राहुरी येथील पत्रकार श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपासDy.S.P. संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
Post a Comment