बेलापुर (प्रतिनिधी )-गावात विनाकारण विना मास्क फिरणारावर बेलापुर पोलीसांनी कारवाई सुरु केली असुन आत्तापर्यत ३० हजार रुपयाच्या पुढे दंड वसुल करण्यात आला असल्याची माहीती बेलापुर पोलीसांनी दिली आहे शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरुच ठेवुन नियमाचे पालन न करणाऱ्या तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यात ओंकार किराणा दुकानदारास एक हजार रुपये दंड करण्यात आला तर पंचरचे दुकान उघडे ठेवणार्या क्षिरसागर यास १५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे आणखी एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन विना मास्क फिरणार्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहीती बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली आहे पोलीसांनी कारवाई सुरु केली असली तरी बेलापुरची कोरोना समिती मात्र शांत दिसत आहे गावात अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने गप्पा मारताना दिसत आहे त्यांच्यावर कोण पायबंद घालणार असा सवाल सुज्ञ नागरीकाकडून विचारला जात आहे सायंकाळी तीन ते पाच वाजे दरम्यान आझाद मैदानावर तर जत्राच भरते ती मटका येण्याची वेळ असल्यामुळे अनेक मटका बहाद्दर आकड्याची वाट पहात बसलेले असतात अनेक दुकानावर निर्बंध असताना बेलापूरात मटका मात्र खूलेआम सुरु आहे या मटक्यास नेमका आशिर्वाद कुणाचा आहे बेलापुरात मटका अन गुटखाही जोरात कोरोना महामारीच्या काळात तरी गुटखा विक्री मटका बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
Post a Comment