी बांधुन गावातील विठ्ठल मंदिरासमोर बांधली  व चार वाजता बेलापुरला घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळीच ते कामाकरीता पाथरे येथे गेले असता त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढंव आढळून आली नाही कुणीतरी सोडून दिली असतील अशा समजुतीने रविंद्र  बोरुडे याने पुर्ण परिसर पिंजुन काढला परंतु गाढंव आढळून आली नाही त्यामुळे त्याने पोलीसात तक्रार दाखल केली पोलीसांनी रविंद्र बोरुडे याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गाढंव पंढरपूर येथे असल्याची माहीती मिळताच पोलीसांनी सहा गाढंव व तेथील गाढंव विकत घेणारा अहीनाथ जाधव यास ताब्यात घेतले त्या नंतर बेलापुरातुन ज्याने गाढव विकली तो अविनाश ऊर्फ सोन्या बाबासाहेब बोरुडे  रा बेलापुर यास ताब्यात घेतले असुन आणखी आरोपींचा या गुन्ह्याच सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे 
वाटणी वरुन झाली बोंब या बाबत समजलेली माहीती अशी की आरोपींनी ही गाढंव पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे विकली होती एका गाढवाची किमंत साधारण पंधरा ते अठरा हजार रुपये येते या प्रमाणे आठ गाढंवाचे दहा हजार रुपया प्रमाणे जरी  धरले तरी ८० हजार रुपये येणे अपेक्षित असताना एकाने कमी पैसे आल्याचे सांगितले त्यामुळे वाटणी कमी मिळाली याचा राग आल्यामुळे एक जण गाढंवाच्या मुळ मालकाला येवुन मिळाला व गाढवाचा ठावठिकाणा सांगीतला लगेच रविंद्र बोरुडे चार दोन जणांना घेवुन पंढरपूर येथे गेला व गाढंव आपलीच असल्याची खात्री केली त्या नंतर गाढंव चोरीच बिंग फुटले  असल्याची माहीती हाती आली आहे या पुर्वीही बेलापुरातुन मोठ्या प्रमाणात गाढंव चोरीला गेलेली होती काहींनी मढीच्या बाजारात त्या गाढवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु गाढव मिळाली नाहीत काहींनी आसपासच्या शेतकऱ्यांवर गाढंव गेल्याचे खापर फोडले होते आता खरे चोर उघड झाल्यामुळे मागील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे

राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपासDy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालूक्यातील कुरणपूर येथील युवक गणेश उमाकांत चिंधे (वय २५) आपल्या शेतात पाणी भरत असताना रानडूकराने चावा घेवून धडक दिल्याने जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले.  घटनास्थळी वनाधिकारी बी.एस. गाढे,वनपाल विकास पवार,लांडे हजर झाले.

पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील साई एशियन हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

परीसरतात बिबट्या बरोबरच रानडूकरांची संंख्या मोठ्या प्रमाणात असून सध्या प्रवरा नदिला पाणी भरपूर असल्याने मका,उस हे पीक मोठ्या प्रमाणात असून रानडूकरांना व बिबट्यांचा वावर या परीसरात आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावात विनाकारण विना मास्क फिरणारावर बेलापुर पोलीसांनी कारवाई सुरु केली असुन आत्तापर्यत ३० हजार रुपयाच्या पुढे दंड वसुल करण्यात आला असल्याची माहीती बेलापुर  पोलीसांनी दिली आहे            शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरुच ठेवुन नियमाचे पालन न करणाऱ्या तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यात ओंकार किराणा दुकानदारास एक हजार रुपये दंड करण्यात आला तर पंचरचे दुकान उघडे ठेवणार्या क्षिरसागर यास १५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे आणखी एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन विना मास्क फिरणार्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहीती बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली आहे                                      पोलीसांनी कारवाई सुरु केली असली तरी बेलापुरची कोरोना समिती मात्र शांत दिसत आहे गावात अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने गप्पा मारताना दिसत आहे त्यांच्यावर कोण पायबंद घालणार असा सवाल सुज्ञ नागरीकाकडून विचारला जात आहे सायंकाळी तीन ते पाच वाजे दरम्यान आझाद मैदानावर तर जत्राच भरते ती मटका येण्याची वेळ असल्यामुळे अनेक मटका बहाद्दर आकड्याची वाट पहात बसलेले असतात अनेक दुकानावर निर्बंध असताना बेलापूरात मटका मात्र खूलेआम सुरु आहे या मटक्यास नेमका आशिर्वाद कुणाचा आहे बेलापुरात मटका अन गुटखाही जोरात कोरोना महामारीच्या काळात तरी गुटखा विक्री  मटका बंद ठेवण्याची मागणी  करण्यात येत आहे.


श्रीरामपूर तालुक्यात काल 66 रुग्ण सापडले आहे. तर 987 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत 
आहेत. काल 09 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.जिल्हा रुग्णालयात 04 खासगी रुग्णालयात 17 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 45 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 09 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 987 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 3852 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1776 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 987 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.श्रीरामपूर शहरात 17 रुग्ण असून तर तालुक्यात 44 व अन्य तालुक्यातील 5 रुग्ण आढळून आले आहेत.शहरात वॉर्ड नं. 1-06, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-07 से 17 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-01, खंडाळा-01, गोंडेगाव-04, वळदगाव-04, ब्राम्हणगाव-01, उंदिरगाव-01, महांकाळवाडगाव-01, उंबरगाव-02, गुजरवाडी-01, टाकळीभान-01, खिडीर्र्-02, बेलापूर-05, शिरसगाव-01, दिघी-02, निमगाव खैरी-05, हरेगाव-05, गोंधवणी-0़5, रामपूर-01, फत्याबाद-01, नायगाव-01 असे एकूण 61 रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील आंबी-01, श्रीगोंदा तालुक्यातील खाणगा-01, तर अन्य तीन पत्ते माहित नसल्यामुळे श्रीरामपूरात वर्ग झालेले रुग्ण आहेत.गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल मात्र केवळ 66 रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी थोडा मोकळा श्वास घेतला.

अहमदनगर-रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळा बाजार विक्री करणाऱ्या दोघा मेडिकल चालकांसह डाॅक्टर दांपत्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार मधील म्हस्के हाॅस्पिटलचे डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के, डॉ. कौशल्या किशोर म्हस्के (दोघे रा. वडारवाडी, भिंगार), प्रसाद दत्तात्रय अल्हाट (वय 27 वर्ष रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर), रोहित अर्जुन पवार (वय 22 रा. साकत ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.औषध प्रशासन विभागाचे जावेद शेख यांनी फिर्याद दिली आहे. प्रसाद अल्हाट व रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली असून म्हस्के डाॅक्टर दांपत्य पसार झाले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. 15 रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिंगारमध्ये डाॅ. किशोर म्हस्के यांच्या हाॅस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. असे असताना प्रसाद अल्हाट हा रोहित पवार याच्या मदतीने व म्हस्के हॉस्पिटलमधील म्हस्के डॉक्टर दांपत्यांशी संगनमत करून चैतन्य मेडिकल या ठिकाणावरून बेकायदेशीररित्या मिळवून करोना रुग्णांचा तपासणी अहवाल नसताना 4 हजार 800 रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावाने काळ्याबाजारात 12 हजार रुपये किमतीला विक्री करताना मिळून आले आहे.पोलिसांनी कलम 420, 34 सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 चे 6 कलम, जीवनावश्यक वस्तूची अधिनियम 1955 चे उल्लंघन, तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget