.बेलापुर (प्रतिनिधी )-गावातील ५६ हजार रुपये किमतीची आठ गाढव चोरीला गेली असुन या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या बाबत सविस्तर हकीकत अशी की बेलापुर येथील रविंद्र आंबादास बोरुडे हा माती वहातुक करत असुन या कामाकरीता त्याच्याकडे चार गाढव होती त्याला पाथरे तालुका राहुरी येथील माती वहातुक करण्याचे काम मिळाल्यामुळे रविंद्र याचेकडील चार गाढव तसेच रवि राजेंद्र रोकडे याचेकडील दोन गाढव व भाऊसाहेब विश्वनाथ नवनिधे याची दोन गाढव अशी आठ गाढव घेवुन रविंद्र बोरुडे हा पाथरे ता .राहुरी येथे गेला होता दिनांक १६ मार्च रोजी माती वहातुक केल्यानंतर रविंद्र बोरुडे याने आठही गाढंव पायाला दोरी बांधुन गावातील विठ्ठल मंदिरासमोर बांधली व चार वाजता बेलापुरला घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळीच ते कामाकरीता पाथरे येथे गेले असता त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढंव आढळून आली नाही कुणीतरी सोडून दिली असतील अशा समजुतीने रविंद्र बोरुडे याने पुर्ण परिसर पिंजुन काढला परंतु गाढंव आढळून आली नाही त्यामुळे त्याने पोलीसात तक्रार दाखल केली पोलीसांनी रविंद्र बोरुडे याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गाढंव पंढरपूर येथे असल्याची माहीती मिळताच पोलीसांनी सहा गाढंव व तेथील गाढंव विकत घेणारा अहीनाथ जाधव यास ताब्यात घेतले त्या नंतर बेलापुरातुन ज्याने गाढव विकली तो अविनाश ऊर्फ सोन्या बाबासाहेब बोरुडे रा बेलापुर यास ताब्यात घेतले असुन आणखी आरोपींचा या गुन्ह्याच सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे
वाटणी वरुन झाली बोंब या बाबत समजलेली माहीती अशी की आरोपींनी ही गाढंव पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे विकली होती एका गाढवाची किमंत साधारण पंधरा ते अठरा हजार रुपये येते या प्रमाणे आठ गाढंवाचे दहा हजार रुपया प्रमाणे जरी धरले तरी ८० हजार रुपये येणे अपेक्षित असताना एकाने कमी पैसे आल्याचे सांगितले त्यामुळे वाटणी कमी मिळाली याचा राग आल्यामुळे एक जण गाढंवाच्या मुळ मालकाला येवुन मिळाला व गाढवाचा ठावठिकाणा सांगीतला लगेच रविंद्र बोरुडे चार दोन जणांना घेवुन पंढरपूर येथे गेला व गाढंव आपलीच असल्याची खात्री केली त्या नंतर गाढंव चोरीच बिंग फुटले असल्याची माहीती हाती आली आहे या पुर्वीही बेलापुरातुन मोठ्या प्रमाणात गाढंव चोरीला गेलेली होती काहींनी मढीच्या बाजारात त्या गाढवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु गाढव मिळाली नाहीत काहींनी आसपासच्या शेतकऱ्यांवर गाढंव गेल्याचे खापर फोडले होते आता खरे चोर उघड झाल्यामुळे मागील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे
Post a Comment